Aishwarya-Abhishek Divorce : ...म्हणून ऐश्वर्या-अभिषेकच्या घटस्फोटाची होतेय तुफान चर्चा, 17 वर्षात बदलल्या 'या' गोष्टी
Abhishek Bachchan And Aishwarya Rai Divorce Rumors : बॉलिवूडचे लोकप्रिय कपल अभिषेक बच्चन आणि ऐश्वर्या राय यांच्या घटस्फोटाची चर्चा सोशल मीडियावर तुफान रंगलीय. मागील दोन वर्षांपासून दोघांमध्येही सर्वकाही आलबेल नसल्याचं बोललं जात आहे
ADVERTISEMENT
बातम्या हायलाइट
ऐश्वर्या राय-अभिषेक बच्चन यांच्या नात्यात दुरावा का निर्माण झाला?
ऐश्वर्या राय आणि जया बच्चन यांच्यात वादाची ठिणगी?
ऐश्वर्या-अभिषेक यांच्या 17 वर्षांच्या नात्यात काय बदल झाले?
Abhishek Bachchan And Aishwarya Rai Divorce Rumors : बॉलिवूडचे लोकप्रिय कपल अभिषेक बच्चन आणि ऐश्वर्या राय यांच्या घटस्फोटाची चर्चा सोशल मीडियावर तुफान रंगलीय. मागील दोन वर्षांपासून दोघांमध्येही सर्वकाही आलबेल नसल्याचं बोललं जात आहे. परंतु, याबाबत दोन्ही दिग्गजांकडून किंवा बच्चन कुटुंबाकडून कोणत्याही प्रकारची अधिकृत घोषणा करण्यात आली नाहीय. पण काही व्हिडीओ इंटरनेटवर व्हायरल झाल्याने दोघांच्या नातेसंबंधाबाबत वेगवेगळे तर्क वितर्क लढवण्यात आले. (The divorce Rumors of Bollywood's popular couple Abhishek Bachchan and Aishwarya Rai is being discussed on social media)
ADVERTISEMENT
आतापर्यंत त्यांना जसा आदर मिळाला आहे, तसाच मलाही पाहिजे. मला जया बच्चन यांच्यासारख बनायचं आहे, अशी प्रतिक्रिया ऐश्वर्या रायने दिली होती. तसच काही वर्षांपूर्वी ऐश्वर्या राय आणि जया बच्चन (सासू-सुनेचा) फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. ऐश्वर्याने जया बच्चन यांचा हात पकडून खांद्यावर डोकं ठेवल्याचं या फोटोत पाहायला मिळालं होतं. त्यावेळी या दोघींमध्येही खूप चांगल्या प्रकारची बॉण्डिंग होती. परंतु, गेल्या काही वर्षांमध्ये परिस्थिती बदलली आहे. बच्चन कुटुंबाची तगडी फॅन फॉलोईंग आहे. पण ऐश्वर्या-अभिषेक घटस्फोटाच्या चर्चांमुळे पुन्हा एकदा प्रकाशझोतात आले आहेत. या दोघांनीही 2007 मध्ये लग्नगाठ बांधली होती. आता 17 वर्षांमध्ये काय काय बदललं, याबाबत चाहत्यांनी तर्क वितर्क लढवले आहेत.
17 वर्षात अभिषेक-ऐश्वर्याच नातं किती बदललं?
ऐश्वर्या राय सोशल मीडियावर खूप सक्रिय असते. ऐश्वर्या तिची मुलगी आराध्या आणि अभिषेक बच्चनसोबतचा फोटो शेअर करत असते. अनेकदा ती तिच्या कुटुंबीयांसोबत स्पॉट झाल्याचं पाहायला मिळालं आहे. परंतु, अभिषेकने 9 महिन्यांपूर्वी ऐश्वर्याच्या वाढदिवशी शेवटचा फोटो शेअर केला होता. पण दोघांमध्ये खास बॉण्डिंग पाहायला मिळाली नाही.
हे वाचलं का?
हे ही वाचा >> Gold Price Today: आरारारा खतरनाक! 18,22,24 कॅरेट सोन्याचे भाव कडाडले, किंमत वाचून डोकंच धराल
सासू जया बच्चनसोबत बदललं नातं
आराध्य बच्चनचा जन्म झाल्यानंतर जया बच्चन यांनी ऐश्वर्याची बाजू मांडत मीडियाला फटकारलं होतं. ऐश्वर्याला निक नेमने आवाज देण्याऱ्यांना जया बच्चन यांनी सुनावलं होतं. ऐश्वर्या रायच्या बाजून सर्व गोष्टी सुरळीत होत्या. आराध्यचं पानपोषण व्यवस्थित करत असल्यानं जया बच्चन यांनी ऐश्वर्याचं कौतुकही केलं होतं. पण आता सर्वकाही बदललं आहे. ऐश्वर्यावर खूप प्रेम करते, असं जया बच्चन यांनी मीडियाशी बोलताना म्हटलं होतं. पण आता दोघींमध्येही तसा संवाद राहिला नसल्याचं बोललं जात आहे.
राधिका मर्चंट आणि अनंत अंबानी यांच्या लग्नसोहळ्यात काय घडलं?
राधिका मर्चंट आणि अनंत अंबानी यांच्या लग्नसोहळ्यात संपूर्ण बच्चन कुटुंब चर्चेचा विषय ठरला. त्यावेळी त्यांच्यासोबत सून ऐश्वर्या आणि तिची मुलगी आराध्या दिसली नाही. ऐश्वर्या-अभिषेक एकत्रित स्पॉट न झाल्याने दोघांच्या घटस्फोटाच्या चर्चांना उत आला.
ADVERTISEMENT
हे ही वाचा >> Ladki Bahin Yoajan: महिलांनो! लगेच मिळतील 4500 रुपये, पण Aadhaar कार्डचं 'हे' काम तातडीनं करा
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT