दोन मुलांचा बाप असूनही दया-माया दाखवली नाही, विकृताने चिमुकलीला दातांनी इतकं छळलं की कोमात गेली

मुंबई तक

Crime News : आरोपीची ओळख शंकर सदा अशी झाली असून तो पीडितेच्या शेजारी राहणारा आणि दोन मुलांचा पिता असल्याचे समोर आले आहे. या घटनेने मुलीची आई जबर धक्क्यात आहे. तिच्या म्हणण्यानुसार, मुलगी घराच्या दारात झोका खेळत असताना अचानक बेपत्ता झाली होती. शोध घेतल्यानंतर ती गव्हाच्या शेतात जखमी अवस्थेत सापडली.

ADVERTISEMENT

Crime News
Crime News
social share
google news

बातम्या हायलाइट

point

दोन मुलांचा बाप असूनही दया-माया दाखवली नाही

point

विकृताने चिमुकलीला दातांनी इतकं छळलं की कोमात गेली

Crime News :  बिहारमधील समस्तीपूर येथे चार वर्षांच्या चिमुकलीवर अत्याचाराचा प्रयत्न झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या घटनेमुळे परिसरात संतापाची लाट उसळली आहे. जखमी अवस्थेत सापडलेल्या मुलीच्या अंगावर गंभीर जखमांच्या खूणा आढळल्या असून तिच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. ग्रामस्थांनी आरोपीला पकडून पोलिसांच्या ताब्यात दिले आहे. पोलिसांनी पीडित मुलीच्या आईचा जबाब नोंदवून पुढील कारवाई सुरू केली आहे.

मुफस्सिल पोलीस ठाण्याच्या हद्दीतील जितवारपूर गावात ही घटना घडली. पीडित मुलीची आई मुलांच्या शिक्षणासाठी माहेरी राहत होती. नेहमीप्रमाणे गुरुवारी सायंकाळी सुमारे चार वाजता मुलगी शिकवणीवरून घरी आली; मात्र काही वेळातच ती घरातून बेपत्ता झाल्याचे लक्षात आले. आईने तात्काळ शोधाशोध सुरू केली. सायंकाळी सुमारे सातच्या सुमारास घराजवळील शेतात टॉर्चच्या उजेडात शोध घेत असताना एक व्यक्ती पळून जाताना दिसली. संशय आल्याने ग्रामस्थांनी त्याचा पाठलाग करून त्याला पकडले. त्याच शेतात चार वर्षांची मुलगी रक्तबंबाळ अवस्थेत बेशुद्ध पडलेली आढळली.

जखमी मुलीला तातडीने खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. डॉक्टर अरविंद कुमार यांनी उपचार सुरू करत पोलिसांना माहिती दिली. त्यांच्या म्हणण्यानुसार, मुलीच्या शरीरावर अनेक ठिकाणी दातांनी चावल्याच्या खोल जखमा आढळल्या. ओठाला गंभीर दुखापत झाली होती. जखमांमुळे मुलगी काही काळ बेशुद्ध अवस्थेत होती; मात्र उपचारानंतर तिची प्रकृती स्थिर करण्यात यश आले. सध्या तिची प्रकृती नियंत्रणात असून पुढील वैद्यकीय तपासणी सुरू आहे. डॉक्टरांनी स्पष्ट केले की, खासगी अवयवांवर दुखापत नसून जखमा पोटाच्या वरच्या भागावर आहेत.

दरम्यान, आरोपीची ओळख शंकर सदा अशी झाली असून तो पीडितेच्या शेजारी राहणारा आणि दोन मुलांचा पिता असल्याचे समोर आले आहे. या घटनेने मुलीची आई जबर धक्क्यात आहे. तिच्या म्हणण्यानुसार, मुलगी घराच्या दारात झोका खेळत असताना अचानक बेपत्ता झाली होती. शोध घेतल्यानंतर ती गव्हाच्या शेतात जखमी अवस्थेत सापडली. घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन सदर डीएसपी संजय कुमार पांडेय यांनी रुग्णालयात भेट देत संपूर्ण माहिती घेतली. तसेच महिला पोलिस अधिकाऱ्यांना आवश्यक त्या सूचना दिल्या. पोलिसांनी आरोपीला अटक केली असून संबंधित कलमांन्वये गुन्हा नोंदवण्याची प्रक्रिया सुरू आहे. पुढील तपास सुरू असून परिसरात पोलिस बंदोबस्त वाढवण्यात आला आहे.

हे वाचलं का?

    follow whatsapp