Gold Price Today: आरारारा खतरनाक! 18,22,24 कॅरेट सोन्याचे भाव कडाडले, किंमत वाचून डोकंच धराल
Today Gold And Silver Rate : आज सोन्याच्या किंमतीत पुन्हा एकदा मोठी वाढ झाली आहे. कालही सोन्याच्या दरानं उसळी घेतली होती. चांदीच्या किंमतीत सलग दोन दिवस वाढ झालेली पाहायला मिळत आहे.
ADVERTISEMENT
बातम्या हायलाइट
सोने-चांदीचा आजचा भाव वाचून धक्काच बसेल
सोने-चांदीच्या भावात किती रुपयांनी झालीय वाढ?
जाणून घ्या सोने-चांदीच्या दराबाबत सविस्तर माहिती
Today Gold And Silver Rate : आज सोन्याच्या किंमतीत पुन्हा एकदा मोठी वाढ झाली आहे. कालही सोन्याच्या दरानं उसळी घेतली होती. चांदीच्या किंमतीत सलग दोन दिवस वाढ झालेली पाहायला मिळत आहे. आज तुम्ही सोनं खरेदी करण्याचा प्लॅन करत असाल, तर जाणून आजच्या सोनं-चांदीच्या दराबाबत सविस्तर माहिती. (Today the price of gold has once again increased significantly. The price of silver is seen increasing for two consecutive days)
ADVERTISEMENT
भारतात सोन्याचे आजचे दर
भारतात आज 22 कॅरेट सोन्याची किंमत 750 रुपयांनी वाढून 69,750 रुपये प्रति 10 ग्रॅम झाली आहे. आज 22 कॅरेट सोन्याच्या 100 ग्रॅमची किंमत 7500 रुपयांनी वाढून 6,97,500 रुपये झाली आहे. तर 24 कॅरेट सोन्याची किंमत प्रति 10 ग्रॅम 820 रुपयांनी वाढून 79,080 रुपये आणि 24 कॅरेट सोन्याच्या 100 ग्रॅमची किंमत 8200 रुपयांनी वाढून 7,60,800 रुपये झाली आहे.18 कॅरेट सोन्याची प्रति 10 ग्रॅमची किंमत 608 रुपयांनी वाढून 57,068 रुपये झाली आहे. तर 18 कॅरेट सोन्याची 100 ग्रॅमची किंमत 6080 रुपयांनी वाढून 5,70,680 रुपये झाली आहे.
हे ही वाचा >> Ladki Bahin Yoajan: महिलांनो! लगेच मिळतील 4500 रुपये, पण Aadhaar कार्डचं 'हे' काम तातडीनं करा
भारतात चांदीचा आजचा भाव
भारतात चांदीची किंमत स्थिर आहे. 1 किलोग्रॅम चांदीची किंमत 93000 रुपये आहे. भारतात आज 100 ग्रॅम चांदीच्या किंमतीत 50 रुपयांची वाढ होऊन 9300 रुपयांपर्यंत पोहोचली आहे. Goodreturns वेबसाईटनुसार, गुरूवारी (19 सप्टेंबर 2024) 24 कॅरेट 10 ग्रॅम (1 तोळा) सोन्याचा भाव 74, 450 रूपयांवर पोहोचला होता. पण काल यात 660 रूपयांनी वाढ झाली होती. त्यामुळे याची किंमत 75,110 रूपये झाली होती. तर, 22 कॅरेट सोन्याचा भाव 68,250 रूपये होता. काल हेच दर 600 रूपयांनी वाढले आणि त्याची किंमत 68,850 रूपये झाली. त्याचबरोबर एक किलो चांदीची किंमत 92,500 रूपयांवर पोहोचली होती.
हे वाचलं का?
जयपूर - जयपूरमध्ये आज सोन्याचे 22 कॅरेटच्या 1 ग्रॅमची किंमत 6975 रुपये आहे.
लखनऊ - येथे सोन्याच्या 22 कॅरेट 1 ग्रॅम सोन्याची किंमत 6,975 रुपये आहे.
आज दिल्लीत सोन्याची किंमत
दिल्लीत 22 कॅरेट 1 ग्रॅम सोन्याचा भाव 6975 रुपये आहे.
बंगळुरु : 22 कॅरेट 1 ग्रॅम सोन्याची किंमत 6960 रुपये झाली आहे.
कानपूर : 22 कॅरेट 1 ग्रॅम सोन्याची किंमत 6,975 रुपये आहे.
हे ही वाचा >> Horoscope In Marathi : प्रेमी युुगुलांसाठी आनंदाची बातमी! पण 'या' राशीच्या लोकांवर येणार आर्थिक संकट?
सोन्याची शुद्धता प्रामुख्याने कॅरेट (K) मध्ये मोजली जाते. दागिन्यांच्या तुकड्यामध्ये किंवा सोन्याच्या वस्तूमध्ये किती शुद्ध सोने समाविष्ट आहे हे कॅरेट प्रणाली दर्शवते. भारतातील सर्वात लोकप्रिय कॅरेट मूल्ये 24, 22, 18 आणि 14 आहेत. शुद्ध सोने 24k मानले जाते, ज्यामध्ये 99.9% सोने असते, तर उर्वरित कॅरेटमध्ये तांबे किंवा चांदीसारख्या मिश्र धातुंचा समावेश होतो.
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT