संपत्ती आणि पेन्शनचा वाद! बहिणी-बहिणींमध्ये जुंपली; आईचा संशयास्पद मृत्यू
Crime News : एका 70 वर्षीय वृद्ध महिलेचा संशयास्पद मृत्यू झाल्याने खळबळ उडाली आहे. या महिलेच्या मृत्यूवरुन दोन सख्ख्या बहिणींमध्ये आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झडल्या आहेत. छोट्या बहिणीने दुर्गा देवी हिने आपल्याच मोठ्या बहिणीवर आईचा गळा दाबून हत्या केल्याचा खळबळजनक आरोप केल्याने या प्रकरणाला गुंतागुंतीचे वळण मिळाले आहे. संपत्ती आणि पेन्शनच्या पैशावरुन झालेल्या वादात या महिलेचा खून झाल्याचे बोलले जात आहे.
ADVERTISEMENT

बातम्या हायलाइट
संपत्ती आणि पेन्शनचा वाद!
बहिणी-बहिणींमध्ये जुंपली
आईचा संशयास्पद मृत्यू
Crime News : एका 70 वर्षीय वृद्ध महिलेचा संशयास्पद मृत्यू झाल्याने खळबळ उडाली आहे. या महिलेच्या मृत्यूवरुन दोन सख्ख्या बहिणींमध्ये आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झडल्या आहेत. छोट्या बहिणीने दुर्गा देवी हिने आपल्याच मोठ्या बहिणीवर आईचा गळा दाबून हत्या केल्याचा खळबळजनक आरोप केल्याने या प्रकरणाला गुंतागुंतीचे वळण मिळाले आहे. संपत्ती आणि पेन्शनच्या पैशावरुन झालेल्या वादात या महिलेचा खून झाल्याचे बोलले जात आहे. बिहारच्या सासाराम नगरमधील ही घटना आहे.
हे ही वाचा : कष्ट करुन सॉफ्टवेअर इंजिनिअर बनवलं अन् तोच मुलगा जीवावर उठला; आई-वडिलांचा 'असा' केला अंत
आजारपण की घातपात?
मोठी बहीण सुनीता देवी हिने पोलिसांना सांगितले की, तिच्या आईला गेल्या अनेक वर्षांपासून दमा आणि थायरॉईडचा गंभीर आजार होता. डोळ्यांच्या शस्त्रक्रियेसाठी ती आईला सुअरा गावातून सासाराम येथे घेऊन आली होती. तिथेच उपचारादरम्यान त्यांचा अचानक मृत्यू झाल्याचा दावा तिने केला आहे. मात्र, दुसरीकडे लहान बहीण दुर्गा देवी हिने हा दावा पूर्णपणे फेटाळून लावत हा पूर्वनियोजित खून असल्याचे म्हटले आहे.
पेन्शन आणि संपत्तीचा लोभ
मृत लीलावती कुंवर यांचे पती बंगाल पोलीस दलात कार्यरत होते. त्यांच्या निधनानंतर लीलावती यांना नियमित पेन्शन मिळत होती आणि त्या लहान मुलीसोबत राहत होत्या. दुर्गा देवीच्या आरोपानुसार, मोठी बहीण सुनीता ही अनेक दिवसांपासून आईची संपत्ती आणि पेन्शन लाटण्यासाठी वाद घालत होती. याच मालमत्तेच्या लोभापायी तिने आईचा गळा दाबून त्यांना संपवले असावे, असा संशय तिने व्यक्त केला असून पोलिसांत तक्रार दाखल केली आहे.










