बालगंधर्व सिनेमाची दशकपूर्ती; फोटो शेअर सुबोधने दिला आठवणींना उजाळा

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

प्रसिद्ध अभिनेता सुबोध भावे याच्या बालगंधर्व सिनेमाला आज 10 वर्ष पूर्ण झाली आहेत. प्रचंड गाजलेल्या या सिनेमामध्ये अभिनेता सुबोध भावे याने बालगंधर्व यांची भूमिका साकारली होती. या भूमिकेला प्रेक्षकांनी देखील प्रचंड प्रतिसाद दिला. तर आज या सिनेमाला 10 वर्ष पूर्ण झाली असून सुधोबने सिनेमासंदर्भातील आठवणींना उजाळा दिला आहे.

ADVERTISEMENT

2011 साली रिलीज झालेल्या बालगंधर्व चित्रपटाला आज 10 वर्षे पूर्ण झाली आहेत. सुबोध भावेने बालगंधर्व चित्रपटातील काही फोटो शेअर करत लिहिलंय, “गंधर्वगाथा” हे भा.द.खेर लिखित पुस्तक पुस्तक वाचून सुरू झालेला प्रवास “बालगंधर्व” या चित्रपटाद्वारे संपन्न झाला. 6 मे 2011 रोजी या चित्रपटाचं प्रदर्शन झालं. आज बालगंधर्व चित्रपटाचा 10 वा वाढदिवस.

“संगीत रंगभूमीचा सुवर्णकाळ आम्हाला प्रत्यक्ष बघता आला आणि काही काळाकरीता का होईना प्रत्यक्ष जगता ही आला. त्या सर्वच कलाकारांनी केलेलं काम प्रचंड मोठं आहे, चित्रपटाच्या निमित्ताने आम्ही त्यांना आणि त्यांच्या कामाला सलाम करू शकलो. झपाटल्यासारखं काम करणं म्हणजे काय असतं ते या चित्रपटाच्या उत्तम टीममुळे अनुभवास आलं. अनेक कडू गोड प्रसंग या चित्रपटाने वाट्यास आले पण आयुष्यभर लक्षात राहील तो कादंबरी वाचल्यापासून ते चित्रपट पूर्ण होईपर्यंतचा प्रवास आणि या प्रवासातील आनंद हा अवर्णनीय आहे. ज्यांच्यामुळे हा चित्रपट करावासा वाटला त्या “बालगंधर्व” आणि त्यांच्या समकालीन सर्व दिग्गजांना मनापासून अभिवादन आणि ज्यांच्या बरोबर हा प्रवास केला त्या माझ्या अतिशय लाडक्या टीम वर मनापासून प्रेम.” असंही पुढे सुबोधने लिहिलं आहे.

हे वाचलं का?

या सिनेमाला मिळाळेल्या लवकरच सुबोध ‘संगीत मानापमान’ हे अजरामर नाटक रुपेरी पडद्यावर घेऊन येतोय. या सिनेमाचं नाव ‘मानापमान’ असून हा सिनेमा पुढील वर्षी दिवाळीत रिलीज होणार असल्याची चर्चा आहे.

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT