Mothers Dayच्या निमित्ताने जेनेलिया डिसूझाची सासूबाईंसाठी भावनिक पोस्ट
आज 9 मे म्हणजेच मदर्स डे. या मदर्सडे निमित्ताने अभिनेत्री जेनेलिया डिसुझाने आपली आई आणि सासूबाई यांना खास शुभेच्छा दिल्या आहेत. एक भावनिक पोस्ट लिहीत जेनेलियाने तिच्या भावना व्यक्त केल्या आहेत. यावेळी जेनेलियाने इन्स्टाग्रामवर दोन फोटो शेअर केलेत. यामधील पहिल्या फोटोमध्ये जेनेलिया, रियान, राहिल आणि जेनेलियाची आई आहे. तर दुसऱ्या फोटोमध्ये रियान, राहिल आणि जेनेलियाच्या […]
ADVERTISEMENT
आज 9 मे म्हणजेच मदर्स डे. या मदर्सडे निमित्ताने अभिनेत्री जेनेलिया डिसुझाने आपली आई आणि सासूबाई यांना खास शुभेच्छा दिल्या आहेत. एक भावनिक पोस्ट लिहीत जेनेलियाने तिच्या भावना व्यक्त केल्या आहेत.
ADVERTISEMENT
यावेळी जेनेलियाने इन्स्टाग्रामवर दोन फोटो शेअर केलेत. यामधील पहिल्या फोटोमध्ये जेनेलिया, रियान, राहिल आणि जेनेलियाची आई आहे. तर दुसऱ्या फोटोमध्ये रियान, राहिल आणि जेनेलियाच्या सासूबाई वैशाली देशमुख आहेत.
जेनेलिया तिच्या पोस्टमध्ये म्हणते, “आईमध्ये आपल्या मुलांसाठी नि:स्वार्थपणे आणि स्वतःला झोकून देत जगण्याची एक आश्चर्यकारक क्षमता असते. मुलांना ते स्वत: पालक होईपर्यंत त्याची जाणीव देखील नसते. हे असं काम आहे ज्यात कुठलीही विश्रांती नाही, सुट्टी नाही. आणि महत्त्वाचं म्हणजे सर्वात कमी कृतज्ञता किंवा गृहित धरण्याची वृत्ती.”
हे वाचलं का?
जेनेलिया पुढे म्हणते, “प्रिय आई, प्रिय मम्मा.. तुमच्याशिवाय मी काय केलं असतं हे मला समजत नाही. आणि मला ते जाणून देखील घ्यायचं नाही. मी तुमच्याशिवाय कामंच करु शकत नाही. तुम्ही तो खांदा आहात, ज्यावर मी कधीही डोकं टेकू शकते. मला माहित आहे मी तुम्हाला हे फार वेळा सांगितलं नसेन, पण मला तुम्हाला इतकंच सांगायचंय की, आय लव्ह यू आणि तुमच्यासाठी मी देवाचे रोज आभार मानते.”
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT