कतरिनाला कोरोनाची लागण; ‘टायगर 3’च्या शूटींगवर परिणाम नाही

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

देशात कोरोनाचे रूग्ण वाढतायत. बॉलिवूडच्या अनेक कलाकारांनाही कोरोनाने विळखा घातला आहे. अशातच काल अभिनेत्री कतरिना कैफला देखील कोरोनाची लागण झाल्याचं समोर आलं. यानंतर कतरिना आणि सलमानचा टायगर 3 सिनेमाच्या शूटींगवर परिणाम होणार अशा चर्चा रंगल्या होत्या. मात्र मिळालेल्या माहितीनुसार, कतरिना आणि सलमान खान यांच्या या चित्रपटाच्या शुटिंगवर कोणताही परिणाम होणार नाहीये.

ADVERTISEMENT

बॉलिवूड अभिनेत्री कतरिना कैफला कोरोनाची लागण

एका वेबसाईटने दिलेल्या माहितीनुसार, “टाइगर ३च्या शूटिंगमध्ये कोणत्याही प्रकारता बदल झालेला नाही. या सिनेमाचं शूटींग ठरलेल्या वेळेनुसारच होणार आहे. बॉलिवूड अभिनेता सलमान खान सध्या मुंबईमधील यशराज स्टुडिओमध्ये चित्रपटाचं शूटिंग करतोय. टाइगर 3चं कतरिना कैफचं शूटिंग 3 आठवड्यानंतर असणार आहे. यासंदर्भात असाच प्लॅन केला गेला होता. त्यामुळे टाइगर 3च्या शूटिंगला उशीर होणार नाही. सलमानचं शूटींग जोरदार सुरु आहे.”

हे वाचलं का?

दरम्यान सेटवर नियमाने दररोजची स्वच्छता तसंच क्रूची चाचणी सुरु आहे. सेट्स आणि उपकरणं ही सातत्याने स्वच्छ केली जातात. सरकारने जारी केलेल्या मार्गदर्शक सूचनांचंही काटेकोरपणे पालन केलं जातंय.

ADVERTISEMENT

ADVERTISEMENT

काल अभिनेत्री कतरिना कैफला कोरोनाची लागण झाल्याचं तिने सोशल मीडियाच्या माध्यमातून सांगितलं आहे. कतरिना तिच्या इन्स्टाग्राम पोस्टमध्ये म्हणाली, “माझा कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आलाय. मी स्वत:ला क्वारंटाईन केलं असून घरातच आयसोलेट राहणार आहे. मी माझ्या डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार सर्व प्रोटोकॉल पाळतेय. माझ्या संपर्कात आलेल्या सर्वांना मी विनंती करते की, त्यांनी त्यांची कोरोना टेस्ट करुन घ्यावी. सुरक्षित राहा आणि स्वत:ची काळजी घ्या.”

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT