Navarasa Trailer: मराठमोळी अभिनेत्री सई ताम्हणकरची तामिळ इंडस्ट्रीमध्ये दमदार एंट्री

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

मराठीसह हिंदी मनोरंजन विश्वातील प्रसिद्ध अभिनेत्री सई ताम्हणकर सध्या खूपच चर्चेत आली आहे. मराठी चित्रपटांतून आपल्या नावचा झेंडा फडकवणारी अभिनेत्री सई ताम्हणकर ‘समांतर 2’ या वेब सीरीजच्या घवघवीत यशाचा आनंद साजरा करत आहे. नुकताच सई ताम्हणकरचा ‘मिमी’ हा बॉलिवूड चित्रपट प्रदर्शित झाला आहे. आता सई ‘नेटफ्लिक्स’ या ओटीटी प्लॅटफॉर्मवरील ‘नवरसा’ या तमिळ सीरीजमध्ये देखील दिसणार आहे.

ADVERTISEMENT

या तमिळ वेब सीरीजचा ट्रेलर नुकताच प्रदर्शित झाला आहे. यामध्ये सीरीजमध्ये नऊ वेगवेगळ्या लोकांच्या वेगवेगळ्या कथा दाखवण्यात येणार आहेत. त्यातीलच एका कथेत सई ताम्हणकारची भूमिका असणार आहे. ‘नवरसा’च्या ट्रेलरमध्ये सईची छोटीशी झलक पहायला मिळाली आहे.ज्येष्ठ चित्रपट निर्माते मणिरत्नम आपल्या दमदार सिनेमासाठी प्रसिद्ध आहेत. सिनेमा जगात उत्कृष्ट चित्रपट मानल्या जाणार्‍या अशा अनेक चित्रपटांचे त्यांनी दिग्दर्शन व निर्मिती केली आहे. आता मणिरत्नम पुन्हा एकदा एका दमदार प्रोजेक्टसह ओटीटीवर आले आहेत. या वेब सीरीजमध्ये दक्षिणात्य सिनेमाचे ज्येष्ठ अभिनेते आणि अभिनेत्री असतील, जे या प्रोजेक्टला आणखी उंचावर नेतील. अलीकडेच ओटीटी प्लॅटफॉर्म नेटफ्लिक्सने मणिरत्नम यांच्या ‘नवरसा’ वेब सीरीजचा टीझर रिलीज केला आहे, ज्यात अनेक नामांकित अभिनेते आणि अभिनेत्री दिसत आहेत.नव’ म्हणजे 9 आणि ‘रसा’ म्हणजे मानवी भावना अर्थात राग, करुणा, धैर्य, द्वेष, भीती, हशा, प्रेम, शांती आणि आश्चर्य. मणिरत्नमचा नवा प्रकल्प ‘नवरसा’मध्ये मानवाच्या या 9 भावनांवर प्रकाश टाकला जाणार आहे. 9 जुलै रोजी नेटफ्लिक्सने या प्रोजेक्टचा टीझर लाँच केला आहे. या व्हिडीओमध्ये सूर्या सिद्धार्थ प्रकाश राज ,विजय सेतुपति ,रेवती ,ऐश्वर्या राजेश, इत्यादी बरेच कलाकार दिसतात. ही सर्व पात्र या व्हिडीओमध्ये खूपच जबरदस्त दिसत आहेत.

हे वाचलं का?

टीझर रिलीज होताच सोशल मीडियावर एकच कल्लोळ निर्माण झाला आहे. लाखो लोकांनी हा व्हिडीओ केवळ यूट्यूबवरच नव्हे तर इंस्टाग्रामवरही पाहिला आहे. ‘नवरसा’ सोशल मीडियावर ट्रेंड करत आहे. नुकताच नेटफ्लिक्सने या कल्पित कथाच्या 9 कथांचा पहिला लूक आपल्या सोशल मीडियावर प्रसिद्ध केला आहे. ज्यामध्ये सर्व कलाकार अतिशय दमदार लूकमध्ये दिसले आहेत. विशेष म्हणजे या प्रोजेक्टमधून होणारी कमाई मनोरंजन विश्वातील गरजू तंत्रज्ञ मंडळीना दिली जाणार आहे.

ADVERTISEMENT

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT