Sara Ali Khan चा असा लुक कधीही पाहिला नसाल!

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

ADVERTISEMENT

बॉलिवूड अभिनेत्री सारा अली खान हिचा खास अंदाज चाहत्यांना नेहमीच आकर्षित करतो. सारा बॉलिवूडमध्ये सध्या चर्चेत असणारी अभिनेत्री आहे. पण एवढ्या कमी वेळात मोठं यश मिळवणं हे काही सोप्पं नाही. पण साराने ते करुन दाखवलं आहे.

हे वाचलं का?

बॉलिवूडमध्ये आपली ओळख बनविण्यासाठी साराने अभिनयासोबत आपल्या फिटनेस आणि बॉडी शेपवर खूप मेहनत केली. आज प्रचंड फिट असणारी सारा ही एकेकाळी खूपच लठ्ठ होती. पण अभिनेत्री बननण्यासाठी तिने आपल्या फिटनेसवर खूप काम केलं.

ADVERTISEMENT

सारा आजच्या घडीला फक्त आपल्या अभिनयानेच नाही तर फिटनेसने देखील इतर अभिनेत्रींना जोरदार टक्कर देत आहे. क्रॉप टॉप असो वा बिकिनी लुक सारा आपली टोन्ड फिगर फ्लाँट करण्याची संधी अजिबात सोडत नाही.

ADVERTISEMENT

आता साराचे जिमच्या बाहेरील काही नवे फोटो समोर आले आहेत. नव्या फोटोमध्ये साराचा फिटनेस हा प्रचंड आश्चर्यकारक आहे. या नव्या फोटोमध्ये सारा खूपच फिट दिसत आहे. तिने आपलं प्रचंड वजन कमी केलं आहे.

नव्या फोटोंमध्ये सारा ही व्हाइट क्रॉप टॉप आणि पिंक हॉट पॅन्टमध्ये दिसून आली आहे. हे फोटो तिच्या जिम बाहेरचे आहेत. ज्यामध्ये ती नो मेकअप लुक आणि लूज हेअरमध्ये स्टनिंग दिसते आहे.

पण सारा या फोटोमध्ये तिचे अॅब्स आणि टोन्ड लेग्स फ्लाँट करत आहे. अनेकांच्या मते साराने जरा जास्तच वजन कमी केलं आहे.

साराचं सोशल मीडियावर खूप जबरदस्त फॅन फॉलोइंग आहे. त्यामुळे तिच्या या फोटोंना देखील प्रचंड लाइक्स मिळत आहे. ज्यामध्ये सारा ही कमालीची हॉट दिसत आहे.

साराने बॉलिवूडमध्ये आपली खास छाप सोडली असून आता तिला अनेक बड्या बॅनरचे चांगले सिनेमे ऑफर होत आहेत.

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT