कोरोनामुळे ‘शूटर दादी’ चंद्रो तोमर यांचं निधन

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

उत्तर प्रदेशमधील बागपतमध्ये शूटर दादी नावाने प्रसिद्ध असणाऱ्या निशानेबाज चंद्रो तोमर यांचं निधन झालं आहे. कोरोनामुळे त्यांचं निधन झालं अशल्याची माहिती आहे. शुक्रवारी मेरठमधील एका रुग्णालयात त्यांनी अखेरचा श्वास घेतला आहे. त्या ८९ वर्षांच्या होत्या.

ADVERTISEMENT

काही दिवसांपूर्वी चंद्रो तोमर यांचा कोरोना चाचणीचा अहवाल पॉझिटिव्ह आला होता. त्यांना बागपतच्या एका रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. याबाबत त्यांच्या ट्विटर अकाऊंटवरून माहिती देण्यात आली होती. श्वास घेण्यास त्रास होत असल्याने त्यांना रूग्णालयात दाखल केलं जात असल्याचं ट्विटमध्ये म्हटलं होतं. पण आज उपचारांदरम्यान त्यांचा मृत्यू झाला आहे.

चंद्रो तोमर यांच्या आयुष्यावर आधारीत ‘सांड की आँख’ नावाचा एक बॉलिवूड सिनेमाही बनवण्यात आलाय. अभिनेत्री तापसी आणि भूमी पेडणेकर यांनी या सिनेमात भूमिका साकारली आहे. दरम्यान तापसी आणि भूमीने ट्विटरवरून त्यांना श्रद्धांजली वाहिली आहे.

हे वाचलं का?

तापसी तिच्या ट्विटमध्ये म्हणते, “प्रेरणेसाठी तुम्ही नेहमीच माझ्या सोबत असाल. ज्या मुलींना तुम्ही जगण्याची आशा दिली त्या सर्व मुलींमध्ये तुम्ही जिवंत आहात. माझ्या क्युटेस्ट रॉकस्टार.. तुम्हाला शांती लाभो.”

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT