सूर नवा ध्यास नवा- आशा उद्याची’ कार्यक्रमाची सन्मिता धापटे – शिंदे ठरली महागायिका
कलर्स मराठीवरील ‘सूर नवा ध्यास नवा’ हा कार्यक्रम सुरु झाल्यापासून यातील स्पर्धकांनीनी आपल्या सुंदर गायकीने अवघ्या महाराष्ट्राची मने जिंकली आणि त्यांच्या निखळ, सुरेल स्वरांनी संपूर्ण महाराष्ट्राला एकत्र बांधून ठेवले. कार्यक्रमामधील गायकांनी विविध शैलींमधील गाणी उत्तम पद्धतीने सादर करून प्रत्येक भागामध्ये कॅप्टन्सची तसेच मंचावर आलेल्या विशेष अतिथींची देखील वाहवा मिळवली. या कार्यक्रमाला तसेच कार्यक्रमामधील स्पर्धकांना प्रेक्षकांचे […]
ADVERTISEMENT
कलर्स मराठीवरील ‘सूर नवा ध्यास नवा’ हा कार्यक्रम सुरु झाल्यापासून यातील स्पर्धकांनीनी आपल्या सुंदर गायकीने अवघ्या महाराष्ट्राची मने जिंकली आणि त्यांच्या निखळ, सुरेल स्वरांनी संपूर्ण महाराष्ट्राला एकत्र बांधून ठेवले. कार्यक्रमामधील गायकांनी विविध शैलींमधील गाणी उत्तम पद्धतीने सादर करून प्रत्येक भागामध्ये कॅप्टन्सची तसेच मंचावर आलेल्या विशेष अतिथींची देखील वाहवा मिळवली. या कार्यक्रमाला तसेच कार्यक्रमामधील स्पर्धकांना प्रेक्षकांचे भरभरून प्रेम मिळाले. १६ सुरेल गायिकांचा प्रवास सुरू झाला आणि या प्रवासामध्ये स्पर्धकांना बरेच काही शिकायला मिळाले आणि याच स्पर्धकांमधून कार्यक्रमाच्या मंचाला मिळाले अंतिम सहा शिलेदार अहमदनगरची सन्मिता धापटे – शिंदे, डोंबिवलीची प्रज्ञा साने, बारामतीची राधा खुडे, पुण्याच्या श्रीनिधी देशपांडे आणि रश्मी मोघे तसेच कोल्हापूरची संपदा माने. या स्पर्धकांमध्ये रंगला सूर नवा ध्यास नवा – आशा उद्याची कार्यक्रमाचा महाअंतिम सोहळा. महाअंतिम सोहळ्यामध्ये रंगली गाण्याची मैफल आणि रंगले विजेतेपद जिंकण्यासाठीचे संगीत युध्द… आणि या मधूनच महाराष्ट्राला मिळाली नवी आशा उद्याची…अहमदनगरची सन्मिता धापटे – शिंदे सूर नवा ध्यास नवाची महागायिका होण्याचा मान पटकावला. कलर्स मराठीतर्फे दोन लाख रुपये, मानाची सुवर्णकटयार तर द्वितीय क्रमांक कोल्हापूरची संपदा माने पटकावला तिला कलर्स मराठीतर्फे एक लाख रुपये आणि स्मृतिचिन्ह मिळाले. तृतीय क्रमांक बारामतीची राधा खुडे पटकावला तिला पंचाहत्तर रुपयांचा धनादेश आणि स्मृतिचिन्ह देण्यात आले.
ADVERTISEMENT
हे वाचलं का?
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT