Manoj Jarange Patil: ‘संघर्षयोद्धा’ चित्रपटात मनोज जरांगेंची भूमिका कोण साकारणार?
मराठा आरक्षणासाठी संघर्ष करत उपोषण आंदोलन करणारे मनोज जरांगे पाटील हे नाव आज प्रचंड चर्चेत आहे. मनोज जरांगे पाटील हे 29 ऑगस्ट पासून मराठा आरक्षणासाठी उपोषण आंदोलन करत आहे. जालना जिह्यातील त्यांच्या आंतरवाली सराटी गावातून त्यांनी हे उपोषण सुरु केले.
ADVERTISEMENT
Manoj Jarange Patil Movie : मराठा आरक्षणासाठी (Maratha Reservation) संघर्ष करत उपोषण आंदोलन करणारे मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) हे नाव आज प्रचंड चर्चेत आहे. ते 29 ऑगस्ट पासून मराठा आरक्षणासाठी उपोषण आंदोलन करत आहे. जालना जिह्यातील त्यांच्या आंतरवाली सराटी गावातून त्यांनी हे उपोषण सुरु केले. मनोज जरांगेंनी मराठा समाजाला आरक्षण मिळून देण्याकरिता जो लढा उभारत संघर्ष केला आहे याचा वेध सर्वांपर्यंत पोहोचण्यासाठी ‘संघर्षयोद्धा’ हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. (Who will play the role of Manoj Jarange Patil in Sangharsh yoddha Movie)
ADVERTISEMENT
या चित्रपटाचं चित्रीकरण जालना जिल्ह्यातील अंतरवाली सराटी येथे सुरू झालं असून याप्रसंगी स्वतः मनोज जरांगे पाटील, निर्माते, दिग्दर्शक आणि टीम आवर्जून उपस्थित होती. येत्या 26 एप्रिल 2024 ला हा चित्रपट संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित होणार आहे.
वाचा : सोलापुरात PM Modi च्या डोळ्यात पाणी, कंठ दाटला; म्हणाले, “लहानपणी…”
सोनाई फिल्म क्रिएशन या निर्मिती संस्थेतर्फे “संघर्षयोद्धा” – मनोज जरांगे पाटील या चित्रपटाची निर्मिती करण्यात येत आहे. चित्रीकरणाच्या पहिल्या दिवशी मनोज जरांगे पाटील यांची भूमिका साकारत असलेले रोहन पाटील, अभिनेता संदीप पाठक, सागर कारंडे, अरबाज शेख हे देखील उपस्थित होते.
हे वाचलं का?
गोवर्धन दोलताडे यांनी चित्रपटाची कथा आणि निर्मिती केली आहे, सुधीर निकम यांनी पटकथा आणि संवाद केले आहे, तर शिवाजी दोलताडे दिग्दर्शनाची जबाबदारी निभावत आहेत. चित्रपटात अभिनेत्री सुरभी हांडे, अभिनेते मोहन जोशी, श्रीनिवास पोकळे, संजय कुलकर्णी, माधवी जुवेकर, विजय मिश्रा, विनीत भोंडे, सुनील गोडबोले, जयवंत वाडकर यांच्या ही प्रमुख भूमिका आहेत.
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT
वाचा : Ajit Pawar Video : ‘लैच जहरी शब्द’, शरद पवारांच्या राष्ट्रवादीने केलं ट्रोल
महाराष्ट्रात मोठ्या संख्येनं असलेला मराठा समाज आर्थिक सक्षमतेअभावी शिक्षण, रोजगारात मागे पडत असल्याने या समाजाला आरक्षण देण्याची मागणी करण्यात येत आहे. या मागणीसाठी “एक मराठा, लाख मराठा” म्हणत २०१६ मध्ये राज्यभर भव्य मोर्चे निघाले होते. त्यानंतर राज्य सरकारने दिलेले आरक्षण न्यायालयात टिकले नाही.
या पार्श्वभूमीवर मराठा आरक्षणाच्या मागणीने पुन्हा जोर धरला आहे. त्यात आघाडीवर आहेत ते अंतरवाली सराटी या गावातील मनोज जरांगे पाटील… आंदोलन, उपोषणे करून त्यांनी आरक्षणाची मागणी लावून धरली आहे. त़्यांना राज्यभरातून तुफान पाठिंबा मिळत आहे.
वाचा : Khichdi Scam: संजय राऊतांना घेरण्याची तयारी! सोमय्यांनी दाखवले आकडे
अत़्यंत साध्या अशा या कार्यकर्त्याचा जीवनपट आणि आरक्षणासाठीचा संघर्ष समाजापर्यंत पोहोचवण्यासाठी “संघर्षयोद्धा” मनोज जरांगे पाटील या चित्रपटाची निर्मिती करण्यात येत आहे, ह्या चित्रपटाचं पोस्टर प्रदर्शित केल्या पासूनच लोकांमध्ये या चित्रपटाची खूपच उत्सुकता आहे , त्यामुळे सर्वसामान्य मराठा तरुणांमधून उभ्या राहिलेल़्या नेतृत्वाचं चित्रण या चित्रपटातून लोकांसमोर आता लवकरच येणार आहे.
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT