दिवंगत अभिनेता सुशांत सिंग राजपूतच्या छिछोरे चित्रपटाला पुरस्कार जाहीर झाला आहे. चित्रपटाचे प्रोड्युसर साजिद नाडियावाला यांनी हा पुरस्कार सुशांतला समर्पित केला आहे. छिछोरे चित्रपटाला निकलोडियन चॉईस अवॉर्ड 2020मध्ये फेवरेट चित्रपटाचा अवॉर्ड जिंकला आहे. साजिद नाडियावाला यांच्या प्रोडक्शन हाऊस नाडियावाला ग्रॅंडसन यांच्या ऑफिशियल ट्विटर अकाऊंटवरून ही माहिती देण्यात आली आहे.
Dedicating this Award to our #SushantSinghRajput. We love you Rockstar! ♥️
Thank you @niteshtiwari22 @ShraddhaKapoor & the brilliant team.
Honoured to receive Favourite Bollywood film for #Chhichhore, @NickIndia
– Heartfelt gratitude #SajidNadiadwala @WardaNadiadwala pic.twitter.com/BarsEU4JK1
— Nadiadwala Grandson (@NGEMovies) February 13, 2021
या ट्विटर पोस्टमध्ये नमूद केल्यानुसार, “अभिनेता सुशांत सिंग राजपूतला हा पुरस्कार समर्पित केला जातोय. आम्हाला तु खूप आवडतोस रॉकस्टार! नितेश तिवारी, श्रद्धा कपूर तसंच सिनेमाच्या टीमला शुभेच्छा. हा पुरस्कार आमच्या सिनेमाला मिळाला असल्याने आम्हाला गर्व वाटतोय.” अभिनेता सुशांतने या सिनेमामध्ये प्रमुख भूमिका साकारली होती. सुशांतसोबत अभिनेत्री श्रद्धा कपूर या सिनेमात झळकली होती. तर नितेश तिवारी यांनी चित्रपटाचं दिग्दर्शन केलं आहे.
छिछोरे सिनेमा लहान मुलांच्या संघर्षावर बनवण्यात आला आहे. ज्यामध्ये जीवनात कितीही अपयश आलं तरीही हार न मानण्याचा मेसेज देण्यात आला आहे. या सिनेमात सुशांतने अन्नीची भूमिका साकारली होती. गेल्यावर्षी छिछोरे सिनेमाला एक वर्ष पूर्ण झाल्यानंतर सिनेमाच्या टीमने इमोशनल व्हिडीयो शेअर करत सुशांतला श्रद्धांजली दिली होती.
14 जून 2020 रोजी बॉलिवूड अभिनेता सुशांत सिंग राजपूतने त्याच्या राहत्या घरी आत्महत्या केली होती. त्याच्या आत्महत्येने संपूर्ण देश हादरला होता. अजूनही त्याच्या मृत्यूमागील कारण समोर आलेलं नाही.