Paytm चा कार्यक्रमच झालाय.. पेमेंट बँक, वॉलेटमध्ये तुमचे पैसे असतील तर सगळ्यात आधी…
RBI Action on Paytm Payment Bank Limited : भारतीय रिझर्व्ह बँकने (RBI) बुधवारी (31 जानेवारी) पेटीएम पेमेंट बँक लिमिटेडवर अनेक निर्बंध लादले आहेत. मध्यवर्ती बँकेने प्रसिद्धीपत्रक जारी करून ही माहिती दिली आहे.
ADVERTISEMENT

RBI Action on Paytm Payment Bank Limited : भारतीय रिझर्व्ह बँकने (RBI) बुधवारी (31 जानेवारी) पेटीएम पेमेंट बँक लिमिटेडवर अनेक निर्बंध लादले आहेत. मध्यवर्ती बँकेने प्रसिद्धीपत्रक जारी करून ही माहिती दिली आहे. पेटीएम पेमेंट बँक लिमिटेड (पीपीबीएल) ने बँकेच्या मार्गदर्शक तत्त्वांचे पालन केले नसल्याचे एक्सटर्नल ऑडिटर्सच्या अहवालात उघड झाल्याचे आरबीआयने म्हटले आहे. (RBI Action on Paytm Payment Bank Limited Now What Will Happen With Users)
मार्च 2022 मध्ये, केंद्रीय बँकेने पेटीएम पेमेंट बँक लिमिटेडला नवीन ग्राहक जोडण्यास मनाई केली होती. तसंच, पेटीएमने याचे पालन केले नसल्याचे तपासणीत आढळून आले आहे. यामुळे मध्यवर्ती बँकेने पेटीएम पेमेंट बँक लिमिटेडवर अतिरिक्त निर्बंध लादले आहेत.
वाचा : Chhatrapati Sambhajiraje: ‘लोकसभा लढवायची असेल तर…’ संभाजीराजेंसमोर ‘मविआ’ने ठेवली विचित्र अट!
बुधवारी (31 जानेवारी) RBI ने पेटीएम पेमेंट बँक लिमिटेडच्या सर्व सेवांवर नवीन ठेवी आणि क्रेडिट व्यवहारांवर बंदी घातली आहे. आरबीआयने आपल्या प्रेस रिलीजमध्ये म्हटलं आहे की, कोणत्याही पेटीएम पेमेंट ग्राहकाच्या खात्यात कोणतीही ठेव किंवा क्रेडिट व्यवहार होणार नाहीत.
सामान्य यूजर्सवर काय होईल परिणाम?
आरबीआयच्या या गाईडलाईननंतर अनेक यूजर्सना त्यांच्या पेटीएम पेमेंट बँक खात्याचे काय होणार याची चिंता सतावत आहे. पण हे सोप्या भाषेत समजून घ्यावे लागेल. जर तुमचे बँक खाते पेटीएमवर असेल, तर ही तुमच्यासाठी निश्चितच चिंतेची बाब आहे. पण, आरबीआयने आदेश दिले आहेत की ग्राहक कोणत्याही निर्बंधाशिवाय पेटीएम बँकेतून त्यांचे पैसे काढू शकतात.
