व्लादिमीर पुतिन यांना निष्ठावंत येवजेनी प्रिझोझिनीने का दिला दगा? समजून घ्या
यापूर्वी जेव्हा रशियाने युक्रेनमधील डोनेस्तकवर कब्जा केला होता, तेव्हा प्रिगोझिनने वॅग्नर आर्मीला संपूर्ण श्रेय दिले आणि रशियन संरक्षण मंत्रालयावर वॅग्नरची भूमिका दडपण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप केला.
ADVERTISEMENT
Why Wagner Group Against Russia : गेल्या वर्षी 24 फेब्रुवारीला युक्रेनवर हल्ला करून अमेरिका, युरोप आणि नाटो देशांना खुले आव्हान देणारे रशियाचे बलाढ्य राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांच्यासमोर शनिवारी (24 जून) बंडाचं आव्हान उभं ठाकलं होतं. हे बंड रशियाच्या खाजगी लष्कर असलेल्या वॅग्नरने पुकारले होते, या गटाच्या सैन्याने एक शहर काबीजही केले होते आणि मॉस्कोच्या दिशेने कूच करण्याची घोषणा केली होती. त्यामुळे साऱ्या जगाच्या नजरा या बंडाला पुतिन कसे तोंड देणार याकडे लागलेल्या होत्या. तसेच पुतिन यांच्या अनेक दशकांच्या एककलमी सत्तेचा हा अंत आहे का? पण 24 तासांत पुतिन यांनी पुन्हा खेळ बदलला आणि जगाला संदेश दिला की जगाच्या पॉवर गेममध्ये अजूनही त्याचं स्थान अबाधित आहे. (What did the Wagner Group do in Russia?)
ADVERTISEMENT
रशियातील खासगी आर्मी असलेल्या वॅग्नरने पुकारलेले बंड 24 तासांत शमले, पण युक्रेनसोबत सुरू असलेल्या युद्धाच्या पार्श्वभूमीवर गेल्या 24 तासांत रशियात जे काही घडले, तो राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांच्यासाठी मोठा धक्का मानला जात आहे. रशियाच्या सत्तेवरील पुतिन यांची पकड कमकुवत होत आहे का, असा प्रश्नही यानिमित्ताने उपस्थित होत आहे.
खरंतर, वॅग्नर एक खासगी लष्करी गट आहे. वॅग्नर आर्मी युक्रेनमध्ये रशियन सैन्यासोबत युद्ध लढत आहे. गेल्या अनेक वर्षांपासून ते लष्करी आणि गुप्तचर कारवायांवरूनही वादात सापडले आहेत. वॅग्नर आर्मीवर मानवाधिकार उल्लंघनाचे आरोपही झाले आहेत.
हे वाचलं का?
24 तासांत रशियात काय घडलं? वॅग्नरने बंड केव्हा आणि का केले?
वॅग्नर आर्मी चीफ येवजेनी प्रिगोझिन हे एकेकाळी राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांचे सर्वात खास होते. पण आता प्रिगोझिन आणि रशियन सैन्य यांच्यात चकमक सुरू आहे. प्रिगोझिन यांनी 23 जून रोजी रशियाचे संरक्षण मंत्री सर्गेई शोइगु यांच्यावर गंभीर आरोप केले होते. रशियाच्या संरक्षणमंत्र्यांनी युक्रेनमधील वॅगनरच्या सैन्यावर रॉकेट हल्ला करण्याचे आदेश दिल्याचा दावा त्यांनी केला होता.
प्रिगोझिन म्हणाले होते की, या हल्ल्याचा बदला आपण रशियन संरक्षण मंत्र्यांकडून घेऊ आणि रशियन सैन्याने त्यात हस्तक्षेप करू नये. यानंतर, प्रिगोझिन आपल्या सैनिकांसह युक्रेनमधून परतले आणि रशियन सीमेकडे कूच करू लागले. 24 जून रोजी, प्रिगोझिनने दावा केला की, त्यांनी दक्षिणेकडील रशियन शहर रोस्तोव्ह ताब्यात घेतले आहे. यानंतर प्रिगोझिनने मॉस्कोकडे जाण्यास सुरुवात केली. मात्र, वॅग्नर लष्करप्रमुखांनी पुतिन यांचे नाव घेतले नाही.
ADVERTISEMENT
हेही वाचा >> पुतिन यांच्याविरोधात बंड, मोदींना इशारा; शिवसेनेने (UBT) सांगितला भारतातील वॅग्नर ग्रुप
यापूर्वी जेव्हा रशियाने युक्रेनमधील डोनेस्तकवर कब्जा केला होता, तेव्हा प्रिगोझिनने वॅग्नर आर्मीला संपूर्ण श्रेय दिले आणि रशियन संरक्षण मंत्रालयावर वॅग्नरची भूमिका दडपण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप केला.
ADVERTISEMENT
इतकेच नाही तर रशियाच्या संरक्षण मंत्रालयाने 11 जून रोजी वॅग्नर ग्रुपसह इतर सर्व खासगी लष्करातील सैनिकांना रशियन लष्करात सामावून घेण्याचे आदेश दिले होते. त्यासाठी जूनअखेर सर्वांना तडजोड करावी लागणार आहे. संरक्षण मंत्रालयाच्या या आदेशाकडे युक्रेन युद्धावर संपूर्ण नियंत्रण मिळवण्याचा प्रयत्न म्हणून पाहिले जात होते. अशा परिस्थितीत आम्ही असा कोणताही करार करणार नाही.आम्ही बहिष्कार टाकू, असे सांगत प्रिगोझिन यांनी निषेध केला होता.
पुतिन म्हणाले, “आमच्या पाठीत खंजीर खुपसला”
दुसरीकडे, प्रिगोझिनचे बंड पाहून पुतिन यांनी रशियाच्या जनतेला संबोधित केले. यादरम्यान पुतिन म्हणाले की, “आमच्या पाठीत खंजीर खुपसण्यात आला आहे आणि त्यांना याची शिक्षा दिली जाईल. आम्ही आमच्या लोकांच्या सुरक्षेसाठी लढत आहोत. आम्ही सशस्त्र बंडखोरांना चोख प्रत्युत्तर देऊ.” असं असलं तरी पुतिन यांनी त्यांच्या संबोधनात वॅग्नर आणि येवजेनी प्रिगोझिन यांचे नाव घेतले नाही.
मॉस्कोमध्ये आणीबाणी
व्लादिमीर पुतिन यांच्या संबोधनानंतर रशियन प्रशासनाने कृती सुरू केली. मॉस्कोमध्ये काउंटर टेररिझम स्टेट ऑफ इमर्जन्सी घोषित करण्यात आली. याशिवाय मॉस्को आणि आसपास दहशतवादी घटना घडण्याची शक्यता लक्षात घेऊन दहशतवादविरोधी अभियानही राबवण्यात आले. युक्रेनला लागून असलेल्या वोरोनेझ शहरातही आणीबाणी जाहीर करण्यात आली. रशियन सरकारने रोस्तोव आणि मॉस्को दरम्यानचा महामार्ग बंद केला आणि वॅग्नरच्या कार्यालयांवर छापे टाकण्यात आले.
बेलारूसची मध्यस्थी, प्रकर तहात मिटलं
आता रशियन सैन्य आणि वॅग्नर सैन्य समोरासमोर आले होते, पण नंतर व्लादिमीर पुतिन यांनी बेलारूसचे अध्यक्ष अलेक्झांडर लुकाशेन्को, उझबेकिस्तानचे अध्यक्ष शवकत मिर्झीयोयेव आणि कझाकिस्तानचे अध्यक्ष कॅसिम जोमार्ट तोकायेव यांच्याशी चर्चा केली. रशियाची अधिकृत वृत्तसंस्था TASS नुसार, बेलारूसच्या राष्ट्राध्यक्षांनी प्रिगोझिनला तह करण्याची ऑफर दिली. त्यानंतर तह झाला आणि येवजेनी प्रिगोझिनने सैन्य मागे घेण्याचा निर्णय घेतला. त्यांनी सांगितले की, त्यांचे सैनिक मॉस्कोपासून फक्त 200 किलोमीटर दूर आहेत. मात्र रक्तपात टाळण्यासाठी माघार घेण्याचा निर्णय घेतला आहे. 24 जूनच्या रात्री, वॅग्नर सैनिकांनी रोस्तोव्हमधील रशियन सैन्य कार्यालय सोडण्यास सुरुवात केली.
रशिया आणि वॅग्नर ग्रुपमध्ये काय झाला समझौता?
रशियन राष्ट्राध्यक्षांचे अधिकृत निवासस्थान असलेल्या क्रेमलिनचे प्रवक्ते दिमित्री पेस्कोव्ह यांनी सांगितले की, पुतीन यांच्या मंजुरीनंतरच लुकाशेन्को यांनी मध्यस्थीची ऑफर दिली. लुकाशेन्कोशी झालेल्या संभाषणानुसार, प्रिगोझिन बेलारूसला जाईल. त्यांनी सांगितले की, बंडखोरी प्रकरणात येवजेनी प्रिगोझिनवरील आरोप मागे घेतले जातील. तसेच वॅग्नर ग्रुपच्या सैनिकांवर कोणतीही कारवाई केली जाणार नाही. त्यांनी या संपूर्ण घटनेचे दु:खद वर्णन केले. यासोबतच या बंडात सहभागी न झालेले वॅग्नरचे सैन्य रशियन संरक्षण मंत्रालयाशी करार करून त्यांच्यासाठी काम करतील.
प्रिगोझिन कोण आहे? (Who is the owner of the Wagner Group?)
येवजेनी प्रिगोझिन यांना पुतिनचा स्वयंपाकी म्हणून ओळखले जाते. प्रिगोझिनचा जन्म 1961 मध्ये लेनिनग्राड (सेंट पीटर्सबर्ग) येथे झाला. वयाच्या 20 व्या वर्षी प्रिगोझिनचा प्राणघातक हल्ले, दरोडे आणि फसवणूक यासह अनेक प्रकरणांमध्ये पोलीस शोध घेत होते. त्यानंतर त्याला 13 वर्षांची शिक्षा झाली. मात्र, 9 वर्षांनंतरच तो तुरुंगातून बाहेर आला.
तुरुंगातून सुटल्यानंतर प्रिगोझिनने हॉट डॉग विकण्यासाठी स्टॉल लावायला सुरुवात केली. यात यश मिळाल्यानंतर त्याने एक महागडे रेस्टॉरंट उघडले. येवजेनीचे रेस्टॉरंट इतके प्रसिद्ध झाले की, लोक त्याच्या बाहेर रांगा लावायचे. लोकप्रियता वाढल्यावर रशियन राष्ट्राध्यक्ष पुतिन यांनी स्वत: विदेशी पाहुण्यांना या रेस्टॉरंटमध्ये नेण्यास सुरुवात केली.
हेही वाचा >> देवेंद्र फडणवीसांनी ‘गद्दारी’वरून डिवचले, शरद पवारांनी काढला सगळा इतिहास
हा तो काळ होता जेव्हा येवजेनी पुतिनच्या जवळ आले होते. यानंतर येवजेनी यांना सरकारी कंत्राटे देण्यात आली. प्रिगोझिनची भूमिका नेहमीच शंकास्पद राहिली आहे आणि त्यांनी कोणतीही राजकीय भूमिका घेण्याचे नाकारले, परंतु त्यांचा प्रभाव डिनर टेबलच्या पलिकडे पोहोचला होता.
प्रिगोझिन होता पुतिनचा उजवा हात
प्रिगोझिन हळूहळू पुतिनचा उजवा हात बनला. येवजेनीने रशियन सैन्यासह खाजगी सैन्य वॅग्नरचे नेतृत्व केले. अमेरिकेतील निवडणुकांमध्ये हस्तक्षेप असो किंवा आफ्रिका आणि मध्यपूर्वेतील युद्धासाठी सैनिक पाठवणे असो… पुतिन यांच्यावर वॅग्नरचा गैरवापर केल्याचा आरोपही आहे. 2017 पासून, येवजेनीच्या वॅग्नर आर्मीने माली, सुदान, मध्य आफ्रिकन रिपब्लिक, लिबिया आणि मोझांबिकमध्ये लष्करी हस्तक्षेपासाठी सैन्य तैनात केले आहे.
Video >> अजितदादांचे बोल खरे ठरणार? भगीरथ भालकेंसोबत किती जण राष्ट्रवादीतून BRS मध्ये जाणार?
येवजेनीला “मीटग्राइंडर” देखील म्हटले जाते. त्याऐवजी त्यांनी मला ‘पुतिनचा कसाई’ म्हणायला हवे होते, असे त्यांनी या वर्षाच्या सुरुवातीला म्हटले होते. पण जसजसे वॅग्नरला त्याच्या यशाचे श्रेय मिळू लागले तसतसे येवजेनीने रशियन सैन्यावर टीका करण्यास सुरुवात केली आणि युद्धाच्या प्रयत्नात त्यांच्या योगदानाबद्दल अधिक मान्यता देण्याची मागणी केली. मात्र, पुतिन आणि रशियन सैन्याला हे आवडले नाही. तथापि, त्याने आणि येवजेनीने आतापर्यंत एकमेकांवर थेट हल्ले करणे टाळले आहे. पण पुतिन यांनी वॅग्नर गटाला रशियन लष्कराच्या नियंत्रणाखाली आणण्याच्या हालचालीचे समर्थन केले आहे. युक्रेनसोबतच्या युद्धादरम्यान प्रिगोझिन सातत्याने रशियन सैन्यावर गंभीर आरोप करत आहेत.
निष्ठावंत बंडखोर कसा झाला?
आता प्रश्न एवढाच आहे की पुतिन यांचा हा विश्वासू सहकारी असे का करत आहे. काही तज्ञांचा असं म्हणणं आहे की, येवजेनी एक समांतर शक्ती बनू पाहत आहे, कदाचित त्याच्या जुन्या मित्राला सत्तेतून काढून टाकण्याच्या महत्त्वाकांक्षेने.
पुतिन यांनी यापूर्वीही शमवली आहेत बंड
रशियन सरकारशी करार केल्यानंतर, प्रिगोझिनचे सैन्य त्यांच्या छावणीत परत येत आहे. पुतिन यांच्याविरोधात अशा प्रकारची बंडखोरी काही पहिल्यांदाच झाली नाही. रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांना यापूर्वीही बंडाचा सामना करावा लागला आहे, परंतु प्रत्येक वेळी ते बंड दडपून आणि चिरडून पुढे गेले आहेत. गेल्या 23 वर्षांपासून हे सातत्याने सुरू आहे.
– 23 ऑक्टोबर 2002 रोजी पुतिन यांना बंडखोरीच्या आव्हानाने घेरले होते. त्या दिवशी, मॉस्कोच्या दुब्रोव्का थिएटरमध्ये प्रेक्षक नाटक पाहत होते आणि रात्री 9 च्या सुमारास अचानक हवेत गोळीबार झाला आणि 50 सशस्त्र हल्लेखोरांनी, ज्यात महिला होत्या, 850 लोकांना कैद केले. हे चेचन बंडखोर होते. त्यांची मागणी अशी होती की रशियन सैन्याने चेचन्यातून ताबडतोब आणि बिनशर्त माघार घ्यावी, अन्यथा ते ओलिसांना मारण्यास सुरुवात करतील. या हल्ल्यात 130 जणांचा मृत्यू झाला होता. मात्र, रशियन सैनिकांनी बंडखोरांना ठार केले. त्यांचं बंड मोडण्यात पुतिन यांना यश आले.
– 2005 पासून, पुतिन यांनी रशियाच्या सरकारवर नियंत्रण ठेवू शकणार्या उच्चभ्रूंवर कारवाई करण्यास सुरुवात केली. पुतिन यांनी लॉबीस्ट बोरिस बेरेझोव्स्की आणि तेल व्यापारी मिखाईल खोडोरकोव्स्की यांसारख्या उच्च प्रोफाइल लोकांवर मोठी कारवाई केली. मिखाईल खोडोरकोव्स्की यांना युकोस या तेल कंपनीच्या सीईओ पदावरून काढून टाकण्यात आले आणि तुरुंगात टाकण्यात आले.
त्यांना एकतर भ्रष्टाचाराच्या आरोपाखाली तुरुंगवास भोगावा लागला किंवा त्यांना देश सोडून जाण्यास भाग पाडले गेले. खोडोरकोव्स्कीने 2013 मध्ये स्वित्झर्लंडमध्ये आश्रय घेतला आणि त्याच वर्षी बोरिस बेरेझोव्स्की त्याच्या यूकेच्या घरी मृतावस्थेत आढळले.
बोरिस नेमत्सोव्ह हे रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांचे कठोर टीकाकार होते. 2014 मध्ये जेव्हा रशियाने युक्रेनच्या क्रिमियावर कब्जा केला तेव्हा त्यांनी पुतिन यांच्यावर उघडपणे टीका केली होती. रशियाने पूर्व युक्रेनवर केलेल्या हल्ल्याचा त्यांनी उघडपणे निषेध केला होता आणि भ्रष्टाचाराचा पर्दाफाश केला होता. 27 फेब्रुवारी 2015 रोजी, नेमत्सोव्हला क्रेमलिनपासून काही यार्डांवर गोळ्या घालून ठार मारण्यात आले. हत्येनंतर काही दिवसांनी, बोरिस युद्धाच्या विरोधात आंदोलनाचे नेतृत्व करणार होते.
2018 मध्ये आणखी एक बातमी आली, जी पुतिन यांनी बंडखोरी चिरडल्याचे उदाहरण म्हणून पाहिले जाते. माजी रशियन गुप्तहेर सर्गेई स्क्रिपल (66) आणि मुलगी युलिया (33) यांना इंग्लंडमध्ये विषबाधा झाली होती. सर्गेई स्क्रिपाल हे रशियन सैन्याचे निवृत्त अधिकारी होते, त्यानंतर 2006 मध्ये त्यांना हेरगिरीसाठी तुरुंगात पाठवण्यात आले होते. युरोपातील रशियन गुप्तचर एजंट्सची माहिती MI-16 या ब्रिटीश गुप्तचर संस्थेला दिल्याबद्दल सर्गेई स्क्रिपल दोषी आढळले होते.
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT