थोडासा दिलासा, राज्यात नव्या कोरोना रुग्णांच्या संख्येत काहीशी घट

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

मुंबई: मागील 24 तासात महाराष्ट्रात कोरोनाचे 8,744 नवे पॉझिटिव्ह रुग्ण सापडले आहे. गेल्या तीन दिवसातील ही रुग्णांची सर्वात कमी संख्या आहे. मागील तीन दिवसांपासून राज्यात 10 हजारांहून अधिक पॉझिटिव्ह रुग्ण आढळत होते. त्यामुळे आज कोरोना रुग्णांच्या संख्येत काहीशी घट झाली आहे. जी दिलासादायक बाब आहे. दरम्यान, गेल्या 24 तासात 22 कोरोना बाधितांनी आपले प्राण गमावले आहेत. सध्या राज्यातील मृत्यूदर हा 2.36 टक्के एवढा आहे. सध्या राज्यात 97,637 ॲक्टिव्ह रुग्ण आहेत.

दुसरीकडे एक चांगली बाब म्हणेज आज राज्यात 9,068 कोरोना रुग्ण हे बरे होऊन घरी परतले आहेत. राज्यात आतापर्यंत 20,77,112 कोरोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. त्यामुळे रिकव्हरी रेट हा 93.21 टक्के इतका आहे.

आज मुंबईत 1014 रुग्ण सापडले आहेत. तर पुण्यात 1030 नवे रुग्ण आढळून आले आहेत. तर नागपूरमध्ये 1396 आणि अमरावतीमध्ये 435 नवे रुग्ण सापडले आहेत.

हे वाचलं का?

ADVERTISEMENT

कोरोना रूग्ण वाढू लागल्याने औरंगाबादमध्ये १० दिवसांचा Lockdown

राज्यात आतापर्यंत 2,22,8471 जणांना कोरोनाची लागण झाली आहे.

ADVERTISEMENT

त्यापैकी 20,77, 112 रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत.

ADVERTISEMENT

राज्यात आतापर्यंत कोरोनामुळे 52,500 जणांचा मृत्यू झाला आहे.

सध्या राज्यात 97,637 कोरोनाचे अॅक्टिव्ह रुग्ण आहेत.

दरम्यान, आजपर्यंत तपासण्यात आलेल्या 1,69,38,227 नमुन्यांपैकी 22,28,471 (13.16 टक्के ) नुमने हे पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात 4,41,702 जण होम क्वारंटाईनमध्ये आहेत तर 4,098 जण संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत.

राज्यात मागील काही दिवसांपासून सतत रुग्णांची संख्या वाढत असल्याने प्रशासन देखील चिंतेत आहे. त्यामुळे अनेक ठिकाणी संचारबंदी करण्यात आली आहे. तर काही जिल्ह्यात लॉकडाऊनचा पर्याय देखील स्वीकारला गेला आहे. मात्र तरीही राज्यातील कोरोनाचे रुग्ण हे वाढतच आहे. त्यामुळे आता वाढत्या कोरोना रुग्णांना नेमका आळा कसा घालायचा अशा प्रश्न राज्य सरकारसमोर आहे. अशावेळी आता मुख्यमंत्री उद्धव ठाकरे नेमका काय निर्णय घेणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

    follow whatsapp

    ADVERTISEMENT