Mumbai Tak /बातम्या / Sambhajiraje यांनी आरोग्यमंत्र्यांच्या मतदारसंघात काढले आरोग्य विभागाचे वाभाडे
बातम्या राजकीयआखाडा

Sambhajiraje यांनी आरोग्यमंत्र्यांच्या मतदारसंघात काढले आरोग्य विभागाचे वाभाडे

Sambhajiraje Chhatrapati | Dharashiv :

धाराशिव : आरोग्यमंत्री तानाजी सावंत (Tanaji Sawant) यांच्या मतदारसंघातील आरोग्य यंत्रणाच व्हेंटिलेटरवर असल्याचा आरोप माजी खासदार आणि स्वराज्य संघटनेचे प्रमुख संभाजीराजे छत्रपती (Sambhajiraje Chhatrapati) यांनी केला. संभाजीराजे छत्रपती सध्या धाराशिव (Dharashiv) जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहेत. स्वराज्य संघटनेच्या (Swarajya Origination) शाखांचे उद्घाटन आणि पक्षविस्तार असा कार्यक्रम त्यांनी हाती घेतला आहे. या दरम्यानच संभाजीराजे यांनी नुकतंच भूम शहरातील शासकीय रुग्णालयात अचानक भेट देत आरोग्य यंत्रणेचा पंचनामा केला. (A surprise visit and inspection by Chhatrapati Sambhaji Raje at the government hospital in Bhum city.)

भुम ग्रामीण रुग्णालयाला भेट देत संभाजी महाराज यांनी तिथल्या संपूर्ण परिस्थितीचा आणि सोयी सुविधांचा आढावा घेतला. यानंतर पत्रकार परिषद घेऊन त्यांनी आरोग्य विभागाला कारभार सुधारण्याचा इशारा दिला. ते म्हणाले की आम्ही काही सहन करु, मात्र आरोग्य विभाग आणि प्राथमिक केंद्र यांची दुरावस्था सहन करणार नाही. तसंच तुम्ही काही केलं नाही तर मी दाखवतो असं म्हणतं अल्टिमेटमही दिला.

Shashikant warishe: अजित पवारांनी दाखवली जाहिरात; देवेंद्र फडणवीस म्हणाले..

संभाजीराजे यांनी रुग्णालयात भेट दिल्यानंतर तिथं डॉक्टर, नर्स यांची कमतरता असल्याचा दावा केला. तसंच अनेक ठिकाणी अस्वच्छता आहे, स्वच्छता गृहात पाणी नाही, अनेक मशीन्स बंद असून त्या धुळखात आहेत. डॉक्टर, कर्मचाऱ्यांच्या निवासस्थानी घाणीचे साम्राज्य आहे, असं म्हणाले. तसंच यावेळी रुग्णांनीही अनेक व्यथा संभाजीराजे छत्रपतींपुढे मांडल्या.

Maharashtra Political Crisis: राज्यपालांच्या निर्णयावरूनच सुप्रीम कोर्टात घमासान

काय म्हणाले संभाजीराजे छत्रपती?

पंचनाम्यामध्ये आरोग्यमंत्र्यांच्या मतदारसंघातील प्राथमिक आरोग्य केंद्राची दुरावस्था समोर आली आहे. आरोग्यमंत्र्याच्या मतदारसंघातच आरोग्य केंद्राची अवस्था अत्यंत वाईट आहे. आरोग्याचे विषय गांभीर्याने घ्या, अन्यथा मी बघून घेईल असा दमच संभाजीराजे छत्रपती यांनी सरकारला भरला आहे. आरोग्य खात्याच्या दुरावस्थेबाबत राज्याचे मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री यांना पत्र लिहून तक्रार करणार असल्याचेही छत्रपती संभाजी राजे यांनी सांगितलं.

खरंच केसांच्या पिनने कुलूप उघडतं का? समजून घ्या कसं बाबाची एकच चर्चा!गरम तव्यावर बसून भक्तांना आशिर्वाद Palak Tiwari: पलक तिवारीच्या बोल्ड लुकची एकच चर्चा प्रसिद्ध अभिनेत्री आकांक्षा दुबेची आत्महत्या इजिप्तमधल्या गर्लफ्रेंडसोबत सीक्रेट वेडिंग, आता अभिनेता बनला पिता…. IPL five new rules : आता आणखी मजा येणार, पाच नवे नियम आयपीएलचा गेम बदलणार mumbai local mega block today : मुंबईकरांनो, सुट्टीचा प्लान आहे, मग लोकलचे वेळापत्रक जाणून घ्या प्रियकराला विष दिलं नंतर फोनवर म्हणाली, ‘मेला नाहीस तर गळफास घे’ Health Tips: ‘या’ आजारांमध्ये लसूण खाणं ठरू शकतं खतरनाक Janhvi Kapoor: जान्हवीची ग्लॅमरस बोल्ड अदा, पण झाली ट्रोल; यूजर्स म्हणाले प्लॅास्टिक… बागेश्वर बाबासोबत ‘ही’ तरूणी अडकणार लग्नबंधनात? जेव्हा चालू लेक्चरमध्ये विद्यार्थ्याने चक्क बनवला मसाला डोसा, प्राध्यापकही झाले हैराण Kapil Sharma च्या ऑनस्क्रीन गर्लफ्रेंडचा हॉट आणि बोल्ड लूक IPL ची पहिली मॅच केव्हा झालेली? सर्वात जास्त धावा करणारा खेळाडू कोण? रक्षकच बनले भक्षक! पोलिसांचाच गॅगरेप पिडितेवर बलात्कार Uttar Pradesh: महिलेच्या हत्येचे गूढ 9 वर्षांनंतर एका पोपटाने उलगडलं… Shraddha Arya: बॉलिवूड अभिनेत्रीने पतीच्या वाढदिवसाला घातली बिकिनी, नेटकरी म्हणाले… प्रसुतीनंतर अभिनेत्रीचं अविश्वसनीय ट्रान्सफॉर्मेशन, घटवलं 10 किलो वजन! Amrita Ahuja: हिंडेनबर्गच्या अहवालात भारतीय वंशीय महिलेचं नाव, गंभीर आरोप 38 कोटींचा बेवारस चेक परत केला अन् जे मिळालं त्याने पायाखालची जमीन सरकली