भारतीय लष्कराने कश्मिरात पकडलेल्या दहशतवाद्याने केला मोठा खुलासा

भारतीय सैन्यांनी नौशेरा येथे पकडलेल्या दहशतवाद्याने केला मोठा खुलासा
भारतीय लष्कराने कश्मिरात पकडलेल्या दहशतवाद्याने केला मोठा खुलासा

नौशेरा येथे घुसखोरीचा प्रयत्न करताना भारतीय सैन्याने जिवंत पकडलेल्या पाकिस्तानी दहशतवाद्याने अनेक मोठे खुलासे केले आहेत. पाकिस्तानच्या गुप्तचर संस्थेच्या कर्नलने त्याला ३० हजार रुपये दिल्याचे त्याने सांगितले आहे. त्याला भारतात आत्मघाती हल्ला करण्यासाठी पाठवण्यात आले होते. भारतीय लष्कराच्या चौकीवर हल्ला करण्यासाठी तो भारतात आल्याचे दहशतवाद्याने सांगितले.

भारतीय जवानांनी दिल्या तीन रक्ताच्या बाटल्या

तबरक हुसेन असे भारतीय लष्कराने पकडलेल्या दहशतवाद्याचे नाव आहे. हुसेन हा पाकव्याप्त काश्मीर (पीओके) येथील कोटली येथील सब्जकोट गावचा रहिवासी आहे. हुसेनला रविवारी नौशेरा सेक्टरमध्ये पकडण्यात आले. त्यालाही दोन गोळ्या लागल्या असून त्यांची प्रकृती चिंताजनक आहे. त्याचा जीव वाचवण्यासाठी भारतीय लष्कराच्या जवानांनी रक्ताच्या तीन बाटल्या दिल्या.

हुसेन कसा पकडला गेला?

ब्रिगेडियर कपिल राणा यांनी सांगितले की, 21 ऑगस्ट रोजी सकाळी झांगरमध्ये दोन ते तीन दहशतवाद्यांच्या हालचालींचा शोध लागला. हे दहशतवादी सीमेपलीकडून एलओसी ओलांडण्याचा प्रयत्न करत होते. त्यांनी सांगितलं की हुसैन भारतीय पोस्टच्या अगदी जवळ आला होता आणि कुंपण कापत होता. त्याला हे करताना पाहून सैनिकांनी त्याला पकडण्याचा प्रयत्न केला, मात्र तो पळू लागला. त्यानंतर सैनिकांनी त्याच्यावर गोळीबार करून त्याला पकडले. इतर दोन दहशतवादी तिथून पळून जाण्यात यशस्वी ठरले.

दहशतवाद्याने कोणते खुलासे केले?

ब्रिगेडियर राणा यांनी सांगितले की, चौकशीदरम्यान दहशतवाद्याने कबुली दिली आहे की तो भारतीय लष्कराच्या चौकीवर हल्ला करण्यासाठी आला होता. पाकिस्तानच्या गुप्तचर संस्थेच्या कर्नल युनूस चौधरी याने त्याला पाठवल्याचे हुसैन याने सांगितले आहे. त्याला ३० हजार रुपये (पाकिस्तानी चलन)ही देण्यात आले. हुसैनने खुलासा केला आहे की त्याने उर्वरित दहशतवाद्यांसोबत इंडियन फॉरवर्ड पोस्टची दोन ते तीन वेळा रेकी देखील केली होती.

हुसेन यापूर्वीही पकडला गेला आहे

तबरक हुसेन याचे वय 32 वर्षे आहे. त्याने यापूर्वीही भारतात घुसखोरीचा प्रयत्न केला होता, मात्र तो पकडला गेला होता. लष्कराने सांगितले की, 25 एप्रिल 2016 रोजी हुसैन हा त्याचा लहान भाऊ हारून अलीसोबत घुसखोरी करत होता, तेव्हा त्याला पकडण्यात आले. 26 महिने कैदेत ठेवल्यानंतर त्याची सुटका करण्यात आली. हुसेन हा पाकिस्तानी लष्कराच्या इंटेलिजन्स युनिटमध्ये काम करायचा.

Related Stories

No stories found.
Mumbai Tak
www.mumbaitak.in