Sangli : अबब... एकट्याने फोडली तब्बल 'इतकी' घरं; 36 लाखांची जमवली माया - Mumbai Tak - a thief who stole from 16 places in sangli kolhapur and satara districts has been arrested by the team of the local crime investigation department of sangli - MumbaiTAK
गुन्ह्यांची दुनिया बातम्या

Sangli : अबब… एकट्याने फोडली तब्बल ‘इतकी’ घरं; 36 लाखांची जमवली माया

सांगली : सांगली, कोल्हापूर आणि सातारा जिल्ह्यात तब्बल १६ ठिकाणी घरफोड्या करणाऱ्या एका चोरट्याला सांगलीच्या स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाच्या पथकाने शिताफीने जेरबंद केले आहे. रमेश रामलिंग तांबारे (वय 46 , रा. दत्तनगर, पलूस जि. सांगली ) असं या आरोपीचं नाव आहे. यावेळी त्याच्याकडून परवानाधारक रिव्हॉल्व्हर सह 2 किलो चांदी आणि 64 तोळे सोने असा 36 […]
Updated At: Mar 24, 2023 01:39 AM

सांगली : सांगली, कोल्हापूर आणि सातारा जिल्ह्यात तब्बल १६ ठिकाणी घरफोड्या करणाऱ्या एका चोरट्याला सांगलीच्या स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाच्या पथकाने शिताफीने जेरबंद केले आहे. रमेश रामलिंग तांबारे (वय 46 , रा. दत्तनगर, पलूस जि. सांगली ) असं या आरोपीचं नाव आहे. यावेळी त्याच्याकडून परवानाधारक रिव्हॉल्व्हर सह 2 किलो चांदी आणि 64 तोळे सोने असा 36 लाख 31 हजारांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे. (A thief who stole from 16 places in Sangli, Kolhapur and Satara districts has been arrested by the team of the local crime investigation department of Sangli.)

यासंदर्भात कोल्हापूर परिक्षेत्राचे पोलीस महानिरिक्षक सुनील फुलारी यांनी या आरोपीच्या अटकेनंतर घेतलेल्या पत्रकार परिषदेत याबाबत माहिती दिली.

सांगली शहरासह जिल्ह्याच्या विविध भागात मागील काही दिवसांपासून घरफोड्यांच्या घटनांमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. घरासह रुग्णालय आणि बंद औषध दुकानंही फोडण्याच्या घटना वाढत होत्या. त्याचा तपास स्थानिक गुन्हे अन्वेषण पथक मागील काही महिन्यांपासून पथक करत होते. या कर्मचाऱ्यांना घरफोडी करणारा एकजण विना क्रमांकाच्या दुचाकीवरून चोरीचे सोने विक्री करण्यासाठी माधवनगर बायपास परिसरात येणार असल्याची माहिती मिळाली.

Crime: पत्नीचा एक टोमणा, पतीने कुऱ्हाडीने केले तुकडे, बाळालाही संपवलं

त्यानुसार पोलिसांनी सापळा रचून संशयास्पद वावरणाऱ्यास ताब्यात घेतले. त्याची झडती घेतली असता त्याचे पँटचे खिशात सोन्याचे दागिने तसेच दुचाकीच्या डिक्कीत 16 तोळे वजनाचे सोन्याचे दागिने, 1 किलो 355 ग्रॅम वजनाचे चांदीचे दगिने, चांदीची भांडी आणि 1 पिस्तुल असा मुद्देमाल आढळून आला आहे. त्याला अटक करून त्याच्या घराची झडती घेतली असता 64 तोळे सोने, 2 किलो चांदी असा इतर मुद्देमाल पोलिसांनी ताब्यात घेतला, अशी माहिती कोल्हापूर विभागाचे पोलीस महानिरीक्षक सुनील फुलारी यांनी पत्रकार परिषदेत दिली आहे.

Magic Moments vs Smirnoff Vodka: लोकांच्या आवडत्या Vodka मध्ये ‘हा’ आहे फरक? भारतातील ती 10 शहरे… जिथे आहेत सर्वाधिक अब्जाधीश; मुंबईचा नंबर…? आईचा मृत्यू अन्… 144 किलोच्या महिलेने घटवलं 75 किलो वजन! रश्मिकानंतर आता दुसऱ्या हिरोईनसोबत रणबीरचे ‘ते’ सीन्स! मुलींमधील ‘हे’ विशेष गुण पाहून मुलं होतात आकर्षित… IPL च्या इतिहासात सर्वाधिक षटकार ठोकणारे ‘ते’ 5 खेळाडू कोण? Film पाहण्याची आवड आहे? मग ‘हे’ प्रेरणादायी चित्रपट एकदा बघाच! Belly Fat कमी करण्यासाठी अगदी सिंपल डाएट प्लान! हिवाळ्यात आळस न करता Weight Loss साठी घरीच करा ‘या’ सोप्या गोष्टी! UPSC : चार वेळा अपयश, पण मानली नाही हार; IRS अधिकारी प्रेरणादायी स्टोरी 144 किलोच्या महिलेने घटवलं 75 किलो वजन; खायची फक्त ‘या’ 8 गोष्टी… चाळीशीतही हॉट आणि फीट! अभिनेत्री nimrat kaur च्या फिटनेसचा विषयच नाही Vacation प्लान करताय? मग भारतातच अनुभवा हे विदेशी सौंदर्य! Weight Loss साठी ‘हा’ स्पेशल चहा एकदा पिऊनच पाहा! अंथरुणावर पडल्यावर लगेच झोप येते असेल तर वेळीच सावध व्हा… ही 5 फळे किडनीसाठी असतात फायदेशीर रक्तातील शुगर कधीच वाढणार नाही, फक्त एवढंच करा Vicky Kaushal वर सचिन तेंडुलकर इम्प्रेस; कारण… Alcohol चा रिकाम्या पोटी कसा होतो परिणाम? ‘या’ 5 गोष्टी खाऊन चुटकीसरशी घटवा Belly Fat!