बीड: जुगार खेळणारे ते मास्तर नेमके कोण?, जाणून घ्या संपूर्ण प्रकरण काय...

Beed Crime: बीड पोलिसांनी जुगाराच्या अड्ड्यावर केलेल्या छापेमारीत पाच शिक्षकांना अटक करण्यात आली होती. आता या पाचही शिक्षकांना निलंबित करण्यात आलं आहे.
in beed police caught 5 teachers gambling in raid all suspended
in beed police caught 5 teachers gambling in raid all suspended (प्रातिनिधिक फोटो)

रोहिदास हातागळे, बीड: बीडमध्ये जुगाराच्या अड्ड्यावर मारलेल्या छाप्यात तब्बल 5 शिक्षकांना अटक करण्यात आली. ही कारवाई इथेच थांबली नाही तर पाचही शिक्षकांवर थेट निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे. ज्यामध्ये तीन शिक्षक हे जिल्हा परिषेदेचे आहेत. त्यामुळे जुगाराचा नाद शिक्षकांना चांगलचं भोवल्याचं यावेळी पाहायला मिळालं आहे.

नेमकं काय घडलं?

बीडमधील एका जुगार अड्यावर पडलेल्या छाप्यामध्ये तब्बल 5 शिक्षकांना पकडण्यात आलं. एवढंच नव्हे तर त्यांच्याविरोधात गुन्हा देखील दाखल झाला. ज्यानंतर 5 शिक्षकांना जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अजित पवार यांनी निलंबित केले आहे. यामध्ये 3 जण जिल्हा परिषदेचे तर 2 जण खाजगी संस्थेचे शिक्षक आहेत.

28 डिसेंबर रोजी बीड शहरालगत एका जुगार अड्ड्यावर पोलिसांनी छापा टाकला होता. याप्रकरणी बीड ग्रामीण पोलीस ठाण्यात भाजप जिल्हाध्यक्षासह 50 जणांवर गुन्हे दाखल करण्यात आले होते. याच प्रकरणात जिल्हा परिषदेच्या 5 शिक्षकांचा समावेश असल्याचेही यावेळी समोर आलं होतं.

दोनच दिवसापूर्वी जिल्हा परिषद प्रशासनाने छाप्यात पकडण्यात आलेल्या सर्व शिक्षकांची माहिती पोलिसांकडून मागवून घेतली होती. त्यानंतर गुरुवारी रात्री उशिरा या पाचही शिक्षकांवर निलंबनाची कारवाई करण्यात आली.

जुगार खेळणाऱ्या 'या' शिक्षकांवर निलंबनाची कारवाई

अखिल भारतीय प्राथमिक शिक्षक संघाचे जिल्हाध्यक्ष तथा शिक्षक हरिदास जनार्धन घोगरे (रा. नंदनवन कॉलनी, बीड), प्राथमिक शिक्षक संघ जिल्हाध्यक्ष भगवान आश्रुबा पवार (रा. काळेगाव हवेली ता.बीड), भास्कर विठ्ठल जायभाय (रा. काकडहिरा ता. पाटोदा), अशोक रामचंद्र सानप, (रा. कालिकानगर, बीड) आणि बंडू किसन काळे (रा. कालिकानगर, बीड) अशी निलंबित करण्यात आलेल्या शिक्षकांची नावे आहेत.

in beed police caught 5 teachers gambling in raid all suspended
बीड : भाजप जिल्हाध्यक्षाच्या जागेवर चालणाऱ्या जुगार अड्ड्यावर छापा, ७५ लाखांचा मुद्देमाल जप्त

दरम्यान, या कारवाईने शिक्षण क्षेत्रात मात्र चांगलीच खळबळ उडाली आहे. जिल्हा परिषदेने केलेल्या या कारवाईमुळे संबंधित शिक्षकांना कायमची अद्दल घडली असल्याचं यानिमित्ताने पाहायला मिळालं आहे.

बीडमध्ये मोठ्या प्रमाणावर जुगाराचे अड्डे सुरु असल्याने बीड पोलिसांनी मागील काही दिवसांपासून या अड्ड्यांवर छापेमारी सुरु केली आहे. अशाच एका छापेमारीत हे पाचही शिक्षक सापडले होते. ज्यांच्यावर निलंबनाची कारवाई करुन जिल्हा परिषद प्रशासनाने यापुढे शिक्षकी पेशाला काळीमा फासणाऱ्या कोणाचीही हयगय केली जाणार नाही असाच सगळ्यांना इशारा दिला आहे.

जाणून घ्या संपूर्ण प्रकरण काय आहे:

बीड जिल्ह्याचे भाजप अध्यक्ष राजेंद्र मस्के यांच्या जागेवर सुरु असलेल्या जुगार अड्ड्यावर पोलिसांनी काही दिवसांपूर्वी छापा मारुन धडक कारवाई केली होती. सहाय्यक पोलीस अधिक्षक पंकज कुमावत यांच्या पथकाने ही कारवाई केली होती. मध्यरात्री मारलेल्या या छाप्यात पोलिसांनी 48 जुगाऱ्यांना अटक केली होती.

या कारवाईत पोलिसांनी रोख रकमेसह अलिशान कार, मोबाइल असा 75 लाखांचा मुद्देमाल जप्त केला होता. पोलिसांनी या प्रकरणी जिल्हाध्यक्ष राजेंद्र मस्के यांच्यासह 50 जणांवर गुन्हा दाखल केला होता. पोलिसांच्या या कारवाईमुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडाली होती.

दरम्यान, राजेंद्र मस्के यांनी पोलीस कारवाईदरम्यान आपल्यावर झालेले सर्व आरोप फेटाळले होते. मस्के यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना आपला जुगार अड्ड्याशी कोणताही संबंध नसल्याचं सांगितलं होतं. 'ज्या जागेवर पोलिसांनी कारवाई केली ती जागा माझ्या मालकीची नाही. ती जागा माझा भाऊ मदन मस्के याची आहे. सत्ताधाऱ्यांमार्फत या प्रकरणात मला गोवलं जात आहे. पोलिसांनी यात कसलीही चौकशी न करता माझ्यावर गुन्हा दाखल केला आहे. याविरुद्ध आपण न्यायालयात दाद मागणार आहोत.' असं मस्के यांनी सांगितलं होतं.

Related Stories

No stories found.
Mumbai Tak
www.mumbaitak.in