Groundwater: देशातील 80 टक्के लोक पित आहेत विषारी पाणी; सरकारची संसदेत धक्कदायक माहिती

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

देशातील पाण्याचा दर्जा खालावत असल्याचे सरकारने संसदेत मान्य केले आहे. राज्यसभेकेंद्र सरकारने दिलेली आकडेवारी धक्कादायकच तर आहेच, पण भीतीदायक देखील आहे. या आकडेवारीनुसार आपण आजवर जे पाणी पीत आलो ते ‘विषारी’ आहे. देशातील बहुतेक सर्वच जिल्ह्यांमध्ये भूजलामध्ये विषारी धातूंचे प्रमाण जास्त असल्याचे आढळून आले आहे.

Ground Water बाबत देशातील आकडेवारी काय सांगते?

– 25 राज्यांतील 209 जिल्ह्यांतील काही भागात भूजलात आर्सेनिकचे प्रमाण 0.01 मिलीग्राम प्रति लिटरपेक्षा जास्त आहे.

– 29 राज्यांतील 491 जिल्ह्यांतील काही भागात भूजलात लोहाचे (Iron) प्रमाण 1 मिलीग्रॅम प्रति लिटरपेक्षा जास्त आहे.

हे वाचलं का?

ADVERTISEMENT

– 11 राज्यांतील 29 जिल्ह्यांतील काही भागात भूजलात कॅडमियमचे प्रमाण 0.003 मिलीग्राम प्रति लिटरपेक्षा जास्त असल्याचे आढळून आले आहे.

– 16 राज्यांतील 62 जिल्ह्यांतील काही भागात भूजलात क्रोमियमचे प्रमाण 0.05 मिलीग्राम प्रति लिटरपेक्षा जास्त आहे.

ADVERTISEMENT

– 18 राज्यांमधील 152 जिल्हे असे आहेत की जेथे भूजलात 0.03 मिलीग्राम प्रति लिटरपेक्षा जास्त युरेनियम आढळले आहे.

ADVERTISEMENT

देशातील 80 टक्के लोकसंख्या पित आहे विषारी पाणी

जलशक्ती मंत्रालयाच्या एका अहवालानुसार, देशातील 80 टक्क्यांहून अधिक लोकसंख्येला जमिनीतून पाणी मिळते. त्यामुळे भूजलातील घातक धातूंचे प्रमाण निर्धारित प्रमाणापेक्षा जास्त असल्याने पाणी ‘विषारी’ बनत आहे.

पिण्याच्या पाण्याचे स्रोत प्रदूषित झालेल्या भागांची संख्याही सरकारने राज्यसभेत दिली आहे. त्यानुसार 671 भागात फ्लोराईड, 814 भागात आर्सेनिक, 14,079 भागांमध्ये लोह, 9,930 भाग क्षारयुक्त, 517 क्षेत्रे नायट्रेट आणि 111 क्षेत्र जड धातूंनी बाधित आहेत.

ही समस्या शहरांपेक्षा खेड्यांमध्ये अधिक गंभीर आहे, कारण भारतातील अर्ध्याहून अधिक लोकसंख्या खेड्यांमध्ये राहतात. येथील पिण्याच्या पाण्याचे मुख्य स्त्रोत म्हणजे हातपंप, विहिरी, नद्या किंवा तलाव. या सर्वांमध्ये पाणी हे जमिनीतून येत असते. याशिवाय गावांमध्ये हे पाणी स्वच्छ करण्याची कोणतीही पद्धत सहसा नसते. त्यामुळे ग्रामीण भागात राहणाऱ्या नागरिकांना विषारी पाणी प्यावे लागत आहे.

हे पाणी आरोग्यासाठी किती धोकादायक आहे?

साधारणपणे असं मानलं जातं की एक व्यक्ती दररोज सरासरी 3 लिटर पाणी पिते. मात्र, सरकारी कागदपत्रांनुसार, निरोगी राहण्यासाठी दररोज किमान 2 लिटर पाणी पिले पाहिजे. जर तुम्ही दररोज 2 लिटर पाणी सुद्धा पीत असाल तर तुमच्या शरीरात काही प्रमाणात विषारी घटक जात आहे.

भूजलातील आर्सेनिक, लोह, शिसं, कॅडमियम, क्रोमियम आणि युरेनियमचे प्रमाण निर्धारित प्रमाणापेक्षा जास्त असल्याने त्याचा थेट परिणाम आपल्या आरोग्यावर होतो.

– जास्त आर्सेनिक म्हणजे त्वचा रोग आणि कर्करोगाचा धोका वाढतो.

– शरिरात अतिरिक्त लोहाचा अर्थ म्हणजे अल्झायमर आणि पार्किन्सन सारख्या मज्जासंस्थेशी (nervous system) संबंधित आजार असू शकतो.

– पाण्यात शिशाचे जास्त प्रमाण आपल्या मज्जासंस्थेवर परिणाम करू शकते.

– कॅडमियमचे प्रमाण जास्त असल्याने किडनीच्या आजारांचा धोका वाढतो.

– जास्त प्रमाणात क्रोमियममुळे लहान आतड्यात डिफ्यूज हायपरप्लासिया होऊ शकतो, ज्यामुळे ट्यूमरचा धोका वाढतो.

– पिण्याच्या पाण्यात युरेनियमचे प्रमाण जास्त असल्याने किडनीचे आजार आणि कर्करोगाचा धोका वाढतो.

शासनाने केलेल्या उपाययोजना

पाणी हा राज्य सुचीतील विषय आहे, त्यामुळे लोकांना पिण्याचे पाणी उपलब्ध करून देणे ही राज्यांची जबाबदारी असल्याचे केंद्र सरकारने संसदेत सांगितले. मात्र, केंद्र सरकारही पिण्याचे शुद्ध पाणी देण्यासाठी अनेक योजना राबवत आहे.

21 जुलै रोजी सरकारने लोकसभेत सांगितले की जल जीवन मिशन ऑगस्ट 2019 मध्ये सुरू करण्यात आले होते. या अंतर्गत 2024 पर्यंत प्रत्येक ग्रामीण कुटुंबाला नळांद्वारे पिण्याच्या पाण्याचा पुरवठा केला जाणार आहे. सरकारने संसदेत दिलेल्या माहितीनुसार, आतापर्यंत 19.15 कोटी देशातील ग्रामीण कुटुंबांपैकी, 9.81 कोटी कुटुंबांना नळाने पाणीपुरवठा केला जात आहे.

याशिवाय केंद्र सरकारने ऑक्टोबर 2021 मध्ये अमृत 2.0 योजना सुरू केली आहे. त्याअंतर्गत येत्या 5 वर्षांत म्हणजे 2026 पर्यंत सर्व शहरांना नळाने पाणीपुरवठा करण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे.

    follow whatsapp

    ADVERTISEMENT