Ramdas Athawale यांचा ईशान्येत करिश्मा; नागालँडमध्ये RPI(A) दोन जागांवर विजयी

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

Nagaland Election result 2023 : केंद्रीय मंत्री रामदास आठवले (Ramdas Aathwale) यांच्या रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया पक्षाने ईशान्येत झेंडा फडकवला आहे. इतिहासात पहिल्यांदाच आठवले यांच्या पक्षाने महाराष्ट्राबाहेर जागा जिंकल्या आहेत. नागालँडमधील (Nagaland Assembly Election result 2023) दोन जागांवर रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे (Republican Party of India) दोन आमदार निवडून आले आहेत. (Ramdas Athawale’s Republican Party of India has won two seats in Nagaland.)

देशात आज विधानसभा निवडणुकींच्या मतमोजणीचे वारे वाहत आहेत. नागालॅंड, त्रिपुरा आणि मेघालय या राज्यांमध्ये काही दिवसांपूर्वी निवडणुकीची घोषणा करण्यात आली होती. यासोबतच महाराष्ट्र, तमिळनाडू, पश्चिम बंगाल, अरुणाचल प्रदेश आणि झारखंडमध्ये पोटनिवडणूक जाहीर झाली होती. या सर्व निवडणुकांसाठी २६ आणि २८ फेब्रुवारीला मतदान झालं होतं. याच मतदानाची मतमोजणी आज होत आहे. यातील काही जागांचे निकाल हाती आले आहेत, तर काही ठिकाणी अद्याप मतमोजणी सुरु आहे.

शरद पवार संजय राऊतांच्या पाठिशी! सत्ताधाऱ्यांना दिला इतिहासाचा दाखला

हे वाचलं का?

ADVERTISEMENT

नागालॅंडमध्ये जिंकल्या आठवले गटाने दोन जागा :

दरम्यान, यातील नागालॅंड राज्यातील जाहीर झालेल्या निकालात आठवलेंच्या आरपीआय पक्षाचे दोन उमेदवार विजयी झाले आहेत. RPI (A) च्या तिकिटावर Y. लिमा ओनेन चँग (Y. Lima Onen Chang) यांनी नागालँडमधील नोक्सेन (Noksen) जागेवरुन विजय मिळविला आहे. तर इम्तिचोबा (Imtichoba) यांनी तुएनसांग सदर-II (Tuensang Sadar-II seat) ही जागा जिंकली आहे. युनायटेड डेमोक्रॅटिक पार्टी

Kasba Peth By Election Results: धंगेकरांनी घडवला इतिहास! भाजपने बालेकिल्ला गमावला

ADVERTISEMENT

त्रिपुरात भाजपने राज्यातील एकूण ६० जागांपैकी १५ जागा जिंकल्या आहेत. तर १८ जागांवर पक्षाचे उमेदवार पुढे आहेत. नागालँडमध्ये भाजपने आतापर्यंत एक जागा जिंकली आहे. तर राष्ट्रवादी डेमोक्रॅटिक प्रोग्रेसिव्ह पार्टी आणि भाजप मिळून ३६ जागांवर पुढे आहे. इतर २२ जागांवर आघाडीवर आहेत. मेघालयमध्ये नॅशनल पिपल्स पार्टी २५, युनायटेड डेमोक्रॅटिक पार्टी ११, भाजप ३ तृणमूल ५ आणि काँग्रेस पाच जागांवर आघाडीवर आहे.

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT