नकोसा रेकॉर्ड! कोरोना रूग्णांच्या संख्येत भारत दुसऱ्या क्रमांकावर

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

महाराष्ट्रातील कोरोनाची रुग्णसंख्या दिवसेंदिवस वाढते आहे. भारतातही वेगळं चित्र नाही, रुग्णसंख्येमुळे कोरोनाची साथ असलेल्या पहिल्या दहा देशांमध्ये भारत दुसऱ्या क्रमांकावर आहे. फेब्रुवारी महिन्यात राज्यातील रुग्णांची संख्या दिवसागणिक वाढत गेली. महाराष्ट्रात बुधवारी एका दिवसात ८ हजार ८०७ नवीन रुग्ण आढळले होते. ऑक्टोबर 2020 मध्ये आढळणाऱ्या रुग्णांच्या तुलनेत फेब्रुवारी महिन्यात आढळणाऱ्या रुग्णांची संख्या जास्त आहे.

केवळ रुग्णसंख्याच नाही तर मृत्यू दरात राज्याने जगाला मागे टाकलंय. फेब्रुवारीच्या एक तारखेला राज्यात 1948 रुग्ण आढळले होते. आता 23 दिवसांनंतर म्हणजेच 24 फेब्रुवारीला 24 तासात 6859 नवीन रुग्ण आढळले आहेत. राज्यात सध्या 59 हजार 358 अक्टिव्ह रुग्ण आहेत. राज्यातील सर्वाधिक अक्टिव्ह रुग्ण पुणे जिल्ह्यात असून पुण्यात सध्या 10 हजार 427 रुग्ण आहेत. तर त्या खालोखाल नागपूरमध्ये 7851 अक्टिव्ह रुग्ण आहेत. गेल्या महिन्याभरात राज्याच्या रुग्णवाढीचा दर देशाच्या तुलनेत वाढला आहे. तर, मृत्यूदर कोरोनाच्या सुरुवातीच्या काळात होता त्यापेक्षा कमी असला तरी जगाच्या तुलनेत महाराष्ट्राचा मृत्यूदर सर्वाधिक आहे.

फेब्रुवारी महिन्यातील महाराष्ट्राची कोरोना स्थिती

हे वाचलं का?

ADVERTISEMENT

24 फेब्रुवारी रोजी राज्यातील आकडेवारी

एकूण सक्रीय रुग्ण – 53 हजार 113

ADVERTISEMENT

रुग्णालयात भरती असलेले रुग्ण – 40 हजार 380

ADVERTISEMENT

गंभीर रुग्ण – 7522

आयसीयूमध्ये असलेले रुग्ण 3190

व्हेंटिलेटरवर असलेले रुग्ण 2582

आयसीयूमध्ये ऑक्सिजनवर असलेले रुग्ण 4332

राज्यातील एकूण ऑक्सिजनची गरज – 194.15 मेट्रिक टन

महाराष्ट्राचा रुग्णवाढीचा दर देशाच्या तुलनेत जास्त

महाराष्ट्राचा दैनंदिन रुग्णवाढीचा दर देशाच्या आणि देशातील इतर राज्याच्या तुलनेत जास्त आहे. देशाचा रुग्णवाढीचा दर 0.10 टक्के आहे तर राज्याचा रुग्णवाढीचा दर 0.25 टक्के आहे.

जगात सर्वाधिक मृत्यूदर महाराष्ट्राचा

जागतिक पातळीवर कोरोनामुळे होणारा मृत्यूदर 2.22 टक्के आहे. राज्याचा मृत्यूदर 2.45 टक्के आहे तर देशाचा मृत्यूदर 1.46 टक्के आहे. मुंबईचा रुग्णवाढीचा दर 0.24 टक्के आहे.

राज्यातील रुग्णवाढीचा साप्ताहिक दर वाढला

राज्यातील रुग्णवाढीचा साप्ताहिक सरासरी दर डिसेंबर 2020 च्या तुलनेत फेब्रुवारी 2021 मध्ये 0.12 टक्क्यांनी वाढला. एप्रिल 2020ला रुग्णवाढीचा साप्ताहिक दर 7.28 टक्के होता. त्यानंतर तो जानेवारी 2021 मध्ये 0.12 टक्क्यांपर्यंत खाली आला. त्यानंतर पुन्हा फेब्रुवारी महिन्यात त्यात वाढ झालेली दिसली. फेब्रुवारी महिन्यात रुग्णवाढीचा दर 0.28 टक्के झाला आहे. महाराष्ट्रात आजच्या घडीला 53,113 अक्टिव्ह रुग्ण आहेत. तर, देशात दुसऱ्या क्रमांकावर असलेल्या पंजाबच्या तुलनेत हा आकडा जास्त आहे. गेल्या काही दिवसांत विदर्भातील कोरोना रुग्णांच्या संख्येत मोठ्या प्रमाणावर वाढ झाली. गेल्या आठवड्यात रुग्णवाढीचा दर अमरावती, अकोला, बुलढाणा, वाशिम आणि वर्धा या जिल्ह्यांमध्ये सर्वाधिक होता.

जिल्हा साप्ताहिक रुग्णवाढीचा दर (15 फेब्रुवारी ते 21 फेब्रुवारी)

अमरावती 19.45 टक्के

अकोला 10.59 टक्के

बुलढाणा 6.19 टक्के

वाशिम 5.86 टक्के

वर्धा 5.59 टक्के

मुंबई 0.24 टक्के

अमरावती, अकोला, बुलढाणा, यवतमाळ, नागपूर या जिल्ह्यांमध्ये पॉझिटिव्हिटी दर जास्त आढळला आहे. आश्चर्याची बाब म्हणजे रुग्णवाढीचा आणि पॉझिटिव्हिटीचा दर जास्त असलेल्या जिल्ह्यांपेक्षा वेगळ्याच जिल्ह्यांमध्ये मृत्यूदर

जास्त असल्याचे आढळले आहे. लातूर, रत्नागिरी, नंदुरबार, सांगली आणि सिंधुदूर्ग या जिल्ह्यांमध्ये मृत्यूदर जास्त आहे.

प्रतिदशलक्ष लोकसंख्येमागे चाचण्यांचे प्रमाण वाढविण्यात आले

वाढती रुग्णसंख्या लक्षात घेऊन प्रति दशलक्ष लोकसंख्येमागे चाचण्यांचे प्रमाणही वाढविण्यात आले आहे. रुग्णसंख्या वाढत असताना ट्रॅकिंग, ट्रेसिंग आणि टेस्टिंगचे प्रमाण वाढविण्याचा आरोग्य विभागाचा नियम आहे. राज्यातील काही भागांमध्ये रुग्णसंख्या वाढू लागली त्यानंचर चाचण्यांमध्ये वाढ करण्यात आली. एप्रिल 2020 मध्ये प्रति दशलक्ष लोकांमादे 917 रुग्णांची चाचणी करण्यात येत होती. फेब्रुवारी 2021 मध्ये ते प्रमाण वाढविण्यात आले. 24 फेब्रुवारीला राज्यात 1 लाख 20 हजार 580 रुग्णांची चाचणी करण्यात आली.

सक्रिय रुग्णांचे जिल्हे वाढले

राज्यातील सक्रिय रुग्ण असलेल्या जिल्ह्यांमध्ये 9 ते 23 फेब्रुवारी दरम्यान वाढ झाली आहे. तब्बल 27 जिल्ह्यांमध्ये सक्रिया रुग्णांचे प्रमाण वाढले आहे. यामध्ये पुणे, मुंबई, यवतमाळ, उस्मानाबाद, अमरावती या जिल्ह्यांमधील रुग्णांची संख्या दुप्पटीपेक्षा जास्त वाढली आहे. 11 फेब्रुवारीला राज्यात राज्यात 30, 265 रुग्ण होते तर आता 23 फेब्रुवारीपर्यंत रुग्णांची संख्या 53,049 वर पोहोचलीय.

मागच्या दिवसांत मुंबई, नागपूर, अमरावती आणि पुण्यात सर्वाधिक रुग्ण आढळले आहेत.

मुंबई महानगरपालिका – 8229

नागपूर महानगरपालिका – 6190

अमरावती – 7754

पुण्यात 7254

आठवड्यापूर्वी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी ‘मी जबाबदार’ या मोहिमेची घोषणा केली होती. तसंच राज्यातील जनतेला जर लॉकडाउन नको असेल तर, जनतेने कोरोनाचे निर्बंध पाळण्याचं आवाहन मुख्यमंत्र्यांनी केलं होतं. तसंच रुग्णसंख्या लक्षात घेऊन मगच राज्यातील लॉकडाउनबाबत निर्णय घेण्यात येईल असे मुख्यमंत्र्यांनी सांगितलं होतं. त्यानुसार आता वाढती रुग्णसंख्या लक्षात घेऊन राज्यात लॉकडाउन लागणार का याने अनेकांना चिंतेत टाकलेलं आहे.

    follow whatsapp

    ADVERTISEMENT