Mumbai Tak /बातम्या / Same Sex Marriage : समलैंगिक लग्नाला मोदी सरकारचा विरोध; सुप्रीम कोर्टाला सांगितलं कारण
बातम्या राजकीय आखाडा

Same Sex Marriage : समलैंगिक लग्नाला मोदी सरकारचा विरोध; सुप्रीम कोर्टाला सांगितलं कारण

Center Opposes Legal recognition of same sex Marriage : सुप्रीम कोर्टात समलैंगिक विवाहाच्या मान्यतेसाठी (Same Sex Marriage) दाखल झालेल्या याचिकेवर केंद्र सरकारने आपली भूमिका स्पष्ट केली आहे. केंद्राने 56 पानी प्रतिज्ञापत्र सादर करून समलैंगिक विवाहांना मान्यता देण्यास विरोध दर्शवला आहे. समलैंगिक विवाहाची तुलना भारतीय विवाह नवरा, बायको आणि त्यांचे अपत्य या संकल्पनेत होऊ शकत नाही, अशी भूमिका केंद्राने (Central Government) मांडत विरोध केलाय.(same sex marriage central government opposes such a marriage pointing to the concept of husband wife children)

केंद्राने (Central Government) समलिंगी विवाहासंबंधी (Same Sex Marriage) 15 याचिकांचा विरोध केला आहे. भारतीय विवाहाच्या संकल्पनेत नवरा बायको आणि त्यांचे अपत्य संकल्पना असताना समलैंगिक विवाहांना त्यात जागा नाही अशी केंद्राची भूमिका आहे. पार्टनर म्हणून एकत्र राहणे आणि समलैंगिक व्यक्तींद्वारे लैंगिक संबंध ठेवणे या गोष्टीची तुलना भारतीय कुटुंब संकल्पनेशी करता येणार नाही, हे देखील केंद्राने प्रतिज्ञापत्रात म्हटले आहे.

kirtikumar bhangdiya: फडणवीसांच्या निकटवर्तीय आमदारावर गुन्हा, प्रकरण काय?

दरम्यान, विवाहाची संकल्पना दोन विरुद्ध लिंगी व्यक्तींमधील मिलन दर्शवते. ही व्याख्या सामाजिक, सांस्कृतिक आणि कायदेशीररित्या विवाहाच्या कल्पना आणि संकल्पनेमध्ये अंतर्भूत आहे. त्यामुळे ही संकल्पना बदलू नये किंवा भारतीय कुटूंब व्यवस्थेचे महत्व कमी करू नये असे केंद्राने स्पष्ट केले आहे.

सर्वोच्च न्यायालय आणि उच्च न्यायालयाने त्यांच्या अनेक निर्णयांमध्ये वैयक्तिक स्वातंत्र्याचा अर्थ स्पष्ट केला आहे. या निकालांच्या प्रकाशात ही याचिका देखील फेटाळण्यात यावी कारण त्यात योग्यता नाही आहे, असे केंद्र सरकारने आपल्या प्रतिज्ञापत्रात म्हटले आहे. कायद्यातील उल्लेखानुसारही समलिंगी विवाहाला (Same Sex Marriage) मान्यता देता येत नाही. कारण पती-पत्नीची व्याख्या जैंविकदृष्ट्या दिली आहे. त्यानुसार दोघांनाही कायदेशीर अधिकार आहेत. समलिंगी विवाहात वाद झाल्यास पती-पत्नीला कसे वेगळं मानता येणार? असा सवाल देखील उपस्थित करण्यात आलाय.

चिकन न बनवल्याने भडकला, पत्नीचं डोकं फोडतं हातही तोडला

कोणत्याची देशाचे न्यायशास्त्र, मग ते संहिताबद्ध कायद्याद्वारे असो किंवा सामाजिक मुल्ये,श्रद्धा आणि सांस्कृतिक इतिहास असो, समान लिंगाच्या दोन व्यक्तीमधील विवाहाला मान्यता देता येत नाही आणि स्विकारतही नाही, असे देखील केंद्राने स्पष्ट केले आहे.

समलिंगी विवाह संकल्पना काय?

समलैंगिक विवाह (Same Sex Marriage), ज्याला समलिंगी विवाह देखील म्हणतात. हा विवाह म्हणजे दोन समान लिंगाचे जोडीदार. जसे की, स्त्री-स्त्री अथवा पुरूष-पुरूष हे एकत्र येतात. ते पती पत्नीप्रमाणे राहतात विवाह करतात. या विवाहाला भिन्नलिंगी विवाहाप्रमाणे मान्यता मिळावी अशी या समुहाची मागणी आहे. समलिंगी विवाहामध्ये लेस्बियन, गे, बायसेक्सुशल किंवा ट्रान्सजेंडर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या व्यक्तींनी एकत्र येऊन विवाहबद्ध होण्याच्या प्रक्रियेला समलिंगी विवाह म्हणतात.

बच्चू कडू खरं बोलले की खोटं? आसाममध्ये कुत्र्याचं मांस खातात का?

दरम्यान या प्रकरणातील पुढील सुनावणी सु्प्रीम कोर्टात सोमवारी होणार आहे. सरन्यायाधीश धनंजय चंद्रचुड यांच्या अध्यक्षतेखालील न्यायपीठासमोर ही सुनावणी होणार आहे. या सुनावणीत काय निकाल लागतो, हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.

बिकनीत फोटो शेअर करण पडलं महागात, तरूणीला लाखोंचे नुकसान भारतातील हे राज्य चक्क झाडांना देते पेन्शन, नाव आहे प्राण वायू देवता योजना Rohit Sharma: धोनीची ही शेवटची आयपीएल असेल का? पत्रकारांच्या प्रश्नावर रोहितने दिलं खास उत्तर parineeti chopra raghav chadha : राघवबद्दल प्रश्न विचारताच परिणीती लाजली, पुढे काय घडलं? Dalljiet Kaur : ब्लॅक सेन्शुअल ड्रेसमध्ये दलजीतचे हॉट फोटोशूट, पतीसोबत दिल्या रोमॅंटिक पोज अन्वेषी जैनच्या फिट बॉडीचं रहस्य काय? समजून घ्या काय करते दारूच्या सेवनाने ‘ही’ गोष्ट तुम्हाला कधीच मिळत नाही…: रिसर्च 4 पतींसह 11 लोकांचा जीव घेणारी लेडी सिरीयल किलर cross legs sitting: तुम्हीही असं बसता, बघा काय आहेत दुष्परिणाम? UPSC च्या तयारीसाठी नोट्स कशा असाव्यात? या सोप्या टिप्स वाचा Akanksha Dubey: आत्महत्येपूर्वी आकांक्षाचा या व्यक्तीला शेवटचा मेसेज, म्हणाली… vitamin e foods : व्हिटॅमिन ई जीवनसत्त्व मिळवण्यासाठी काय खायला हवं? Danish Alfaaz: टिकटॉक स्टार दानिश अल्फाजवर बलात्काराचा गुन्हा, नेमकं काय घडलं? Nanded: निवृत्त झाले तरीही करतात ‘ड्युटी’; पोलीस कर्मचाऱ्याच्या निशुल्क सेवेची होतेय चर्चा पुणेकरांचा प्रवास होणार सुखद! नव्या मार्गांवर धावली मेट्रो पाकिस्तानमध्ये महागाईचा आगडोंब! ‘या’ गोष्टींच्या किंमती ऐकून तुम्हीही म्हणाल, ‘बाप रे’ ‘तारक मेहता’साठी मिळेना दया बेन! शोधाशोध करून निर्मातेही थकले Lalu Prasad Yadav: इवली इवली बोटं, नातीला कुशीत घेतल्यानंतर असे होते लालूप्रसादाचे भाव BCCI contract list : रोहित, कोहली ते सूर्यकुमार यादव, कोणत्या खेळाडूला किती पगार? bageshwar dham sarkar: बागेश्वर धामच्या धीरेंद्र शास्त्रींविरुद्ध दुसरा गुन्हा