गोध्राच्या तुलनेत शेतकऱ्यांचं आंदोलन शांत, सेनेचा मोदींवर पलटवार

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

केंद्राच्या कृषी कायद्यांना पंजाब आणि हरियाणातील शेतकऱ्यांचा असलेला विरोध आजही कायम आहे. दिल्लीत गेल्या दोन महिन्यांपासून शेतकरी आंदोलन सुरु आहे, सरकार आणि शेतकरी संघटनांमधल्या चर्चेला अद्याप तोडगा निघालेला नाही. संसदेत राष्ट्रपतींच्या अभिभाषणावर बोलत असताना मोदींनी शेतकरी आंदोलनात सहभागी नेत्यांचा आंदोलनजीवी असा उल्लेख करत टोमणा मारला होता. शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी आपल्या सामना मधील रोखठोक या सदरात गोंध्रा आंदोलनाची आठवण करुन गोध्राकांडाच्या तुलनेत शेतकऱ्यांचं आंदोलन हे शांत आणि सौम्य असल्याचं राऊतांनी म्हटलं आहे.

आंदोलनजीवी हा शब्द उच्चारून मोदींनी रस्त्यावर उतरणाऱ्या कार्यकर्त्यांची थट्टा केली आहे. मोदींनी केवळ कृषी कायद्यांविरोधात रस्त्यावर उतरलेल्या शेतकऱ्यांची थट्टा केली नाही तर देशाचे स्वातंत्र्य आणि लोकशाहीचे मूल्य राखण्यासाठी दीडशे वर्षांपासून आंदोलन करणाऱ्या प्रत्येकाची थट्टा असल्याचं राऊत यांनी आपल्या लेखात म्हटलं आहे. या लेखात राऊत यांनी नरेंद्र मोदी यांना गोध्राकांडाची आठवण करुन देत, साबरमती एक्सप्रेस जाळल्यानंतर जे गोध्रांकाड झाले त्यामधून मोदी हे हिंदू समाजाचे मसिहा बनले. मोदी यांच्या दृष्टीने गोध्राकांड हे उत्स्फुर्त आंदोलनच होते. पण हे आंदोलन परजीवी आहे असं तेव्हाचे पंतप्रधान वाजपेयी यांनी म्हटलं नाही. याच गोध्राकांडाने मोदी आणि शहा यांना दिल्लीच्या तख्तापर्यंत पोहचवलं, त्या तुलनेत दिल्लीतलं शेतकऱ्यांचं आंदोलन शांत आणि सौम्य आहे.

आंदोलनं म्हणजे लोकशाहीतली सूर्यकिरणे आहेत, देश त्यामुळे जिवंत राहतो. एकेकाळी काँग्रेस पक्ष हेच आंदोलन होते, आज काँग्रेस कुठे आहे?? काँग्रेसचा इतिहास जितका आंदोलनाचा आणि संघर्षाचा आहे तितका भाजपचा नाही. स्वातंत्र्याच्या आंदोलनात भाजप कुठेच नव्हता. वीर सावरकरांचं आंदोलन हे सशस्त्र होते, यासाठी त्यांना इंग्रज सरकारने ५० वर्षांच्या काळ्यापाण्याची शिक्षा दिली. अंदमानातून सुटल्यानंतर सावरकरांनी अस्पृश्यता निर्मूलन, भाषाशुद्धीची आंदोलनं केली. वीर सावरकरांना भारतरत्न करण्यात आलं नाही, पण किमान सावरकर परजीवी किंवा आंदोलनजीवी होते असं म्हणू नका अशा शब्दांत संजय राऊतांनी मोदींना टीकेचं लक्ष्य केलंय.

हे वाचलं का?

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT