महाराष्ट्रात दिवसभरात 33 हजार Corona रूग्णांना डिस्चार्ज, रिकव्हरी रेट 93.88 टक्के
महाराष्ट्रात दिवसभरात 33 हजार कोरोना रूग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. तर दिवसभरात राज्यात 15 हजार 77 नवे रूग्ण आढळले आहेत. आत्तापर्यंत राज्यात एकूण 53 लाख 95 हजार 370 रूग्णांना कोरोना रूग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. त्यामुळे महाराष्ट्राचा रिकव्हरी रेट 93.88 टक्के झाला आहे. दिवसभरात 184 रूग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. महाराष्ट्राचा मृत्यू दर आता 1.66 […]
ADVERTISEMENT
महाराष्ट्रात दिवसभरात 33 हजार कोरोना रूग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. तर दिवसभरात राज्यात 15 हजार 77 नवे रूग्ण आढळले आहेत. आत्तापर्यंत राज्यात एकूण 53 लाख 95 हजार 370 रूग्णांना कोरोना रूग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. त्यामुळे महाराष्ट्राचा रिकव्हरी रेट 93.88 टक्के झाला आहे. दिवसभरात 184 रूग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. महाराष्ट्राचा मृत्यू दर आता 1.66 टक्के इतका झाला आहे.
ADVERTISEMENT
महाराष्ट्रात 3 कोटी 50 लाख 55 हजार 54 प्रयोगशाळा नमुन्यांपैकी 57 लाख 46 हजार 892 नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. आज घडीला 18 लाख 70 हजार 304 लोक होम क्वारंटाईन आहेत. तर 10 हजार 743 लोक संस्थात्मक क्वारंटाईन आहेत. आज घडीला राज्यात 2 लाख 53 हजार 367 सक्रिय रूग्ण आहेत.
….अशीच गर्दी होत राहिली तर मुंबईत निर्बंध आणखी कठोर करणार-उद्धव ठाकरे
हे वाचलं का?
मुंबईसह राज्यभरात कोरोनाची दुसरी लाट ओसरताना दिसते आहे. मात्र आत्ता आपण पहिल्या लाटेच्या उच्चांकाच्या जवळ आलो आहोत त्यामुळे लगेच सगळे निर्बंध उठवता येणार नाहीत. 15 जून पर्यंत लॉकडाऊन कायम असेल असं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी रविवारी झालेल्या फेसबुक लाईव्हमध्येच स्पष्ट केलं. अशात ज्या ठिकाणी टेस्ट पॉझिटिव्हिटी रेट हा 10 किंवा त्यापेक्षा कमी झाला आहे तिथे अत्यावश्यक सेवांची दुकानं सकाळी 7 ते दुपारी 2 पर्यंत सुरू ठेवण्याची मुभा ब्रेक द चेन च्या अंतर्गत देण्यात आली आहे. आपल्याला निर्बंध हळूहळू शिथील करावे लागणार आहेत. त्यामुळे लॉकडाऊनचा निर्णय जसा घेणं कटू आणि कठीण आहे तसंच निर्बंध शिथील करण्याचा निर्णयही हळूहळूच घ्यावा लागणार आहे असंही मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी स्पष्ट केलं
Mumbai Vaccination: गुड न्यूज… मुंबईकरांना सहजपणे मिळू शकते कोरोना लस!
ADVERTISEMENT
या जिल्ह्यांमध्ये राज्य सरकारने कोरोनाचे निर्बंध शिथील करण्याचा निर्णय घेतला आहे –
ADVERTISEMENT
अहमदनगर, औरंगाबाद, भंडारा, बुलडाणा, चंद्रपूर, धुळे, गोंदिया, जळगाव, जालना, लातूर, मुंबई उपनगर, मुंबई, नागपूर, नांदेड, नंदूरबार, नाशिक, परभणी, सोलापूर, वर्धा, वाशिम, यवतमाळ आणि पालघर
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT