पिंपरी-चिंचवड : कोयत्याचा धाक दाखवून दारुच्या दुकानातून ३५ हजाराची लूट, घटना सीसीटीव्हीत कैद

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

पिंपरी-चिंचवड शहरातील कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. टोळीयुद्ध आणि गुन्हेगारीचा फटका अनेकदा या शहरात दुकानदार आणि व्यापाऱ्यांना बसताना दिसत आहे. सांगवी भागात एका दारुच्या दुकानात दोन अज्ञात तरुणांनी कोयत्याचा धाक दाखवून ३५ हजार रुपये लुटून नेले आहेत.

ADVERTISEMENT

सांगवीच्या एम.यु.शितोळे या देशी दारु आणि बिअर शॉपमध्ये ही घटना घडली आहे. याबद्दल सांगवी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस अज्ञात आरोपींच्या शोधात आहेत. महत्वाची गोष्ट म्हणजे हा सर्व प्रकार सीसीटीव्हीत कैद झाला आहे. बबन खराटे या व्यक्तीने याबद्दल तक्रार दिली आहे.

मुंबई: कारमधून 35 लाख रुपये चोरले अन् गुजरातला पळाला, मास्टरमाइंडला अहमदाबादमधून अटक

हे वाचलं का?

सांगवी पोलीस ठाण्याच्या हद्दीत दोन दिवसांपूर्वीच तडीपार गुंडाने भर चौकात गोळ्या झाडून सराईताचा खून केल्याची घटना घडली होती. त्यात, कोयत्याचा धाक दाखवून दमदाटी करत पैसे घेऊन अज्ञातांनी पोबारा केल्याची घटना आज उजेडात आली आहे. त्यामुळे या गुन्हेगारांवर पोलीस कधी नियंत्रण मिळवणार आहेत की नाही असा प्रश्न आता स्थानिक नागरिक विचारत आहेत.

नागपूर : पार्किंगमधली कार बाहेर काढताना चालकाचं नियंत्रण सुटलं, अपघातात तरुण गंभीर जखमी

ADVERTISEMENT

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT