मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या भाषणातील २५ अत्यंत महत्त्वाचे मुद्दे

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

मुंबई: मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (chief minister uddhav thackeray) यांनी आज (30 एप्रिल) राज्यातील जनतेला संबोधित केलं. यावेळी त्यांनी लॉकडाऊनसह, लसीकरण, ऑक्सिजन आणि रेमडेसिविर इंजेक्शन यावर सविस्तर माहिती दिली. पाहा मुख्यमंत्र्यांच्या या संबोधनातील 25 महत्त्वाचे मुद्दे.

ADVERTISEMENT

पाहा मुख्यमंत्र्यांच्या भाषणातील 25 अत्यंत महत्त्वाचे मुद्दे (25 very important points)

1. हायकोर्टाने कडक लॉकडाऊनची विचारणा केली आहे.

हे वाचलं का?

2. आणखी कडक लॉकडाऊनची वेळ येणार नाही

3. लॉकडाऊन नसता तर ९ ते १० लाख अॅक्टिव्ह रुग्ण असते.

ADVERTISEMENT

4. लॉकडाऊनमुळे रुग्णांमध्ये होणारी वाढ स्थिरावली

ADVERTISEMENT

5. आणखी काही काळ बंधनं पाळणं गरजेचं आहे.

6. महाराष्ट्रात ऑक्सिजन मोठ्या प्रमाणात लागतोय.

7. बाहेरच्या राज्यातून देखील ऑक्सिजन आणत आहोत.

8. केंद्र सरकारने दिलेले व्हेंटिलेटर्स देखील नादुरुस्त

9. महाराष्ट्राला दररोज ५० हजार रेमडेसिवीर इंजेक्शनची आहे गरज

10. केंद्राने ४३ हजार रेमडेसिवीर देऊ असं सांगितलं

Break The Chain चे निर्बंध लादल्याने कोरोना महाराष्ट्रात रूग्णसंख्या स्थिरावली-मुख्यमंत्री

11. लॉकडाऊन घोषित करताना साडे पाच हजार कोटींचं पॅकेज जाहीर केलं.

12. राज्यात सरसकट मोफत लसीकरण होणार

13. ५ कोटी ७१ लाख लोकांना मोफत लस देणार

14. १८ ते ४४ वयोगटातील लोकांना मोफत लस

15. १ मेपासून १८ ते ४४ वयोगटातील लोकांचं लसीकरण होणार

16. १८ वर्षावरील पुढच्या वयोगटासाठीच्या लसीकरणासाठी राज्याला १२ कोटी लसींची गरज

17. राज्य सरकार ६ हजार ५०० कोटी मोजणार

18. कोविनवर नोंदणी करा आणि त्यानंतरच लसीकरण केंद्रावर जा, गर्दी करु नका.

CM Uddhav Thackeray: रेमडेसिवीरबाबत मुख्यमंत्र्यांचं मोठं वक्तव्य, पाहा उद्धव ठाकरे नेमकं काय म्हणाले!

19. ६ कोटी नागरिकांचं लसीकरण सरकार करणार

20. १२ कोटी डोससाठी एकाचवेळी रक्कम देण्याची राज्य सरकारची तयारी

21. आर्थिक चणचण असली तरी लसीकरण करणार

22. केंद्र सरकार १८ लाख डोस दर महिन्याला देणार

23. कोविन अॅप क्रॅश होतंय, नोंदणी करण्यात अडचण येत आहे.

24. राज्यांना स्वतंत्र अॅप करु देण्याची मागणी

25. अॅपवर नोंदणी करा आणि त्यानंतरच लसीकरण करा. लस ज्या प्रमाणात उपलब्ध होतील तसं लसीकरण केलं जाईल.

‘महाराष्ट्रात ब्रेक द चेन अंतर्गत निर्बंध लादले आहेत त्यामुळे कोरोना रूग्णांची संख्या स्थिरावली आहे. नाहीत खूप भीषण परिस्थितीला आपल्याला सामोरं जावं लागलं असतं असं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सांगितलं. रूग्णसंख्या वाढत असताना निर्बंध लादले नसते तर सक्रिय रूग्णांची संख्या 10 लाखांच्या पुढे गेली असती.’ असंही मुख्यमंत्री यावेळी म्हणाले.

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT