पुण्यात शिक्षकाकडून 27 वर्षीय शिक्षिकेचा विनयभंग, आरोपी विरोधात गुन्हा दाखल
पुणे: पुणे शहर हे विद्येच माहेरघर म्हणून ओळखलं जातं. पण याच शहरात 27 वर्षीय शिक्षिकेचा तिच्या सोबत काम करणार्या शिक्षकाकडून विनयभंग झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. यामुळे एकच खळबळ उडाली असून आरोपी विकास पवार विरोधात भारती विद्यापीठ पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडित महिलेकडे 12 वीचे पेपर तपासण्यासाठी होते. त्यावेळी […]
ADVERTISEMENT

पुणे: पुणे शहर हे विद्येच माहेरघर म्हणून ओळखलं जातं. पण याच शहरात 27 वर्षीय शिक्षिकेचा तिच्या सोबत काम करणार्या शिक्षकाकडून विनयभंग झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. यामुळे एकच खळबळ उडाली असून आरोपी विकास पवार विरोधात भारती विद्यापीठ पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडित महिलेकडे 12 वीचे पेपर तपासण्यासाठी होते. त्यावेळी त्यांना काही अडचणी आल्यास, त्या आरोपी विकास पवार यांना फोन करीत असत. त्यातून त्यांची चांगली मैत्री झाली होती.
त्याचदरम्यान आता शेवटचा पेपर तपासून झाला असल्याने काल (सोमवार) दुपारी अडीच वाजण्याच्या सुमारास आरोपी विकास पवार पीडित महिलेला म्हणाला की, आपण लस्सी पिण्यास जाऊ, त्यावर त्या हो म्हणाल्या आणि कात्रज येथील एका डेअरी येथे लस्सी पिण्यास गेले.
तेव्हा आरोपी विकास पवार याने पीडित महिलेचा हात पकडल्याची घटना घडली. या प्रकरणी पीडित महिलेने दिलेल्या तक्रारीनुसार विकास पवारच्या विरोधात विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आल्याचे सांगण्यात आले. दरम्यान, आरोपीला अटक करुन त्याला कठोर शासन करण्यात यावं अशी मागणी पीडित महिलेने केली आहे.









