देशात 24 तासांत 3 लाख 46 हजार नव्या कोरोना रूग्णांची नोंद; 2,624 रुग्णांचा मृत्यू
कोरोनामुळे संपूर्ण देशभरातील परिस्थिती चिंताजनक बनली आहे. देशभरात कोरोनाचा प्रसार वाढला असून रूग्णांच्या संख्येतही दिवसेंदिवस वाढ होतेय. देशात गेल्या 24 तासांत 3,46,786 रुग्णांची नोंद झाली आहे. तर 2,624 रुग्णांचा मृत्यू झाला. या काळात 2,19,838 रूग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. केंद्र सरकारच्या आरोग्य मंत्रालयाने जारी केलेल्या आकडेवारीनुसार, आतापर्यंत देशात कोरोनाचे एकूण 1,66,10,481 रुग्ण आढळले आहेत तर 1,38,67,997 […]
ADVERTISEMENT
कोरोनामुळे संपूर्ण देशभरातील परिस्थिती चिंताजनक बनली आहे. देशभरात कोरोनाचा प्रसार वाढला असून रूग्णांच्या संख्येतही दिवसेंदिवस वाढ होतेय. देशात गेल्या 24 तासांत 3,46,786 रुग्णांची नोंद झाली आहे. तर 2,624 रुग्णांचा मृत्यू झाला. या काळात 2,19,838 रूग्ण कोरोनामुक्त झाले आहेत.
ADVERTISEMENT
केंद्र सरकारच्या आरोग्य मंत्रालयाने जारी केलेल्या आकडेवारीनुसार, आतापर्यंत देशात कोरोनाचे एकूण 1,66,10,481 रुग्ण आढळले आहेत तर 1,38,67,997 रुग्ण बरे झाले आहेत आणि घरी परत आले आहेत. सध्याच्या परिस्थितीत राजधानी दिल्लीतील अनेक रूग्णालयांमध्ये ऑक्सिजनची कमतरता जाणवतेय. दिल्ली आणि अमृतसरमध्ये ऑक्सिजनच्या कमतरतेने अनेकांचा मृत्यू झाला आहे.
जयपूर गोल्डन हॉस्पिटल, दिल्लीचे एमडी डॉ. डीके बलुजा यांनी असा दावा केला की, काल संध्याकाळी सुमारे 20 गंभीर रूग्णांचा ऑक्सिजन न मिळाल्यामुळे मृत्यू झाला. त्याचप्रमाणे पंजाबमधील अमृतसरमधील खासगी नीलकंठ रुग्णालयात ऑक्सिजनच्या कमतरतेमुळे 5 रुग्णांचा मृत्यू झाला. ऑक्सिजनच्या कमतरतेसाठी रुग्णालय प्रशासनाने स्थानिक प्रशासनाला जबाबदार धरलंय.
हे वाचलं का?
गेल्या 24 तासात दररोज कोरोनाचे सर्वाधिक रूग्ण हे महाराष्ट्र आणि उत्तर प्रदेशातून समोर येत आहेत. देशातील सर्वाधिक रूग्ण असलेल्या 5 राज्यांपैकी महाराष्ट्रात 66836, उत्तर प्रदेशात 36605, केरळमध्ये 28447, कर्नाटकात 26962 तर दिल्लीमध्ये 24,331 रूग्णांची सापडले असल्याची माहिती आहे. देशात आतापर्यंत एकूण 1,89,544 लोकांचा मृत्यू झाला आहे. सध्या देशात 25,52,940 सक्रिय रूग्ण असून आतापर्यंत 13,83,79,832 लोकांचं लसीकरण करण्यात आलं आहे.
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT