सीताराम येचुरी यांच्या अवघ्या 34 वर्षीय मुलाचं निधन, कोरोनाने घेतला बळी
नवी दिल्ली: कोरोनाची दुसरी लाट ही अत्यंत भयावह आहे. कारण या लाटेत आता मृतांचा आकडा हा सातत्याने वाढत आहे. अशातच आता भारतीय कम्युनिस्ट पक्ष (मार्क्सवादी) (CMI(M)) पक्षाचे ज्येष्ठ नेते सीताराम येचुरी (Sitaram Yechury) यांच्या अवघ्या 34 वर्षीय मुलाचं कोरोनामुळे (Corona) निधन झालं आहे. 34 वर्षीय आशिष येचुरी यांना कोरोनाची लागण झाल्याने त्यांच्यावर मागील काही दिवसांपासून […]
ADVERTISEMENT
नवी दिल्ली: कोरोनाची दुसरी लाट ही अत्यंत भयावह आहे. कारण या लाटेत आता मृतांचा आकडा हा सातत्याने वाढत आहे. अशातच आता भारतीय कम्युनिस्ट पक्ष (मार्क्सवादी) (CMI(M)) पक्षाचे ज्येष्ठ नेते सीताराम येचुरी (Sitaram Yechury) यांच्या अवघ्या 34 वर्षीय मुलाचं कोरोनामुळे (Corona) निधन झालं आहे.
ADVERTISEMENT
34 वर्षीय आशिष येचुरी यांना कोरोनाची लागण झाल्याने त्यांच्यावर मागील काही दिवसांपासून उपचार सुरु होते. दरम्यान, आज (गुरुवार) सकाळी गुरुग्राम येथील मेदांता हॉस्पिटलमध्ये त्यांचं निधन झालं. आशिष यांना दोन आठवड्यारपूर्वी दिल्लीच्या होली फॅमेली रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. पण तिथे त्यांची प्रकृती अधिक खालावल्याने त्यांना मेदांता रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं.
त्यांच्या कुटुंबीयांच्या मते, आशिष हे बरे होत होते पण गुरुवारी पहाटे साडे पाच वाजेच्या सुमारास अचानक त्यांचा श्वास थांबला.
हे वाचलं का?
Corona Crisis: सामान्यांसाठी उघडले जाणार Army हॉस्पिटल; राजनाथ सिंहांची लष्कर प्रमुखांशी चर्चा
आशिष येचुरी हे एका वृत्तपत्रात सीनियर कॉपी एडिटर म्हणून काम करत होते. दोन आठवडे त्यांनी कोरोनाशी चांगली झुंज दिली होती. पण आज अचानक त्यांचं निधन झालं. दरम्यान, त्यांच्या निधनाचं वृत्त त्यांचे वडील सीताराम येचुरी यांनी आपल्या अधिकृत ट्विटर अकाउंटवरुन दिलं.
ADVERTISEMENT
माकप नेते सीताराम येचुरी यांनी आपल्या ट्विटमध्ये असे म्हटलं की, ‘मला अतिशय दु:खी अंतकरणाने हे सांगावं लागत आहे की, माझ्या मोठ्या मुलाचं कोरोनामुळे निधन झालं. मी त्या लोकांचे आभार मानतो ज्यांनी मला तो बरा होईल अशी आशा दाखवली आणि त्याच्यावर उपचार केले, यामध्ये डॉक्टर, नर्स, फ्रंटलाइन हेल्थ वर्कर यांचा समावेश आहे.’
ADVERTISEMENT
It is with great sadness that I have to inform that I lost my elder son, Ashish Yechury to COVID-19 this morning. I want to thank all those who gave us hope and who treated him – doctors, nurses, frontline health workers, sanitation workers and innumerable others who stood by us.
— Sitaram Yechury (@SitaramYechury) April 22, 2021
Corona Protection: दुहेरी संरक्षणासाठी दुहेरी मास्क का आहे आवश्यक?
सध्या सीताराम येचुरी यांना देखील क्वॉरंटाइन करण्यात आलं आहे. आशिष येचुरी यांच्या निधनाबाबत CPI (M) ने देखील दु:ख व्यक्त केलं आहे.
We are deeply sorry to announce the passing away this morning of Ashish Yechury, son of @SitaramYechury and Indrani Mazumdar. He died of Covid related complications. He was 35 years old.
CPIM PolitBuro conveys its deepest condolences to the family.https://t.co/O6ZL7G2L2F— CPI (M) (@cpimspeak) April 22, 2021
पक्षाने गुरुवारी सकाळी ट्विटमध्ये म्हटलं आहे की, ‘सीताराम येचुरी आणि इंद्राणी मजुमदार यांचे पुत्र आशिष येचुरी यांच्या निधनाने आम्हाला शोक झाला आहे. त्यांचा मृत्यू कोरोनामुळे झाला आहे. ते 35 वर्षांचे होते. या दु:खाच्या क्षणी संपूर्ण पक्ष येचुरी यांच्या कुटुंबासोबत आहे. (34 year old ashish yechury son of cpm leader Sitaram Yechury due to corona Died)
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT