कल्याण: आरोपींसह वकिलालाही अटक.. ते देखील कोर्ट परिसरातून, नेमकं प्रकरण काय?
मिथिलेश गुप्ता, कल्याण: आरोपीला बोगस कागदपत्रांच्या आधारे जामीन मिळवून देण्याच्या प्रयत्नात असलेल्या एका वकिलासह 4 जणांना कल्याण क्राईम ब्रांच पोलिसांनी कल्याण कोर्ट परिसरातून अटक केली आहे. न्यायालयाने या सर्व आरोपींना दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. कल्याण क्राईम ब्रांचचे अधिकाऱ्यांना 24 जानेवारी रोजी एका गंभीर गुन्ह्यातील आरोपीला जमीन मिळवून देण्याचा प्रयत्न सुरु असल्याचे गुप्त माहिती […]
ADVERTISEMENT
मिथिलेश गुप्ता, कल्याण: आरोपीला बोगस कागदपत्रांच्या आधारे जामीन मिळवून देण्याच्या प्रयत्नात असलेल्या एका वकिलासह 4 जणांना कल्याण क्राईम ब्रांच पोलिसांनी कल्याण कोर्ट परिसरातून अटक केली आहे. न्यायालयाने या सर्व आरोपींना दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.
ADVERTISEMENT
कल्याण क्राईम ब्रांचचे अधिकाऱ्यांना 24 जानेवारी रोजी एका गंभीर गुन्ह्यातील आरोपीला जमीन मिळवून देण्याचा प्रयत्न सुरु असल्याचे गुप्त माहिती मिळाली होती. मिळालेली माहितीनुसार, क्राईम ब्रांचचे वरिष्ठ पोलीस निरिक्षक किशोर शिरसाट यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक भूषण दायमा, पोलीस उप निरीक्षक मोहन कळमकर, पोलीस उप निरीक्षक नवनाथ कवडे, संजय माळी, बापुराव जाधव, किशोर पाटील आदीने त्यानुसार 4 संशयितांना सापळा रचून कल्याण कोर्ट परिसरातून पकडून ताब्यात घेतले.
या प्रकरणात वकील महमूद रफीक अब्दुल सत्तार शेख सह (राहणारा कल्याण), जयपाल समाधानम ( राहणारा मालाड), संतोष कन्हैयालाल मौर्या (राहणारा धारावी), महमद हबीय महमद रफीक हश्मी (राहणारा जोगेश्वरी), बंधू ऊर्फ चंद्रकांत अर्जुन खामकर (राहणारा वसई) यांना अटक करण्यात आली आहे.
हे वाचलं का?
त्यांच्यावर कलम 420, 464, 465, 468, 451 आणि 34 प्रमाणे गुन्हा दाखल करून त्यांना अटक करण्यात आलेली आहे. वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक किशोर शिरसाट व त्याxचे सहकाऱ्यांनी ही कामगिरी केली आहे.
बोगस जामिनदारांचे वकील रफीक शेख हे सर्व कागदपत्रे व्यवस्थित असल्याचा दावा पोलिसांसमोर करीत होते. मात्र, पोलिसांना जामिनदाराच्या हालचालीविषयी संशय होता. पोलिसांनी सखोल चौकशी केली असता पोलिसांचा संशय खरा ठरला.
ADVERTISEMENT
देशभरात २० गुन्ह्यांमध्ये फरार असलेल्या ‘मोक्का’च्या आरोपीला कल्याणमध्ये अटक
ADVERTISEMENT
बोगस कागदपत्रांच्या आधारे डोंबिवली रेल्वे पोलीस ठाण्याकडून अटक करण्यात आलेल्या एका हत्येच्या आरोपीला बोगस जामिनदार तयार करण्यात आले होते. या सर्व आरोपींना अटक करुन आता पुढील तपास सुरु करण्यात आला आहे. या प्रकरणात एक मोठे रॅकेट असण्याची शक्यता आहे. त्या दृष्टीने पुढील तपास सुरु आहे. असे वरिष्ठ पोलीस निरिक्षक किशोर शिरसाट यांनी सांगितले.
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT