पुण्यात बांधकाम सुरू असलेल्या इमारतीच्या बेसमेंटमध्ये लोखंडी जाळी पडून पाच मजुरांचा मृत्यू

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

पुण्यात बांधकाम सुरू असलेल्या एका इमारतीच्या बेसमेंटमध्ये लोखंडी जाळी पडली. या घटनेत पाच मजुरांचा मृत्यू झाला आहे. तर या घटनेत तीन जण जखमी झाले आहेत. पुण्यातल्या येरवडा नगर भागात असलेल्या शास्त्री वाडिया बंगल्याच्या जवळ ही घटना घडली आहे. या इमारतीचं बांधकाम सुरू होतं. त्याचवेळी ही जाळी कोसळली. त्यात पाच मजुरांचा मृत्यू झाला. इतर तिघेजण गंभीर जखमी झाले आहेत. वाहतूक पोलीस आयुक्त राहुल श्रीरामे यांनी ही माहिती दिली आहे.

ADVERTISEMENT

राहुल श्रीरामे यांनी दिलेल्या माहितीनुसार, पुण्यातल्या येरवडा पोलीस स्टेशनजवळ वाडिया बंगल्याच्या शेजारी एका मॉलचं काम रात्री उशिरापर्यंत सुरू होतं. याच दरम्यान बेसमेंट पार्किंगवर स्लॅबमध्ये टाकण्यासाठी आणली गेलेली 16 MM साईजच्या लोखंडी सळ्यापासून बनलेली जाळी ठेवली होती. ही जाळी एके ठिकाणी उभी करून मजूर त्यांचं काम करत होते. मात्र अचानक ही जाळी काम करणाऱ्या 10 मजुरांवर कोसळली. या घटनेत पाच जणांचा मृत्यू झाला.

हे वाचलं का?

जाळी वजनदार होती. तसंच काही ठिकाणी टोकदारही होती. त्यामुळे ज्यांच्या अंगावर जाळी पडली त्यांच्या अंगात सळयाही घुसल्या. या घटनेची माहिती मिळताच अग्मिशमन दलाने या ठिकाणी धाव घेतली. जाळीच्या खाली दबलेल्या मजुरांना जाळी कटरने कापून सोडवण्यात आलं. मात्र या घटनेत पाच जणांचा मृत्यू झाला आहे. उर्वरित पाच जणांवर उपचार सुरू आहेत.

हे सर्व मजूर कुठले आहेत? याची माहिती पोलीस घेत आहेत. या प्रकरणी येरवडा पोलीस ठाण्यात रात्री उशिरा गुन्हा दाखल करण्याची प्रकिया सुरू होती.

ADVERTISEMENT

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT