Mucor mycosis मुळे महाराष्ट्रात 90 मृत्यू, पुढचे दहा दिवस अत्यंत महत्त्वाचे-राजेश टोपे

मुस्तफा शेख

कोरोना पाठोपाठ महाराष्ट्राला Mukar Mycosis चा मोठ्या प्रमाणावर फटका बसला आहे. राज्यात सध्या 1500 म्युकरमायकोसिसचे रूग्ण आहेत. महाराष्ट्रात आत्तापर्यंत या रोगामुळे 90 जणांचा मृत्यू झाला आहे. म्युकर मायकोसिससाठी पुढचे 10 दिवस हे अत्यंत महत्त्वाचे आहेत असं आज राजेश टोपे यांनी सांगितलं आहे. महात्मा ज्योतिराव फुले योजनेच्या अंतर्गत सर्व रेशनकार्ड धारकांचे उपचार केले जाणार आहेत. म्युकर […]

ADVERTISEMENT

Mumbai Tak
google news

कोरोना पाठोपाठ महाराष्ट्राला Mukar Mycosis चा मोठ्या प्रमाणावर फटका बसला आहे. राज्यात सध्या 1500 म्युकरमायकोसिसचे रूग्ण आहेत. महाराष्ट्रात आत्तापर्यंत या रोगामुळे 90 जणांचा मृत्यू झाला आहे. म्युकर मायकोसिससाठी पुढचे 10 दिवस हे अत्यंत महत्त्वाचे आहेत असं आज राजेश टोपे यांनी सांगितलं आहे. महात्मा ज्योतिराव फुले योजनेच्या अंतर्गत सर्व रेशनकार्ड धारकांचे उपचार केले जाणार आहेत.

म्युकर मायकोसिसचे 1500 रूग्ण सध्या महाराष्ट्रात आहेत. त्यातले 850 रूग्ण सक्रिय आहेत. या संदर्भातले इंजेक्शन्स उपलब्ध करून देण्यासाठी आम्ही केंद्र सरकारला विनंती केली आहे. साधारणतः दोन लाख इंजेक्शन्स आपल्याला लागणार आहेत. म्युकर मायकोसिसच्या बाबत जे इंजेक्शन मिळणार आहेत ते 31 मेनंतर मिळणार आहेत त्यामुळे हे 10 ते 11 दिवस महत्त्वाचे आहेत असंही राजेश टोपे यांनी सांगितलं आहे.

नाशिकमध्ये वाढले Mukar Mycosis चे रूग्ण, उपचार न मिळाल्यान होतोय 15 टक्के रूग्णांचा मृत्यू

कोरोनामध्ये ज्यांच्या रक्तातली साखर वाढली आहे त्यांना म्युकर मायकोसिस होण्याची शक्यता जास्त आहे. या संदर्भातले उपचार करावे लागत आहेत ती मोठी प्रक्रिया आहे. प्लास्टिक सर्जन, न्युरो सर्जन, डेंटिस्ट या सगळ्यांची गरज या आजारावर उपचार करण्यासाठी गरज लागते आहे. महात्मा ज्योतिराव फुले योजनेच्या अंतर्गत एक हजार रूग्णालयं आहेत त्यातल्या किती रूग्णालयांमध्ये उपचार होत आहेत ते आम्ही पाहतो आहोत. या आजारावरचं इंजेक्शन एम्फोटेरेसमेन बी हे आहे. ते खूप महाग आहे. ते खरेदी करण्याची तयारी आम्ही सुरू केली आहे. सरकारी रूग्णालयं आणि महात्मा फुले जन आरोग्य योजनेच्या रूग्णालयांनाही ही इंजेक्शन्स दिली जाणार आहेत.

हे वाचलं का?