Javed Akhtar यांच्या विरोधात RSS कार्यकर्त्यांतर्फे फौजदारी तक्रार बदनामी प्रकरणी नोटीस
गीतकार जावेद अख्तर यांच्याविरोधात फौजदारी तक्रार करण्यात आली आहे. 100 कोटी रूपयांची अब्रू नुकसानाची दावा करणारी नोटीस दिली आहे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या कार्यकर्त्यांनी ही कारवाई त्यांच्या विरोधात केली आहे. त्यामुळे जावेद अख्तर यांच्या अडचणींमध्ये भर पडली आहे असंच दिसतं आहे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची तुलना तालिबानशी करणं जावेद अख्तर यांना महागात पडणार असं दिसतं आहे. RSS […]
ADVERTISEMENT
गीतकार जावेद अख्तर यांच्याविरोधात फौजदारी तक्रार करण्यात आली आहे. 100 कोटी रूपयांची अब्रू नुकसानाची दावा करणारी नोटीस दिली आहे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या कार्यकर्त्यांनी ही कारवाई त्यांच्या विरोधात केली आहे. त्यामुळे जावेद अख्तर यांच्या अडचणींमध्ये भर पडली आहे असंच दिसतं आहे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची तुलना तालिबानशी करणं जावेद अख्तर यांना महागात पडणार असं दिसतं आहे.
ADVERTISEMENT
RSS चे जुने कार्यकर्ते धृतीमन जोशी यांनी जावेद अख्तर यांच्या विरोधात फौजदारी तक्रार दाखल करण्यासाठी कुर्ला न्यायलायत अर्ज दिला आहे. 4 सप्टेंबरला तालिबान या दहशतवादी संघटनेने अफगाणिस्तानवर ताबा घेतला त्यानंतर जावेद अख्तर यांनी RSS आणि तालिबान यांची तुलना केली. हिंदू समाज आणि हिंदूंना बदनाम करण्यासाठीच त्यांनी ही बदनामी केली असंही जोशी यांनी म्हटलं आहे.
जोशी म्हणतात, एवढंच करून जावेद अख्तर थांबले नाहीत तर त्यांनी संघाची तुलना थेट कर्करोगाशी केली आहे. संघ म्हणजे समाजाला लागलेला कॅन्सर आहे असं जावेद अख्तर म्हणाले. त्यांच्या या वक्तव्यांमागे बदनामी करण्याचाच कट आहे आणि हेतू आहे हे स्पष्ट दिसते. जे आरएसएस मध्ये सहभागी आहेत किंवा सहभागी होऊ इच्छितात त्यांना यापासून परावृत्त करणं हाच एक हेतू यामागे दिसतो असंही जोशी यांनी आपल्या अर्जात म्हटलं आहे. जावेद अख्तर यांनी केलेली वक्तव्यं ही दिशाभूल करणारी आहेत असंही जोशी यांनी स्पष्ट केलं आहे.
हे वाचलं का?
दुसरीकडे मुंबईतले वकील संतोष दुबे यांनी गीतकार जावेद अख्तर यांना 100 कोटींचा अब्रू नुकसानीच्या दाव्याची नोटीस पाठवली आहे. लेखी माफी मागा अन्यथा मला अब्रू नुकसानीचा दावा करावा लागेल असं दुबे यांनी म्हटलं आहे.
काय म्हणाले होते जावेद अख्तर?
ADVERTISEMENT
‘बुरसटलेल्या विचारांच्या लोकांची संख्या खूप कमी आहे. त्यांना जे म्हणायचं म्हणत राहू द्या. ते त्यात यशस्वी होणार नाहीत. जगभरातील हिंदूत्ववाद्यांनाही असंच हवं आहे. तालिबान, इस्लामिका राष्ट्रांना जे हवंय, तसंच यांना हिंदू राष्ट्र हवं आहे. हे एक लोक एकाच मानसिकतेचे आहेत’, असंही जावेद अख्तर म्हणाले.
ADVERTISEMENT
‘तालिबान रानटी वृत्तीची आहे, यात कसलीही शंका नाही. पण, आरएसएस, विश्व हिंदू परिषद, बजरंग दल यांना पाठिंबा देणारे, त्यांचं समर्थन करणारेही तालिबानचं समर्थन करणाऱ्यांसारखेच आहेत. भारत समाजवादी (सेक्युलर) देश आहे. त्यामुळे तालिबानचा विचार कोणत्याही भारतीयाला पटणार नाही. या देशातील जास्त लोक हे सभ्य आणि सहनशील आहेत’, असं मत जावेद अख्तर यांनी मांडलं होतं.
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT