देवेंद्र फडणवीस नैराश्यात; आदित्य ठाकरेंचं प्रत्युत्तर, राऊतांवर उधळली स्तुतीसुमने
राज्यात गेल्या काही काळापासून शिवसेना आणि भाजपतील आरोप-प्रत्यारोप वाढत असल्याचं दिसत आहे. भाजपकडून शिवसेनेला लक्ष्य केलं जात असल्याचं चित्र असून, त्याला शिवसेनेच्या नेत्यांकडून प्रत्युत्तर दिलं जात आहे. अशातच विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केलेल्या एका विधानाला प्रत्युत्तर देताना राज्याचे पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे यांनी फडणवीसांना टोला लगावला. त्याचबरोबर संजय राऊतांच्या कामाबद्दलही त्यांनी महत्त्वाचं भाष्य केलं. […]
ADVERTISEMENT
राज्यात गेल्या काही काळापासून शिवसेना आणि भाजपतील आरोप-प्रत्यारोप वाढत असल्याचं दिसत आहे. भाजपकडून शिवसेनेला लक्ष्य केलं जात असल्याचं चित्र असून, त्याला शिवसेनेच्या नेत्यांकडून प्रत्युत्तर दिलं जात आहे. अशातच विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केलेल्या एका विधानाला प्रत्युत्तर देताना राज्याचे पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे यांनी फडणवीसांना टोला लगावला. त्याचबरोबर संजय राऊतांच्या कामाबद्दलही त्यांनी महत्त्वाचं भाष्य केलं.
ADVERTISEMENT
राज्याचे पर्यटनमंत्री आणि शिवसेनेचे आमदार आदित्य ठाकरे रविवारी चंद्रपूर जिल्ह्याच्या दौऱ्यावर होते. आदित्य ठाकरेंनी विविध कामांची पाहणी केली. दौऱ्यादरम्यान त्यांनी माध्यमांशीही संवाद साधला.
मोठी बातमी: आदित्य ठाकरेंच्या नेतृत्वात शिवसेना देशभर लोकसभा निवडणूक लढवणार!
हे वाचलं का?
‘राज्यात महाविकास आघाडी सरकार अस्तित्वात नाही’, असं विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी टीका करताना म्हटलं होतं. फडणवीस यांनी केलेल्या विधानावर आदित्य ठाकरे यांनी उत्तर दिलं. ‘त्यांचं सरकार गेल्यानंतर दोन वर्षात त्यांच्यामध्ये नैराश्य आलेलं आहे. त्यांच्या सगळ्यांच्या वागण्यातून दिसत आहे. मध्यंतरी त्यांना मुख्यमंत्री आहेत की नाही असं वाटत होतं. आता त्यांना महाविकास आघाडी सरकारबद्दल तसं वाटतं आहे. त्यामुळेच ते अशी विधानं करत आहेत,’ असा टोला आदित्य ठाकरे यांनी लगावला.
‘महाविकास आघाडी सरकार उत्तम काम करत आहे. सगळ्यांना हे दिसत आहे. जे डोळे बंद करून फिरत आहेत, त्यांना ते कसं दिसेल?’ असा उपरोधिक सवालही आदित्य ठाकरेंनी भाजपला केला.
ADVERTISEMENT
Goa Conclave: ‘जे महाराष्ट्रात घडलं तेच गोव्यातही होईल, पुन्हा BJPचा मुख्यमंत्री होणार नाही’, राऊतांचा दावा
ADVERTISEMENT
बगड खिडकी, चांदा किल्ला येथे स्वच्छता अभियानाची पाहणी केली. आपल्या ऐतिहासिक वारस्याचे संवर्धन करणारी ही मोहीम अतिशय महत्त्वाची असून संपूर्ण महाराष्ट्रात राबवली जाईल, यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. pic.twitter.com/CSyq8UqmvF
— Aaditya Thackeray (@AUThackeray) February 13, 2022
संजय राऊत यांच्याबद्दल आदित्य ठाकरे म्हणाले…
गेल्या काही दिवसांपासून शिवसेनेचे खासदार संजय राऊत चर्चेत आहेत. उपराष्ट्रपतींना पत्र लिहिल्यानंतर राऊतांनी भाजपवर टीकास्त्र डागलं होतं. त्याचबरोबर आगामी लोकसभा निवडणूक शिवसेना आदित्य ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली लढवणार, असंही राऊत म्हणाले आहेत. या सगळ्या पार्श्वभूमीवर बोलताना आदित्य ठाकरे म्हणाले, ‘संजय राऊत हे उत्तम निवडणूक व्यवस्थापन करत आहेत. आम्ही सर्व त्यांच्या सोबत आहोत. ते एकटे असल्याचं केवळ मीडियाला वाटतं,’ असं उत्तर त्यांनी दिलं.
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT