सांगलीच्या दत्तात्रेय लोहारांना आनंद महिंद्रांनी दिली नवी कोरी बोलेरो

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

भंगारातील जुन्या वाहनांच्या साहित्यापासून मिनी जिप्सीचं मॉडेल तयार करणारे सांगलीतल्या देवराष्ट्रचे दत्तात्रेय लोहार हे काही दिवसांपूर्वी सोशल मीडियावर चांगलेच चर्चेत आले होते. लोहार यांच्या या डोकॅलिटीची खुद्द उद्योगपती आनंद महिंद्रा यांनाही भुरळ पडली होती. लोहार यांच्या कल्पकतेचं कौतुक करताना महिंद्रा यांनी त्यांना एक नवीन गाडी गिफ्ट करण्याचा शब्द दिला होता.

ADVERTISEMENT

आनंद महिंद्रा यांनी आपला शब्द खरा करत लोहार यांना नवीकोरी बोलेरो गाडी गिफ्ट म्हणून दिली आहे. नुकताच या नव्या कोऱ्या गाडीचा ताबा लोहार कुटुंबाला सोपवण्यात आला, ज्यामुळे त्यांच्या घरात सध्या आनंदाचं वातावरण आहे.

आपल्या मुलीची इच्छा पूर्ण करण्यासाठी देवराष्ट्रेच्या दत्तात्रेय लोहार यांनी भंगारातील वाहनांचे साहित्य वापरून मिनी जिप्सी तयार केली आहे. त्यांच्या मिनी जिप्सीचा व्हिडिओ सोशल मीडियात भलताच व्हायरल झाला होता. अनेकांनी त्यांच्या कल्पकतेचे कौतुक केलं होतं. सांगलीतील महिंद्राच्या शोरूममध्ये माजी केंद्रीय मंत्री प्रतीक पाटील, विशाल पाटील आणि जितेश कदम यांच्या हस्ते पूजन करून गाडी लोहार यांना देण्यात आली.

हे वाचलं का?

फॅब्रिकेशनचे काम करणारे दत्तात्रेय लोहार यांनी गेल्या महिन्यात आनंद महिंद्रा यांची ऑफर नाकारून मिनी जिप्सी स्वतःजवळ ठेवण्याचा निर्णय घेतला होता. परंतू आरटीओ ऑफिसकडून मिनी जिप्सीला परवानगी मिळणार नसल्याचं लक्षात येताच त्यांनी आनंद महिंद्रांची ऑफर स्वीकारली. यानिमित्ताने लोहार कुटुंबीयांचे चारचाकी गाडीचं स्वप्न साकार झालं आहे. बोलेरो भेट दिल्याबद्दल दत्तात्रेय लोहार यांनी आनंद महिंद्रा यांचे विशेष आभार मानले.

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT