धक्कादायक! अभिनेते मोहन जोशींना झाली कोरोनाची लागण, आत्तापर्यंत घेतले आहेत कोरोना लसीचे २ डोस
राज्यात सध्या कोरोनाने थैमान घातलं आहे. अनेक कलाकारांना देखील कोरोनाचा विळखा घातला आहे. त्यातच आता मराठी अभिनेते मोहन जोशी यांना देखील नुकतंच कोरोनाची लागण झाली माहिती मिळाली आहे. मुख्य म्हणजे मोहन जोशी यांनी कोरोना प्रतिबंधक लसीचे दोन्ही डोस घेतले होते. आणि त्यानंतर आता त्यांना कोरोनाची लागण झाली आहे. मोहन जोशी सध्या ‘अग्गंबाई सुनबाई’ या मालिकेत […]
ADVERTISEMENT
राज्यात सध्या कोरोनाने थैमान घातलं आहे. अनेक कलाकारांना देखील कोरोनाचा विळखा घातला आहे. त्यातच आता मराठी अभिनेते मोहन जोशी यांना देखील नुकतंच कोरोनाची लागण झाली माहिती मिळाली आहे. मुख्य म्हणजे मोहन जोशी यांनी कोरोना प्रतिबंधक लसीचे दोन्ही डोस घेतले होते. आणि त्यानंतर आता त्यांना कोरोनाची लागण झाली आहे.
ADVERTISEMENT
मोहन जोशी सध्या ‘अग्गंबाई सुनबाई’ या मालिकेत काम करतायत. महाराष्ट्रात कोरोना रूग्णांची वाढती संख्या लक्षात घेता मालिकांचं शूटींग बंद करण्यात आलं. त्यानंतर या मालिकेचं शूटींग गोव्यात करण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यामुळे मोहन जोशी यांच्यासह मालिकेची संपूर्ण टीम गोव्यात होती. त्याचवेळी मोहन जोशी यांना कोरोनाची लागण झाली.
‘अग्गंबाई सूनबाई’ मालिकेत ट्विस्ट; शुभ्राच्या आयुष्यात येणार एक नवी व्यक्ती
हे वाचलं का?
मोहन जोशी यांना कोणतीही लक्षणं दिसून येत नव्हती. सध्या मोहन जोशी गोव्यामध्ये क्वारंटाईन असून डॉक्टरांच्या देखरेखीखाली त्यांच्यावर उपचार सुरु आहेत. मात्र गोव्यातही सध्या लॉकडाऊन लागलं असून मालिकेचं शूटींग बंद आहे. तर मालिकेची बाकी टीम सिल्वासाला पोहोचली आहे.
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT