अभिनेता सोनू सूदने 20 कोटींची करचोरी केली; आयकर विभागाचा दावा
बॉलिवूड अभिनेता सोनू सूदच्या घरं, कार्यालयांसह विविध मालमत्तांवर छापेमारी केल्यानंतर आयकर विभागाने मोठा खुलासा केला आहे. सोनू सूदने तब्बल 20 कोटी रुपयांची कर चोरी केल्याचा दावा आयकर विभागाकडून करण्यात आला आहे. मागील तीन दिवसांपासून आयकर विभागाच्या अधिकाऱ्यांकडून सोनू सूदच्या आर्थिक व्यवहारांची पाहणी केली जात आहे. १५ सप्टेंबर रोजी आयकर विभागाने सोनू सूदच्या मुंबईत सहा मालमत्तांची […]
ADVERTISEMENT
बॉलिवूड अभिनेता सोनू सूदच्या घरं, कार्यालयांसह विविध मालमत्तांवर छापेमारी केल्यानंतर आयकर विभागाने मोठा खुलासा केला आहे. सोनू सूदने तब्बल 20 कोटी रुपयांची कर चोरी केल्याचा दावा आयकर विभागाकडून करण्यात आला आहे.
ADVERTISEMENT
मागील तीन दिवसांपासून आयकर विभागाच्या अधिकाऱ्यांकडून सोनू सूदच्या आर्थिक व्यवहारांची पाहणी केली जात आहे. १५ सप्टेंबर रोजी आयकर विभागाने सोनू सूदच्या मुंबईत सहा मालमत्तांची पाहणी केली होती. त्यानंतरही तपासणी सुरूच होती.
तीन दिवस चाललेल्या तपासणीनंतर आयकर विभागाकडून सोनू सूदवर कर चोरीचा आरोप करण्यात आला आहे. सोनू सूदने 20 कोटी रुपयांची कर चोरी केल्याचा दावा आयकरने केला असून, त्याच्या विरोधात यासंदर्भातले पुरावे मिळाले असल्याचंही आयकर अधिकाऱ्यांनी म्हटलं आहे.
हे वाचलं का?
…म्हणून सोनू सूदवर आयकरच्या धाडी पडल्यात; शिवसेनेचा भाजपवर खळबळजनक आरोप
आयकर विभागाने काय म्हटलंय?
ADVERTISEMENT
सोनू सूदने परदेशातील दात्यांकडून 2.1 कोटी रुपये नॉन प्रॉफिट पद्धतीने गोळा केले होते. हे अशा पद्धतीने निधी उभा करण्याच्या कायद्याचं उल्लंघन आहे. आतापर्यंतच्या तपासात 20 अशा नोंदी आढळून आल्या आहेत, ज्यात देणाऱ्यांनी फसवणुकीची कबुली दिली आहे. त्यांनी रोख रक्कम देऊन चेक दिल्याचंही मान्य केलं आहे’, असं आयकरने म्हटलं आहे.
ADVERTISEMENT
अभिनेता सोनू सूद आणि त्याच्याशी संबंधित व्यक्तींच्या मालमत्तांची झाडाझडती घेण्यात आली. यात काही आक्षेपार्ह नोंदी आणि पुरावे आढळून आले आहेत. अभिनेत्याने बनावट प्रणालीचा अवलंब केला. असुरक्षित बोगस कर्जाच्या असल्याचं दाखवलं होतं. त्यामाध्यमातून बेहिशोबी उत्पन्न व्यवहारात आणण्याचा प्रयत्न होता’, असंही आयकरने म्हटलं आहे.
सोनू सूदने कोरोना काळात प्रभावित झालेल्या लोकांना मदत करण्यासाठी चॅरिटी फाऊंडेशन स्थापन केलं होतं. ज्याच्या माध्यमातून जुलैमध्ये कोरोनाच्या पहिल्या लाटेत 18 कोटीहून अधिक पैसे जमा झाले होते. यावर्षी एप्रिलपर्यंत त्यातून 1.9 कोटी रुपये मदतकार्यासाठी खर्च करण्यात आले, तर उर्वरित रक्कम 17 कोटी रुपये नॉन प्रॉफिट बँकेत टाकण्यात आले.
सरकारने रूग्णांच्या अंतिम संस्काराचा खर्च उचलावा; अभिनेता सोनू सूदची विनंती
केंद्रीय प्रत्यक्ष कर मंडळ अर्थात CBDT च्या माहिती सोनू सूदच्या मुंबईसह लखनौ, कानपूर, जयपूर, दिल्ली आणि गुरुग्रामबरोबरच एकूण 28 ठिकाणमी छापेमारी करण्यात आली.
कारवाईवरून शिवसेनेनं केली होती टीका
‘सोनू सूद कोरोना काळात मजुरांना मदत करीत होता. त्याने देशातील 16 शहरांत ऑक्सिजन प्लॅण्ट लावले. स्कॉलरशिपची योजना सुरू केली. त्या माध्यमांतून त्याचा बोलबाला झाला. या कार्यक्रमांना भाजपचे लोकही उपस्थित राहत. महाराष्ट्राच्या राज्यपाल महोदयांनी सोनूस राजभवनावर बोलावून खास चहापान केले. तोपर्यंत सोनू हा या मंडळींना आपला, म्हणजे भाजपचा अंतरात्मा वाटत होता. सोनू महाशय जे महान समाजकार्य करीत आहेत त्यामागे फक्त भाजपचीच प्रेरणा, परंपरा आहे, असे ठासून सांगितले जात होते, पण सोनूच्या समाजकार्याशी पंजाब, दिल्लीसारख्या सरकारांनी हात मिळविण्याचा प्रयत्न करताच सोनू सूद म्हणजे करबुडवा असे ठरविण्यात आले’, अशी टीका शिवसेनेनं भाजपवर केली.
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT