सोनू सूद Corona पॉझिटिव्ह,गरजूंच्या मदतीसाठी जास्त वेळ मिळाल्याचं ट्विट चर्चेत
अभिनेता सोनू सूदची कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आली आहे. सोनू सूदने ट्विट करून यासंदर्भातली माहिती दिली आहे. नमस्कार मित्रांनो माझी कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आली असून मी स्वतःला क्वारंटाईन केलं आहे. काळजीचं काहीही कारण नाही. आता माझ्याकडे आधीपेक्षा जास्त वेळ असणार आहे मी या वेळेचा उपयोग गरजूंना आणखी मदत करण्यासाठी करू शकतो. तुम्ही कोणत्याही अडचणीत असाल तरीही […]
ADVERTISEMENT
अभिनेता सोनू सूदची कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आली आहे. सोनू सूदने ट्विट करून यासंदर्भातली माहिती दिली आहे. नमस्कार मित्रांनो माझी कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आली असून मी स्वतःला क्वारंटाईन केलं आहे. काळजीचं काहीही कारण नाही. आता माझ्याकडे आधीपेक्षा जास्त वेळ असणार आहे मी या वेळेचा उपयोग गरजूंना आणखी मदत करण्यासाठी करू शकतो. तुम्ही कोणत्याही अडचणीत असाल तरीही मी मदतीसाठी तुमच्यासोबत आहे असं ट्विट सोनू सूदने केलं आहे.
ADVERTISEMENT
— sonu sood (@SonuSood) April 17, 2021
गेल्या वर्षभरापासून कोरोनामुळे महाराष्ट्रात आणि देशात समस्या निर्माण होत आहेत. देशात ही समस्या निर्माण झाल्यानंतर सोनू सूद चर्चेत होता कारण त्याने अनेक गरजवंतांना मदत केली होती. प्रवासी मजुरांना त्यांच्या घरी पोहचवणं असेल त्यांना इतर मदत करणं असेल यामध्ये सोनू सूद चर्चेत राहिला होता. आता कोरोनाची दुसरी लाट आली आहे. या लाटेत अनेकजण संक्रमित होत आहेत. सोनू सूदलाही कोरोनाची बाधा झाली आहे. अशात कोरोनाची बाधा झाल्यानंतर सोनू सूदने केलेलं ट्विटही चर्चेत आहे.
कोरोनाच्या संकटातून बाहेर पडण्यासाठी अभिनेता सोनू सूदने सांगितला उपाय
हे वाचलं का?
15 एप्रिलचं ट्विटही चर्चेत
नुकतंच सोनूने एक ट्विट केलं आहे. सोनूचं हे ट्विट सध्या बरंच चर्चेत होतं. सोनू त्याच्या ट्विटमध्ये लिहिलं होतं की, ‘महामारीची सगळ्यात मोठी शिकवण; देश वाचवायचा असेल तर दवाखाने बनवावे लागतील’. त्याचे हे ट्विट सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झालं होतं. आता त्याला कोरोनाची लागण झाली आहे.
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT