देशातील 5G नेटवर्कच्या विरोधात जुही चावलाची कोर्टात धाव

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

बॉलिवूडची प्रसिद्ध अभिनेत्री जुही चावला हिने देशातील फायजी नेटवर्कच्या विरोधात कोर्टात धाव घेतली आहे. जुही चावला तिच्या सामाजिक उपक्रमांसाठीही ओळखली जाते. देशात 5 G तंत्रज्ञान आणलं जातं आहे. त्यासाठीची चर्चा सुरू असतानाच जुही चावलाने कोर्टात धाव घेतली आहे. या सगळ्यामुळे पर्यावरणावर परिणाम होईल असं जुही चावलाने म्हटलं आहे.

ADVERTISEMENT

देशात 5 जी तंत्रज्ञान लागू करण्याच्या आधी याच्याशी संबंधित सर्व संशोधनांवर बारकाईने विचार केला पाहिजे त्यानंतरच ही टेक्नॉलॉजी भारतात लागू करावी. ही टेक्नॉलॉजी लागू केल्यास सामान्य जनता, जिवाणू, झाडं झुडपं आणि पर्यावरणावर होणाऱ्या परिणामांशी संबंधित संशोधनांचा बारकाईने अभ्यास करावा आणि त्यांच्या अहवालाच्या आधारावर ती भारतात लागू करायची की नाही याचा निर्णय घ्यावा

जुही चावला, अभिनेत्री

हे वाचलं का?

काय म्हटलं आहे जुही चावलाने?

देशात 5 जी तंत्रज्ञान लागू करण्याच्या आधी याच्याशी संबंधित सर्व संशोधनांवर बारकाईने विचार केला पाहिजे त्यानंतरच ही टेक्नॉलॉजी भारतात लागू करावी. ही टेक्नॉलॉजी लागू केल्यास सामान्य जनता, जिवाणू, झाडं झुडपं आणि पर्यावरणावर होणाऱ्या परिणामांशी संबंधित संशोधनांचा बारकाईने अभ्यास करावा आणि त्यांच्या अहवालाच्या आधारावर ती भारतात लागू करायची की नाही याचा निर्णय घ्यावा असं जुही चावलाने म्हटलं आहे.

ADVERTISEMENT

ADVERTISEMENT

आणखी काय म्हणते जुही?

कोणतंही अत्याधुनिक तंत्रज्ञान लागू करण्याच्या विरोधात मी नाही. उलट यामधून निर्माण होणाऱ्या नव्या उत्पादनांचा लाभही आपण घेत असतो. यामध्ये वायरलेस कम्युनिकेशनचाही समावेश आहे. पण उपकरणांच्या वापराबाबत आपण आजही गोंधळलेलो आहोत. कारण वायरफ्री गॅजेट्स आणि नेटवर्क सेल टॉवर्सशी संबंधित आपल्याच शोधातून हे लक्षात येतं की अशा प्रकारचे रेडिएशन नागरिकांच्या आरोग्य आणि त्यांच्या सुरक्षेसाठी हानीकारक आहेत.

भारतात 5G टेक्नॉलॉजी लागू करण्याआधी RF रेडिएशनमुळे महिला, पुरूष, लहान मुलं, बालकं, जनावरं, जीव जंतू, झाडं आणि पर्यावरणावर होणाऱ्या परिणामांचं योग्य प्रकारे संशोधन करण्याची आवश्यकता आहे. झालेल्या किंवा होणाऱ्या संशोधनांचा अहवाल हा जाहीर करण्यात यावा. हे तंत्रज्ञान भारतातल्या नागरिकांसाठी आणि येणाऱ्या पिढीसाठी सुरक्षित आहे की नाही? हे स्पष्ट केलं जावं आणि त्यानंतरच ही टेक्नॉलॉजी लागू करण्याचा विचार व्हावा असं जुही चावल्याच्या प्रवक्त्यानेही म्हटलं आहे.

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT