यंत्रणांना तयार ठेवा ! वाढती कोरोना रुग्णसंख्या पाहून नागपुरात विभागीय आयुक्तांचे आदेश

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

गेल्या काही दिवसांपासून नागपुरात कोरोनाग्रस्त रुग्णांच्या संख्येत सातत्याने वाढ होते आहे. या परिस्थितीवर नियंत्रण मिळवण्यासाठी नागपुरात लॉकडाउनची घोषणा करण्यात आली आहे. परंतू यानंतरही रुग्णसंख्येत कमी होताना दिसत नसल्यामुळे यंत्रणांना तयार ठेवण्याचे आदेश विभागीय आयुक्त डॉ. संजीव कुमार यांनी दिले आहेत. ज्या रुग्णांना तात्काळ वैद्यकीय सेवेची व ऑक्सीजनची गरज आहे त्यांना शासकीय व खासगी रुग्णालयात बेड उपलब्ध होतील याची काळजी घेण्याचे आदेश विभागीय आयुक्तांनी दिले आहेत. नागपुरात बुधवारी ३ हजार ३७० नवे रुग्ण सापडल्यामुळे आरोग्य यंत्रणांसमोरचं टेन्शन वाढलेलं आहे.

ADVERTISEMENT

नागपुरातील परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी विभागीय आयुक्त कार्यालयात आज महत्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीत महानगरपालिका आयुक्त राधाकृष्णन बी., जिल्हाधिकारी रविंद्र ठाकरे व इतर महत्वाचे अधिकारी उपस्थित होते. नागपूर जिल्ह्यासह विभागात कोरोना रुग्णांची संख्या सातत्याने वाढत असल्यामुळे शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, इंदिरा गांधी वैद्यकीय महाविद्यालय, एम्स आणि विविध खासगी वैद्यकीय महाविद्यालये, खासगी हॉस्पिटलमध्ये कोविड रुग्णांसाठी आवश्यक सर्व सुविधा सज्ज ठेवण्याच्या सूचना विभागीय आयुक्तांनी दिल्या.

नागपुरात कोविड रुग्णांची संख्या नियंत्रणात आणण्यासाठी लॉकडाऊनसह आवश्यक उपाययोजना लागू करण्यात आल्या आहेत. त्यासोबतच या रुग्णांच्या संपर्कात आलेल्या व्यक्तींचीही तपासणी करण्यात येत आहे. विभागात तसेच जिल्ह्यात तपासण्यांचे प्रमाण वाढविण्यात आल्यामुळे कोविड रुग्णही त्याच प्रमाणात वाढत असून, यापैकी ज्या रुग्णांना तात्काळ ऑक्सिजनसह उपचाराची आवश्यकता आहे, अशा रुग्णांसाठी प्राधान्याने बेड उपलब्ध होईल, यादृष्टीने नियोजन करण्यासाठी बैठकीत चर्चा झाली.

हे वाचलं का?

Corona चा महाराष्ट्रात वाढता कहर, दिवसभरात २३ हजारांपेक्षा जास्त रूग्ण पॉझिटिव्ह

खासगी व शासकीय रुग्णालयांमध्ये उपलब्ध असलेल्या बेडसंदर्भात माहिती जनतेला उपलब्ध होईल. तसेच ज्या रुग्णांना तात्काळ भरती करण्याची आवश्यकता नाही, अशा रुग्णांसाठी महानगरपालिकेतर्फे होम आयसोलेशनतर्फे मार्गदर्शन करुन त्यांना आवश्यक वैद्यकीय मदत त्यांच्या घरापर्यंत पोहचविण्यात येत आहे. रुग्णांनी अनावश्यक रुग्णालयांमध्ये भरती न होता प्रशासनाच्या सूचनांनुसार आवश्यक औषधोपचारासाठी सहकार्य करावे, असे आवाहन यावेळी प्रशासनातर्फे करण्यात आले आहे.

ADVERTISEMENT

Exclusive : कोरोनाची वाढती रुग्णसंख्या हे महाराष्ट्र सरकारचं अपयश नाही – डॉ. रमण गंगाखेडकर

ADVERTISEMENT

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT