Tauktae Cyclone Mumbai: झाडांची पडझड, मुसळधार पाऊस; चक्रीवादळाचा मुंबईला तडाखा

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

मुंबई: मुंबईत (Mumbai) सध्या मोठ्या प्रमाणात तौकताई चक्रीवादळाचा (Tauktae Cyclone) परिणाम दिसून येत आहे. पहाटेपासूनच मुंबईतील अनेक भागात प्रचंड वेगाने वारे वाहत आहेत. तसंच मुसळधार पाऊस देखील सुरु आहे. यामुळे मुंबईत अनेक ठिकाणी झाडं (Tree) कोसळण्याच्या घटना घडल्या आहेत. तसंच काही ठिकाणी मोठमोठे होर्डिंग्स देखील कोसळल्याचं समोर आलं आहेत.

ADVERTISEMENT

मुंबईत झाडं कोसळल्याने अनेक ठिकाणची वाहतूक (Traffic) ही ठप्प झाली आहे. तर काही ठिकाणी झाडं कोसळून वाहनं आणि दुकानांचं बरंच नुकसान झालं आहे.

जाणून घ्या मुंबईत कोणत्या ठिकाणी काय परिस्थिती:

हे वाचलं का?

वडाळा: मुंबईत पहाटेपासूनच चक्रीवादळाचा परिणाम दिसण्यास सुरुवात झाली आहे. मुंबईच्या वडाळा (Wadala) भागात पहाटेच्या सुमारास अत्यंत वेगाने वारे वाहत होते. तसंच पहाटे चार वाजेपासून अनेक भागात पावसाच्या सरी बरसत आहेत.

Tauktae Cyclone : मुंबईतला Sea Link पुढील सूचना मिळेपर्यंत बंद

ADVERTISEMENT

परळ: तौकताई चक्रीवादळ हे मुंबईपासून खोल समुद्रात असलं तरीही त्याचा परिणाम पाहायला मिळत आहे. कारण या वादळामुळे वारे अत्यंत वेगाने वाहत आहेत. त्यामुळेच परळच्या (Parel) डॉ. बाबासाहेब आंबेडकर मार्गावर एक झाड कोसळून वाहतुकीला काही प्रमाणात अडथळा निर्माण झाला आहे.

ADVERTISEMENT

वांद्रे: मुंबईतील पश्चिम उपनगरामध्ये देखील वाऱ्याच प्रचंड वेग असून जोरदार पाऊस बरसत आहे. यामुळेच वांद्रे (Bandra) येथे काही ठिकाणी झाडं कोसळण्याच्या घटना समोर येत आहेत.

जुहू: चक्रीवादळाचा सर्वात जास्त परिणाम हा पश्चिम उपनगरात पाहायला मिळत आहे. येथे सकाळपासूनच वादळी वारे वाहत आहेत. त्यामुळेच जुहू (Juhu) येथील एका मोठ्या दुकानवरील भलं मोठं होर्डिंग कोसळलं आहे.

Tauktae Cyclone: पाहा मुंबईत पोहचलेल्या चक्रीवादळाचा आता पुढचा प्रवास कसा असणार?

जुहू समुद्र किनारा: सकाळी 11 ते दुपारी 1 या दरम्यान मुंबईत तौकताई चक्रीवादळाचा परिणाम हा सर्वात जास्त जाणवणार आहे. त्यामुळे या दृष्टीने जुहू समुद्र किनारी (Juhu Sea Shore) प्रशासनाकडून काही उपाययोजना केल्या जात आहेत.

जुहू समुद्र किनारा: तौकताई चक्रीवादळाची तीव्रता लक्षात घेऊन मुंबईच्या जुहू सुमद्रकिनारी (Juhu Sea) सर्व उपकरणांसह NDRF ची एक टीम ही सज्ज ठेवण्यात आली आहे. या परिसरात काही आणीबाणीची परिस्थिती उद्भवल्यास ही टीम तात्काळ मदतकार्याला सुरुवात करेल.

गेट वे ऑफ इंडिया: मुंबईतील गेट वे ऑफ इंडिया (Gateway Of India Mumbai) येथील समुद्र हळूहळू खवळत असल्याचं सध्या दिसतं आहे. पुढील दोन तासात येथील समुद्र अधिक खवळण्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.

फोर्ट: सध्या मुंबई आणि परिसरात मुसळधार पावसाला सुरुवात झाली आहे. यावेळी पावसाच्या प्रचंड जोरदार सरी कोसळत आहे. सध्या फोर्ट (Fort) आणि ताज हॉटेल (Taj Hotel) परिसरात मुसळधार पावसामुळे दृश्यमानता कमी झाली आहे.

Tauktae Cyclone Live: तौकताई चक्रीवादळ मुंबईच्या समुद्रात दाखल, वाऱ्याचा तुफान वेग आणि मुसळधार पावसाच्या सरी

वरळी: वरळी (Worli) येथे एक भलं मोठं झाड कोसळल्याने टाऊनच्या दिशेने जाणारी एका बाजूची वाहतूक ही पूर्णपणे ठप्प झाली आहे. या भागात वाऱ्याचा वेग प्रचंड आहे.

सीपी टँक सर्कल: मुंबईतील सीपी टँक (CP Tank Circle) परिसरात तुफान वाहणाऱ्या वाऱ्यामुळे एक प्रचंड मोठं झाडं कोसळल्याने एक टॅक्सी आणि सहा दुकानांचं बरंच नुकसान झालं आहे.

मुंबईसाठी पुढील दोन तास हे अत्यंत महत्त्वाचे ठरणार आहेत. त्यामुळे मुंबईतील प्रत्येक भागातील नेमकी स्थिती काय आहे याचे अपडेट आपल्याला इथे पाहता येतील.

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT