Afzal Khan Tomb issue संदर्भातली याचिका सुप्रीम कोर्टाने काढली निकाली
अफझल खानाच्या कबरीभोवतीचं अवैध बांधकाम पाडण्यात आलं. त्यानंतर एक याचिका सुप्रीम कोर्टात दाखल करण्यात आली होती. अफझल खानाच्या कबरीच्या आसपास जे बांधकाम पाडण्यात आलं त्यानंतर ही याचिका दाखल केली होती. मात्र सुप्रीम कोर्टाने ही याचिका निकाली काढली आहे. सातारा प्रशासनाने कोर्टाला सांगितलं की जंगलातल्या जमिनीवर जे अवैध बांधकाम करण्यात आलं होतं ते हटवलं आहे. अफझल […]
ADVERTISEMENT
अफझल खानाच्या कबरीभोवतीचं अवैध बांधकाम पाडण्यात आलं. त्यानंतर एक याचिका सुप्रीम कोर्टात दाखल करण्यात आली होती. अफझल खानाच्या कबरीच्या आसपास जे बांधकाम पाडण्यात आलं त्यानंतर ही याचिका दाखल केली होती. मात्र सुप्रीम कोर्टाने ही याचिका निकाली काढली आहे. सातारा प्रशासनाने कोर्टाला सांगितलं की जंगलातल्या जमिनीवर जे अवैध बांधकाम करण्यात आलं होतं ते हटवलं आहे. अफझल खानाच्या कबरीला कुठलंही नुकसान पोहचवण्यात आलेलं नाही. हायकोर्टाच्या आदेशानंतर ही कारवाई करण्यात आली. त्यानंतर सुप्रीम कोर्टाने ही याचिका निकाली काढली आहे.
ADVERTISEMENT
महाराष्ट्रातल्या प्रतापगड सातारा या ठिकाणी असलेल्या अफझलखानाच्या कबरीला कुठलंही नुकसान झालेलं नाही. याची खात्री करण्यासाठी महाराष्ट्र राज्याला निर्देश मागणाऱ्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात सुनावणी झाली. राज्य सरकारच्या बाजूने अॅड. एन. के. कौल यांनी बाजू मांडली.
काय झालं कोर्टात कौल यांनी काय सांगितलं?
कौल : राज्य सरकारने जेव्हा अफझल खानाच्या कबरीभोवतीचं अवैध बांधकाम पाडण्यास सुरूवात केली तेव्हा तिथे मोठ्या प्रमाणावर जागा ताब्यात घेण्यात आल्याचं समोर आलं. एवढंच काय तर तिथे आणखी एक कबर सापडली जी अफझल खानाच्या शिष्याची आहे.
हे वाचलं का?
CJI: आपण नमूद करता आहात ती जागा कुठे आहे?
उत्तर-प्रतापगडाच्या पायथ्याशी किल्ल्यापासून ६०० मीटर अंतरावर
ADVERTISEMENT
कौल: ही बाब आम्ही हायकोर्टाच्याही लक्षात आणून दिली आहे.
ADVERTISEMENT
काय आहे प्रकरण?
अतिक्रमण पाडण्यासाठी बुधवारी (९ नोव्हेंबर) रात्रीपासूनच अतिक्रमण पाडण्यासाठी जोरदार तयारी सुरू झाली होती. शिंदे फडणवीस सरकारचा हा सर्जिकल स्ट्राइक मानला जात आहे शिवप्रताप दिनी अवतीभोवती अनेक हजारोंच्या संख्येने शिवभक्त महाबळेश्वर तालुका मध्ये दाखल झाले होते मात्र पोलिसांनी याबाबत कोणासही प्रतापगड किल्ल्याच्या परिसरात फिरण्यास मनाई केली.
144 कलम लागू केल्यामुळे कोणीही किल्ले प्रतापगडच्या परिसरात फिरल्यास त्यावर कडक कारवाई केली जात असल्याने परिसरात तणापूर्ण वातावरण निर्माण झालं होतं. किल्ले प्रतापगडाच्या पायथ्याशी असलेल्या अफजल खान कबरीच्या जवळील बांधकाम ९ नोव्हेंबरच्या रात्रीपासून पाडण्यास सुरू केल्याने प्रशासनाकडून मोठी खबरदारी घेण्यात आली.
छत्रपती शिवाजी महाराजांचा जबरदस्त पराक्रम म्हणून प्रतापगडाच्या पायथ्याला अफजल खानाचा कोथळा काढल्याचा इतिहास आहे. आजही त्याची साक्ष म्हणून अफजल खानाची कबर आहे. मात्र गेल्या काही वर्षात त्या परिसरात इतर काही प्रमाणात अतिक्रमण वाढले होते. यातून अनेकदा वाद – प्रतिवाद सुरू होता. कायदा आणि सुव्यवस्था निर्माण होण्याचे विषय ऐरणीवर आले होते.
याचिकाकर्त्याच्या वकिलांनी सांगितले की, सर्वोच्च न्यायालयाने याआधी ते पाडण्यास स्थगिती दिली होती. या प्रकरणी मुंबई उच्च न्यायालयात अवमान याचिका दाखल करण्यात आली होती. तूर्तास, आम्ही या प्रकरणाच्या विध्वंस आणि सुनावणीवर अंतरिम स्थगिती मागितली आहे.
यावेळी न्यायालयाने याचिकाकर्त्यांच्या वकिलांना 1600 मध्ये जर अफजल खानचा मृत्यू झाला असेल तर 1959 मध्ये तिथं कबर कशी बनली? असा सवाल विचारला. तसंच हे वनजमिनीवरील अतिक्रमण असल्याचही न्यायालयानं निरीक्षण नोंदवलं. यावर वकिलांनी उत्तर दिलं की तिथं कबर आधीपासूनच आहे. सद्यस्थितीत न्यायालयाने या प्रकरणी कोणताही दिलासा दिलेला नाही. हा सगळा वाद सुप्रीम कोर्टात गेला होता. सुप्रीम कोर्टाने ही याचिका निकाली काढली आहे.
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT