Nitin Gadkari यांनी मुख्यमंत्र्यांना लिहिलेल्या पत्राला Ajit Pawar यांचं उत्तर

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

पुणे: केंद्र सरकारची जी रस्त्यांची कामं आहेत त्यात शिवसैनिक अडथळे आणत असल्याची थेट तक्रार केंद्रीय केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी(Niti Gadkari) यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) यांच्याकडे केली. ज्याला आता राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी उत्तर दिलं आहे.

ADVERTISEMENT

केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे पत्राद्वारे मागणी केली रस्त्यांच्या कामात अडथळा आणणाऱ्या शिवसैनिकांना आपण समज द्यावी. याचविषयी जेव्हा अजित पवार यांना पत्रकारांनी विचारणा केली तेव्हा त्यांनी याविषयी सविस्तर प्रतिक्रिया दिली आहे. ते पुण्यातील (Pune) ध्वजारोहणाच्या कार्यक्रमानंतर पत्रकारांशी संवाद साधत होते.

गडकरींनी मुख्यमंत्र्यांना लिहिलेल्या पत्रावर पाहा अजित पवार काय म्हणाले:

हे वाचलं का?

‘मी याबाबतची काल बातमी वाचली आहे. तो आरोप असून त्यामध्ये तथ्य आहे की नाही. ते तपासून पाहण्याची गरज आहे. मी मागील 30 वर्षापासून समाजकारणात आणि राजकारणात काम करीत आहे. त्या दरम्यान नेहमी सांगत आलो आहे की, हा जनतेचा पैसा असतो. जनतेच्या पैशाचा विनियोग चांगल्या कामाला झाला पाहिजे.’

‘कामाचा दर्जा चांगला राखला गेला पाहिजे. तो दर्जा चांगला राखला जात नसेल तर संबधित ठेकेदारावर कारवाई झाली पाहिजे. जर ठेकेदार चांगल काम करत असेल आणि काही जण राजकीय पक्षाचा आधार घेऊन किंवा मिळालेल्या पदाचा गैरवापर करून जर कोणाला त्रास देत असेल तर तो त्रास ताबडतोब थांबविला गेला पाहिजे.’

ADVERTISEMENT

‘आता गडकरींनी थेट मुख्यमंत्र्यांना पत्र लिहिले आहे. पण मी गेली पावणेदोन वर्ष मुख्यमंत्र्यांसोबत काम करीत आहे. त्यादरम्यान अनेक उद्घाटन आणि भूमिपूजनाच्या कार्यक्रमावेळी त्यांचं एकच सांगणं असतं. कामाचा दर्जा चांगला ठेवा हा त्यांचा कटाक्ष असतो. जेव्हा अधिकाऱ्यांसोबत बैठक होते. तेव्हा पर्यावरण, कामाचा दर्जा, विकास कामादरम्यान वृक्षतोड कशी टाळता येईल याकडे त्यांचा विशेष प्रयत्न असतो. त्यामुळे या प्रकरणी ते लक्ष घालतील आणि शहानिशा निश्चित करतील. याबद्दल मला 100 टक्के खात्री आहे.’

ADVERTISEMENT

Nitin Gadkari letter To Uddhav Thackeray : शिवसेनेच्या लोकप्रतिनिधींना आवरा! गडकरींनी दिला इशारा

‘त्यामधून नेमकी वस्तूस्थिती समोर येण्यास मदत होईल. कुठल्या कार्यकर्त्यांने, पदाधिकाऱ्याने किंवा नागरिकाने विकास कामात अडथळा आणता कामा नये.’ असंही अजित पवार यावेळी म्हणाले आहेत.

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT