आनंद आणि समाधान…युद्धभूमी ते मायभूमी

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

ADVERTISEMENT

रशिया आणि युक्रेन यांच्यातील युद्धस्थितीत अडकलेल्या भारतीय विद्यार्थ्यांचं मायदेशी आगमन सुरु झालं आहे.

हे वाचलं का?

शनिवारी संध्याकाळी साडेसात वाजता २१९ विद्यार्थ्यांना घेऊन पहिलं विमान मुंबईत दाखल झालं. आपल्या मायदेशी दाखल झाल्यानंतर या विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर एक वेगळ्याच प्रकारचं समाधान दिसत होतं.

ADVERTISEMENT

या विद्यार्थ्यांचं मुंबई विमानतळावर स्वागत करण्यात आलं.

ADVERTISEMENT

यापैकी अनेक विद्यार्थ्यांनी रशियाने लष्करी कारवाईला सुरुवात केल्यानंतर युद्धजन्य परिस्थितीचा अनुभव घेतला. परंतू यातून आपल्या मायदेशी दाखल झाल्यानंतर या विद्यार्थ्यांचा जीव भांड्यात पडला.

केंद्रीय मंत्री पियुष गोयल, राज्याचे परिवहन मंत्री अनिल परब आणि इतर नेत्यांनी या विद्यार्थ्यांचं मुंबई विमानतळावर स्वागत केलं.

विमानतळावर दाखल झालेले भारतीय विद्यार्थी

यापैकी अनेक विद्यार्थी युक्रेनमध्ये लष्करी कारवाईदरम्यान बंकरमध्ये, मेट्रो स्टेशनवर जिथे जागा मिळेल तिकडे राहिले होते. या खडतर काळातून बाहेर पडून आता आपल्या देशात आल्यानंतर शांततेते काही क्षण अनुभवताना एक विद्यार्थिनी

काही विद्यार्थी भारतात दाखल झाले असले तरीही त्यांचे काही मित्र अजुनही युक्रेनमध्ये अडकून पडले आहेत. त्यांच्यामुळे या विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर चिंता कायम आहे.

मुंबई विमानतळावर बाहेर आल्यानंतर या विद्यार्थ्यांना प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींनी गराडा घातला होता.

आपल्या घरच्यांना भेटून या विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर समाधान आणि आनंद दिसून येत होता.

युक्रेनमध्ये अडकलेल्या पालकांवर आतापर्यंत नेमकी काय परिस्थिती ओढावली असेल आणि आपली मुलं घरी आल्यानंतर त्यांना झालेला आनंद हा या फोटोत दिसतो आहे.

आपल्या मुलांचं स्वागत करताना पालक

गेले अनेक दिवस या पालकांचा जीव टांगणीला लागला होता. परंतू आता आपली मुलं भारतात परत आल्यामुळे यांना हायस वाटत आहे.

आपल्या मुलांना भारतात आल्यानंतर मिठी मारल्यानंतर अनेक पालकांच्या डोळ्यात आनंदाश्रू आले.

केंद्र सरकार युक्रेनमध्ये अडकलेल्या विद्यार्थ्यांसाठी आणखी विमानं पाठवणार आहे.

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT