शिवसैनिकांची थेट पोलीस चौकी ताब्यात घेण्यासाठी पोलीस अधिकाऱ्याशी हुज्जत
मिथिलेश गुप्ता, उल्हासनगर: उल्हासनगर जवळील म्हारळ भागातील शिवसेना पक्षाच्या शिवसैनिकांनी थेट पोलीस चौकीच ताब्यात घेण्याचा प्रयत्न केल्याचा विचित्र प्रकार समोर आला आहे. यासाठी थेट वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्याशी हुज्जत घालत थेट पोलीस चौकी ताब्यात घेण्यापर्यंत शिवसैनिकांची मजल गेल्याचे बोललं जात आहे. इतकंच नव्हे तर पोलीस चौकीला पक्षाचे झेंडे देखील लावण्यात आले आहेत. ही बाब पोलिसांना कळताच […]
ADVERTISEMENT

मिथिलेश गुप्ता, उल्हासनगर: उल्हासनगर जवळील म्हारळ भागातील शिवसेना पक्षाच्या शिवसैनिकांनी थेट पोलीस चौकीच ताब्यात घेण्याचा प्रयत्न केल्याचा विचित्र प्रकार समोर आला आहे. यासाठी थेट वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्याशी हुज्जत घालत थेट पोलीस चौकी ताब्यात घेण्यापर्यंत शिवसैनिकांची मजल गेल्याचे बोललं जात आहे. इतकंच नव्हे तर पोलीस चौकीला पक्षाचे झेंडे देखील लावण्यात आले आहेत.
ही बाब पोलिसांना कळताच पोलिसांनी या शिवसैनिकांना रोखत त्यांना त्या ठिकाणाहून बाहेर काढले. दरम्यान या सगळ्या घटनेचा व्हिडिओ आता सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला आहे. त्यामुळे नेमकी आता शिवसैनिकांनी ही पोलीस चौकी कोणत्या आधारावर ताब्यात घ्यायला लावली होती हे अजून कळू शकलेले नाही.
मात्र व्हायरल व्हीडिओमध्ये ‘पोलीस चौकी आम्ही बांधून दिली आहे, तुम्हाला दुसऱ्या ठिकणी पोलीस चौकी उभारली गेली आहे. त्यामुळे आता ती आमच्या ताब्यात द्या. त्या ठिकाणी शाखा उभारायची आहे.’ असं काही शिवसैनिक व्हीडिओमध्ये बोलताना दिसत आहेत.
या व्हिडिओमध्ये शिवसेना शहरप्रमुख सोमनाथ पाटील, नंदू म्हात्रे हे हुज्जत घालताना दिसत आहेत. तर शिवसैनिकांचा चौकी ताब्यात घेण्याचा कोणताही प्रयत्न नव्हता. ती चौकी आमच्या पदाधिकाऱ्यांनी 20 ते 25 वर्षापूर्वी बांधून दिली होती. आता पोलिसांना नवी पोलीस चौकी मिळाली आहे. त्यामुळे जुन्या पोलीस चौकीची जागा बिल्डरला न जाता पुन्हा नागरिकांच्या कामासाठी द्यावी. अशी आमची मागणी असल्याचे उल्हासनगर शिवसेना शहर प्रमुख राजेंद्र चौधरी यांनी सांगितले.










