Tauktae चा फटका, ससून डॉकमधील अंदाजे ८० बोटींचं नुकसान

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा सामना करत असलेल्या मुंबई शहराला आज तौकताई वादळाचा फटका बसला. सकाळपासून सुरु असलेल्या संततधार पावसामुळे शहरातील अनेक सखळ भागांमध्ये पाणी साचलेलं पहायला मिळालं. मुंबईतील मच्छिमार बांधवांनाही या चक्रीवादळाचा चांगलाच फटका बसला.

ADVERTISEMENT

IMD ने शहरात सोसाट्याचा वारा आणि पावसाचा अंदाज वर्तवल्यानंतर मच्छिमारांनी आपल्या बोटी समुद्रात टाकल्या नाही. परंतू ससून डॉक परिसरात लावलेल्या २०० बोटींपैकी ५० ते ८० बोटींना या वादळाता फटका बसला आहे. आज दिवसभरात शहरात सोसाट्याचा वारा वाहत होता, ज्यामुळे ससून डॉक परिसरात मच्छिमारांनी लावलेल्या नौकांचं चांगलंच नुकसान झालं. यातल्या अनेक नौका वाऱ्याचा वेग थोडासा कमी झाल्यानंतर क्रेनच्या सहाय्याने बाहेर काढण्यात आल्या.

हे वाचलं का?

याआधीही मुंबईला निसर्ग चक्रीवादळाचा फटका बसला होता. परंतू त्यावेळी जेवढं नुकसान झालं नव्हतं तेवढं नुकसान यंदा झाल्याची भावना मच्छिमारांनी बोलून दाखवली. यावेळी काही मच्छिमारांनी १९९२ पासून आतापर्यंत मुंबईतल्या समुद्रात अशा पद्धतीचं वादळ आणि वारा पाहिला नसल्याचं सांगितलं. मच्छिमार बांधवांसाठी कमाईचं मुख्य साधन ही त्यांची बोट असते, परंतू या चक्रीवादळाचे बोटींचं नुकसान केल्यामुळे आता या लोकांसमोर पुन्हा एकदा नव्याने सुरुवात करण्याची वेळ आली आहे.

Mumbai Cyclone Tauktae: चक्रीवादळाचा गंभीर परिणाम, मुंबईत कोसळधार; सी लिंक, मोनो रेल्वे बंद

ADVERTISEMENT

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT