कैदी नंबर … आर्थर रोड जेलने आर्यन खानला दिला ‘हा’ स्पेशल नंबर

सौरभ वक्तानिया

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

आर्यन खानला आज आर्थर रोड जेलने कैदी क्रमांक दिला आहे. आर्यन खानला ड्रग्ज प्रकरणात 2 ऑक्टोबरला अटक झाली. त्याचा जामीन गेल्या काही दिवसांपासून पुढे ढकलला जातो आहे. आजही कोर्टात तेच घडलं. आर्यन खानच्या जामिनावरची सुनावणी कोर्टाने राखून ठेवली आणि त्याचा तुरुंगातला मुक्काम वाढला. आता शाहरुख खानचा मुलगा आर्यन खान याला कैदी नंबर देण्यात आला आहे. हा कैदी नंबर म्हटला तर तसा स्पेशल आहे.

ADVERTISEMENT

काय आहे आर्यन खानचा कैदी नंबर?

हे वाचलं का?

आर्यन खान याचा तुरुंगातला मुक्काम 20 ऑक्टोबरपर्यंत वाढला आहे. त्यामुळे त्याला आज तुरुंगात कैदी नंबर देण्यात आला आहे. हा कैदी क्रमांक 956 असा आहे. त्यामुळे आता आर्यन खानला त्याच्या नावाने नाही तर कैदी क्रमांक 956 अशी हाक मारली जाणार आहे.

तुरुंगात असलेल्या प्रत्येकाला कैदी नंबर दिला जातो. त्याचप्रमाणे आज आर्यन खानलाही कैदी नंबर देण्यात आला आहे. आर्यन खानला आज 956 हा क्रमांक देण्यात आला आहे. तो जोपर्यंत तुरुंगात राहिल तोपर्यंत त्याला याच नंबराने ओळखलं जाणार आहे.

ADVERTISEMENT

दरम्यान आर्यन खानला 4500 रूपयांची मनी ऑर्डर पाठवण्यात आली आहे. ही मनी ऑर्डर त्याच्या कुटुंबाने पाठवली आहे. आर्यन खान कँटीनमध्ये जे पदार्थ विकत घेतो त्याचे पैसे यामधून वळते केले जाणार आहेत. तुरुंगातल्या नियमांप्रमाणे कोणत्याही कैद्याला महिन्याला खर्च करण्यासाठी मनी ऑर्डरतर्फे 4500 रूपयेच जास्तीत जास्त पाठवले जाऊ शकतात. त्याप्रमाणे हे पैसे आर्यनला पाठवण्यात आले आहेत, त्यातून आर्यन खान कँटीनमधल्या ज्या वस्तू विकत घेतो त्याचा खर्च केला जातो आहे. आर्थर रोड तुरुंगाने ही मनी ऑर्डर मिळाल्याचं स्पष्ट केलं आहे.

ADVERTISEMENT

मुंबईच्या आर्थर रोड तुरुंगात आर्यन खान कसे दिवस ढकलत आहे?

2 ऑक्टोबरला अभिनेता आर्यन खानला अटक करण्यात आली. ड्रग्ज पार्टी आणि क्रूझ पार्टीवर NCB ने छापा टाकला आणि त्यात आर्यन खानला अटक करण्यात आली. त्यानंतर त्याची रवानगी तुरुंगात करण्यात आली. सध्या तो न्यायालयीन कोठडीत आहे. त्याच्या जामीन अर्जावर आता 20 तारखेला सुनावणी होणार आहे. त्यामुळे आर्यनचा तुरुंगातला कोठडीतला मुक्काम वाढला आहे. या ठिकाणी आर्यनची अवस्था सहन होत नाही आणि सांगताही येत नाही अशी आहे.

आर्थर रोड तुरुंगातल्या काही सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार आर्यन खान हा कोठडीत डिस्टर्ब झाला आहे. तो बऱ्याचदा तणावाखाली आहे असंच दिसून येतं असंही काही सूत्रांनी सांगितलं आहे. त्याला तुरुंगातल्या वातावरणाशी जुळवून घ्यायला थोडा वेळ लागतो आहे असंही काही अधिकाऱ्यांनी म्हटलं आहे.

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT