दर शुक्रवारी NCB कार्यालयात हजर राहण्याची गरज नाही! आर्यन खानला बॉम्बे हायकोर्टाचा मोठा दिलासा

विद्या

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

अभिनेता शाहरुख खानचा मुलगा आर्यन खान याला बॉम्बे हायकोर्टाने मोठा दिलासा दिला आहे. आर्यन खानला आता दर शुक्रवारी NCB कार्यालयात हजर राहण्याची गरज नाही असं बॉम्बे हायकोर्टाने म्हटलं आहे. दर शुक्रवारी हजर राहण्यापासून आपल्याला दिलासा मिळाला ही मागणी करत आर्यन खानने विनंती याचिका कोर्टात दाखल केली होती. ज्यानंतर बॉम्बे हायकोर्टाने हा निर्णय दिला आहे.

ADVERTISEMENT

NCB ने आर्यन खानला 2 ऑक्टोबरला अटक केली होती. त्यानंतर त्याला 28 दिवस तुरुंगात रहावं लागलं होतं. 28 ऑक्टोबरला त्याला जामीन मंजूर झाला आणि 30 ऑक्टोबरला तो तुरुंगाच्या बाहेर आला. त्यानंतर कोर्टाने ठेवलेल्या जामिनाच्या अटीप्रमाणे दर शुक्रवारी आर्यन खान एनसीबी कार्यालयात हजर राहात होता. जामीन मिळाल्यानंतर 5, 12, 19, 26 नोव्हेंबर आणि 3 डिसेंबर तसंच 10 डिसेंबरलाही एनसीबी कार्यालयात हजर झाला होता. जामीन मंजूर करतानाच दर शुक्रवारी सकाळी 11 ते दुपारी 2 या वेळेत आर्यन खानला एनसीबी कार्यालयात हजर रहावं लागेल असं हायकोर्टाने म्हटलं होतं.

हे वाचलं का?

बुधवारी वकील अमित देसाई यांनी आर्यन खानची बाजू मांडत असा युक्तिवाद केला की, “या खटल्यात काहीही घडत नाही. आर्यन खान तपासात सहकार्य करायला तयार आहे. एनसीबीला हवं असेल तेव्हा तो या कार्यालयात येऊ शकतो. या प्रकरणाचा तपास आता दिल्ली एनसीबीकडे आहे. त्यामुळे आर्यनला जर दिल्लीला जावे लागले तर विमानाने तो दिल्लीलाही जाईल. प्रत्येक शुक्रवारी त्याला मुंबई एनसीबी कार्यालयात हजर रहावं लागतं. त्यावेळी मोठा पोलीस बंदोबस्त असतो. आर्यन खानपेक्षा पोलिसांची ही कुमक इतर अनेक चांगल्या कामांच्या दृष्टीने वापरता येईल.

… तर आर्यन खान निर्दोष असल्याचंच सिद्ध होतं; गृहमंत्री वळसे-पाटील यांचं मोठं विधान

ADVERTISEMENT

एनसीबीचे वकील श्रीराम शिरसाट यांनी सांगितले की एजन्सीला या बदलात कोणतीही अडचण नाही परंतु आमची एकच विनंती आहे की जेव्हा जेव्हा त्याला बोलावले जाईल तेव्हा त्याने सहकार्य करावे आणि जेव्हा जेव्हा बोलावले जाते तेव्हा त्यांनी मुंबई किंवा दिल्लीला यावे.

ADVERTISEMENT

दर शुक्रवारी एनसीबी कार्यालयात हजर राहण्याचे हे कंटाळवाणे काम रद्द करण्यात यावे, या मागणीसाठी खान यांनी मुंबई उच्च न्यायालयात धाव घेतली होती. त्याच्या याचिकेत असे म्हटले आहे की त्याला एसआयटी एनसीबी नवी दिल्लीने एनसीबी मुंबई झोनल युनिटद्वारे दोनदा बोलावले होते, प्रथम 7 नोव्हेंबर आणि नंतर 12 नोव्हेंबर. त्याने 12 नोव्हेंबरच्या समन्सला प्रतिसाद दिला होता आणि दुसऱ्या समन्सनुसार तो खारघरला गेला होता.

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT